नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज १४ प्रमुख विरोधी पक्षांना आज सकाळी ब्रेकफास्ट साठी आमंत्रित केलं आहे. या ‘ब्रेकफास्ट’ च्या माध्यमातून राहुल गांधी आज शंभरहून अधिक खासदारांशी चर्चा करणार असून त्यामध्ये केंद्र सरकारला संसदेत घेरण्याची तयारी सुरु आहे.
अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीत सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधकांकडून व्यूहरचना ठरवली जात आहे. यासाठी राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची ब्रेकफास्ट मीटिंग आयोजित केली. दिल्लीती कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ही बैठक होत आहे. या बैठकीला राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षांचे नेते हजर आहेत. या बैठकीत कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरही चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
शेतकरी आंदोलन आणि पेगॅसस प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी अधिक आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. गेल्या आठवड्यात त्यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ संसदेत ट्रॅक्टरवरुन प्रवेश केला होता.









