नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
देशात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना लसीच्या तुडवड्यामुळे लसीकरण मोहिमेत अडचण येत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. आवश्यकता असलेल्या प्रत्येकाला लसीकरण झाले पाहिजे आणि तत्काळ लसींच्या निर्यातीवर बंदी आणली गेली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यातून केली आहे. यासोबतच राहुल गांधी यांनी ट्वीट करत वाढत्या करोना संकटात लसींची कमतरता एक अतिगंभीर समस्या आहे, ‘उत्सव’ नाही, असे देखील म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे की, आवश्यकता असलेल्या प्रत्येकाला लसीकरण झाले पाहिजे आणि तत्काळ लसींच्या निर्यातीवर बंदी आणली गेली पाहिजे . लसी जलगतीने उपलब्ध व्हायला हव्यात. तसेच देश या क्षणाली महामारीच्या दुसऱ्या लाटेशी झगडत आहे. आपल्या शास्त्रज्ञ व डॉक्टरांनी मिळून कोरोना नष्ट करण्यासाठी लस बनवली. मात्र सरकारने लसीकरण कार्यक्रमाची योग्यप्रकारे अंमलबजावणी केली नाही. देशात एवढ्या हळूवारपणे लसीकरण सुरू आहे की, ७५ टक्के लोकांना लस देण्यासाठी वर्षांचा कालावधी लागेल, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
“वाढत्या करोना संकटात लसींची कमतरता एक अतिगंभीर समस्या आहे, ‘उत्सव’ नाही. आपल्या देशवासियांना संकटात टाकून लसींची निर्यात योग्य आहे का? केंद्र सरकारने पक्षपातीपणा न करता सर्व राज्यांना मदत करावी. आपल्या सर्वांना मिळून या महामारीला हरवायचं आहे.” असं राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









