प्रतिनिधी/ रत्नागिरी
पुण्यातील बालेवाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या महेश मिलके स्विमिंग ग्रृपच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल़ी यानिमित्त गुरूवारी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडय़ा साळवी यांच्याहस्ते नैपुण्य तसेच विशेष नैपुण्य मिळवलेल्या जलतरणपटूंचा सत्कार करण्यात आल़ा
यावेळी शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, प्राध्यापक आनंद आंबेकर, जलतरणपटू डॉ. निशिगंधा पोंक्षे, माजी सैनिक शंकरराव मिलके उपस्थित होत़े
राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महेश मिलके, स्विमिंग ग्रृपचे करण मिलके, तनया मिलके, श्रील तळेकर, श्रावणी खटावकर, मधुरा शेलार, आर्यन घडशी, संग्राम पाटील, सोहम साळवी, चैतन्य कदम, श्लोका बेंडके अशा दहा खेळाडूंनी सहभाग घेतला होत़ा या स्पर्धेत ऑल इंडिया बेस्ट ऑफ एटमध्ये करण मिलकेने 50 मि. ब्रेस्टट्रोकमध्ये 35.46 अशी वेळ देवून 7वा क्रमांक पटकावला. तसेच तनया मिलके हिने 50 मी. ब्रेस्टस्टोक या जलतरण प्रकारात 45.46 अशी वेळ देवून 11 वा क्रमांक पटकावला. तसेच मधुरा शेलार, आर्यन घडशी यांनी आपापल्या क्रीडा प्रकारात अनुक्रमे 15 व 17 वा क्रमांक प्राप्त केला. तसेच श्रावणी खटावकर व श्रील तळेकर यांनी अनुक्रमे 16 व 20 वा नंबर प्राप्त केला. तसेच इतर खेळाडूंनीही आपली विशेष कामगिरी दाखवत स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.









