सांगली / प्रतिनिधी
ग्रामीण जनतेस शुध्द आणि पुरेसे पिण्याचे पाणी गावास उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम मंजूर करण्यात आले. मात्र, ग्रामपंचायत अधिकारी , कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य आणि संबंधित ठेकेदार यांच्या संगनमताने ग्रामस्थांकडून नळजोडणीच्या नावाखाली दोनशे रुपयांची आर्थिक लूट करीत असल्याचा प्रकार आरग ( ता.मिरज ) येथील गावामध्ये उघडकीस आला. याबाबत ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व जल जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांकडे कारवाईची तक्रार केली आहे.
आरग येथील गावातील अंतर्गत राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गावातील एकूण ८४५ जुन्या पाणी पुरवठ्याचे नळ कनेक्शन ग्रामपंचायतीकडे नोंद आहे. तसेच पेयजलच्या कामासाठी गावातील अंतर्गत रस्त्यांची खोदाई करून नवीन पाईप लाईन टाकण्यात येत आहे. परंतु , नळ जोडणीच्या नावाखाली घरटी दोनशे रुपये इतकी रक्कम सक्तीने वसुली करण्यात येत आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेतून हे मंजुर असेल तर घरटी दोनशे रुपये आकारणी कशासाठी असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडुन होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









