नवी दिल्ली / वृत्तसंस्था
क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी 2020 मधील राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांना सोमवारी प्रत्यक्ष सोहळय़ात चषक देऊन सन्मानित केले. सर्व जेत्यांना रोख इनाम यापूर्वीच प्रदान केले गेले. पण, कोरोनाच्या संकटामुळे त्यांना चषक व मानचिन्ह दिले गेले नव्हते. सोमवारी आयोजित सोहळय़ात उपस्थित जेत्यांचा गौरव केला गेला. रोहित शर्मा दुबईत असल्याने येथे हजर राहू शकला नाही.
सोमवारी सिटी हॉटेलमध्ये आयोजित सोहळय़ात महिला हॉकी कर्णधार राणी रामपाल, स्टार कुस्तीपटू विनेश फोगट, 2016 पॅरालिम्पिक्स सुवर्णजेता थंगवेलू मरियप्पन यांना प्रतिष्ठेचा खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. टोकियो ऑलिम्पिक कांस्यजेती मुष्टियोद्धा लोवलिना बोर्गोहेन, क्रिकेटपटू इशांत शर्मा, धावपटू दुती चंद, तिरंदाज अतानू दास, शटलर्स सात्विक, चिराग शेट्टी यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले गेले.
2020 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जेते
खेलरत्न पुरस्कार ः रोहित शर्मा (क्रिकेट), मरियप्पन थंगवेलू (पॅरा-ऍथलेटिक्स), मनिका बात्रा (टेबलटेनिस), विनेश फोगट (कुस्ती), राणी रामपाल (हॉकी).
अर्जुन पुरस्कार ः अतानू दास (तिरंदाजी), दुती चंद (ऍथलेटिक्स), सात्विक साईराज रणकिरेड्डी (बॅडमिंटन), चिराग शेट्टी (बॅडमिंटन), विशेष भृगूवंशी (बास्केटबॉल), मनीष कौशिक (मुष्टियुद्ध), लोवलिना बोर्गोहेन (मुष्टियुद्ध), इशांत शर्मा (क्रिकेट), दीप्ती शर्मा (क्रिकेट), सावंत अजय अनंत (इक्वेस्ट्रियन), संदेश झिंगन (फुटबॉल), अदिती अशोक (गोल्फ), आकाशदीप सिंग (हॉकी), दीपिका (हॉकी), दीपक (कबड्डी), सारिका काळे (खो-खो), दत्तू भोकनाळ (रोईंग), मनू भाकर (नेमबाजी), सौरभ चौधरी (नेमबाजी), मधुरिका पाटकर (टेबलटेनिस), दिविज शरण (टेनिस), शिवा केशवन (हिवाळी स्पर्धा), दिव्या (कुस्ती), राहुल आवारे (कुस्ती), सुयश नारायण जाधव (पॅरा-जलतरण), संदीप (पॅरा-ऍथलेटिक्स), मनीष नरवाल (पॅरा-शुटिंग).
द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन गट) ः धर्मेंद्र तिवारी (तिरंदाजी), पुरुषोत्तम राय (ऍथलेटिक्स), शिव सिंग (मुष्टियुद्ध), रोमेश (हॉकी), कृष्ण कुमार हुडा (कबड्डी), विजय मुनिश्वर (पॅरा-पॉवरलिफ्टिंग), नरेश कुमार (टेनिस), ओम प्रकाश दहिया (कुस्ती).
द्रोणाचार्य पुरस्कार (सर्वसाधारण गट) ः ज्युड फेलिक्स (हॉकी), योगेश मालविया (मल्लखांब), जसपाल राणा (नेमबाजी), कुलदीप कुमार (वुशू), गौरव खन्ना (पॅरा-बॅडमिंटन).
ध्यान चंद पुरस्कार ः कुलदीप सिंग भुल्लर (ऍथलेटिक्स), जिन्सी फिलीप्स (ऍथलेटिक्स), प्रदीप गंधे (बॅडमिंटन), तृप्ती मुरगुंडे (बॅडमिंटन), एन. उषा (मुष्टियुद्ध), लाखा सिंग (मुष्टियुद्ध), सुखविंदर सिंग संधू (फुटबॉल), अजित सिंग (हॉकी), मनप्रीत सिंग (कबड्डी), जे. रणजित कुमार (पॅरा-ऍथलेटिक्स), सत्यप्रकाश तिवारी (पॅरा-बॅडमिंटन), मनजीत सिंग (रोईंग), कै. सचिन नाग (जलतरण), नंदन बाळ (टेनिस), नेतार्पल हुडा (कुस्ती).









