वारणानगर / प्रतिनिधी
बहिरेवाडी ता. पन्हाळा येथील राष्ट्रीय कॉग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते विश्वनाथराव शंकरराव जाधव – सरनाईक वय ९० यांचे आज सोमवार दि. २१ रोजी वार्धक्याने निधन झाले. विश्वनाथ सानाईक यांनी १४ जून १९७९ ते १४ फेब्रुवारी १९८४ या कालावधीसाठी ४ वर्ष ८ महिने पन्हाळा पंचायत समितीचे पाचवे सभापतीपद भूषिवले होते. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, उपाध्यक्ष या पदावर त्यानी काम केले बहिरेवाडी येथील यशवंत पतसंस्था, बहिरोबा दूध संस्था, फिरगोजी जाधव विकास सोसायटी . या संस्था स्थापन केल्या आहेत काही वर्षापूर्वी पन्हाळा तालुका पतसंस्था फेडरेशनची स्थापना करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
माजी खा. स्व.उदयसिंगराव गायकवाड, माजी आ.स्व. यशवंत ए. पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांचा लौकीक होता माजी आ. महादेवराव महाडिक, आ.पी.एन.पाटील यांच्यासह जिल्ह्यातील मातब्बर राजकीय नेत्यात त्यांचे चांगले नाते होते. विविध सहकारी संस्थां व राजकीय संघटनांवर कार्यरत असणारे अभ्यासू व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती.
राज्य सहकारी शिखर बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव सरनाईक यांचे ते वडील होत.तसेच सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचे ते सासरे होत. त्यांच्या पश्चात दोन मुले , एक मुलगी ,सुना नातवंडे ,परतवंडे असा परिवार आहे.
Previous Articleफसलेल्या पाककृती
Next Article रत्नागिरी जिल्ह्यात 70 कोरोना पॉझिटिव्ह तर 3 मृत्यू









