कबनुर / प्रतिनिधी
राष्ट्रीयकृत बँकांनी बेकायदेशीरपणे कर्जाची वसुली सुरू ठेवली आहे ती थोडी थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा लोक क्रांती फाउंडेशनच्यावतीने इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर देशातील उद्योगधंदे बंद असून तसेच शासकीय कार्यालय ही अजून बंद आहेत. त्यामुळे लोकांना रोजगार नसल्यामुळे त्यांची खूप हलाखीची अवस्था झालेली दिसून येते. अशा परिस्थितीत भारतीय रिझर्व बँकेने राष्ट्रीय कृत बँकांना मार्च ते 30 जून 2020 अखेर कर्ज व त्यावरील हप्ता यांना मुदतवाढ दिलेली आहे. कोरोना रोगाची सद्य परिस्थिती पाहता त्यांची मुदत वाढ बदलून माहे 30 जून ते माहे ऑगस्ट 2020 अशी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सर्वोच्च न्यायालय यांनी हा आदेश दिल्यामुळे आरबीआय ने सक्त आदेश संबंधित सर्व राष्ट्रीय बँकांना दिले आहे. परंतु काही बँका बेकायदेशीर मनमानी वसुली करत असून. त्यांना योग्य ती ताकीत, व समज द्यावी. अन्यथा आम्ही सर्व सह्या करणारे तसेच लोकक्रांती फाउंडेशन कडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. यामुळे होणाऱ्या नुकसानीस संबंधित बँका जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अशा स्वरूपाचे निवेदन इचलकरंजी प्रांतअधिकारी डॉक्टर विकास खरात यांना देण्यात आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








