आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करणार काँग्रेस, शिवसेनेचे युवक
तेजस शिंदे यांनी घेतल्या मुलाखती
प्रतिनिधी / सातारा
राष्ट्रवादी युवकच्या सेलमध्ये पक्ष संघटन वाढीकरता जे अक्टिव्ह कार्यकर्ते आहेत. जे पक्षासाठी वेळ देतात त्यांचा पक्ष वाढीसाठी उपयोग व्हावा या भावनेतून पक्ष कार्यालयात आलेल्या आदेशानुसार युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी केलेल्या आवाहयानुसार मुलाखतीला प्रतिसाद मिळाला. काँग्रेस, सेनेच्या युवक कार्यकर्त्यांचा प्रवेश आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरच जाहीर प्रवेश करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी युवकची जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. नव्याने निवडी करण्यासाठी मुलाखती सुरू आहेत. मुलाखतीचा कार्यक्रम कोरेगाव, सातारा तालुक्याचा गुरुवारी पार पडला.
सातारा तालुक्यातील युवक कार्यकारिणीच्या पदाधिकारी नियुक्ती करीता मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी सातारा जिल्हा युवक प्रभारी संकल्प डोळस, युवकचे प्रदेश सरचिटणीस गोरखनाथ नलवडे, जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस राजकुमार पाटील, पारिजात दळवी, विध्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे व इतर पदाधिकारी तसेच युवक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी बोलताना तेजस शिंदे म्हणाले, गेल्या दोन वर्षांत पक्ष विरोधी बाकांवर असताना माझ्या खांद्याला खांदा लावून भाजप सरकार विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार्या युवक सहकार्यांना मी सोबत घेऊन नवीन व जुन्या कार्यकर्त्यांना न्याय देत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी येत्या काळात पावले उचलणार आहे,असा शब्द उपस्थितांना दिला. मुलाखती मध्ये अमरसिंह बर्गे, नितीन लावंघरे, सनी शिर्के, सागर चव्हाण, अमर माने, मंगेश ढाणे, तुषार गुरव यांच्यासह अनेकांनी मुलाखती दिल्या. मुलाखतीत त्यांना पक्ष संघटन वाढवण्यासाठी आपण काय करू शकता,नवीन कार्यकर्ते जोडण्यासाठी काय करू शकता ?, आपण आता पर्यंत काय पक्षासाठी केले ?, पद मिळाल्यावर काय करणार आदी प्रश्न विचारले.
लवकरच शिवसेना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार
राष्ट्रवादी युवक मध्ये जिल्ह्यातील अनेक युवक प्रवेश करणार आहेत. आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवकच्यावतीने देण्यात आली.









