सांगलीत मुलाखती, दहा तालुक्यांतून २१७ जण इच्छुक
प्रतिनिधी/इस्लामपूर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगली जिल्ह्यातील १० युवक तालुकाध्यक्ष पदांसाठी प्रचंड रस्सीखेच असून या पदांसाठी २१७ जण इच्छुक आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक जिल्हाध्यक्ष निवडीनंतर आता जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील युवक अध्यक्ष बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. दि. ५ व ६ ऑगस्ट या दोन दिवसात युवक संघटनेच्या १० तालुका अध्यक्ष पदांसाठी एकुण २१७ युवकांच्या पक्ष निरीक्षक अरुण आसबे यांच्या उपस्थितीत ह्या मुलाखती घेण्यात आल्या.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढीसाठी प्रयत्न करीत असताना, जिल्ह्यातील युवक संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने खांदेपालट करण्यात येणार आहे. शिवाय भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवक राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे. नुकतीच जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे विराज नाईक यांच्यासारख्या उमद्या नेतृत्वाकडे पक्षाने दिली आहेत.
सांगली जिल्हा कार्यालयात संपन्न झालेल्या या मुलाखतीच्या वेळी युवा नेते प्रतीक जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासो मुळीक, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक जिल्हाध्यक्ष विराज नाईक, प्रदेश उपाध्यक्ष शरद लाड, भरत देशमुख, प्रा. नारायण खरजे तसेच सर्वच तालुका अध्यक्ष उपस्थित होते.
Previous Articleमाळेवाडी येथील घरफोडीतील आरोपीस अटक
Next Article कोल्हापूर : मसाई पठारावरुन कार कोसळली, एकाचा मृत्यू








