कुपवाड /प्रतिनिधी
किरकोळ कारणावरुन दोन महिन्यापुर्वी झालेल्या भांडणाच्या रागाातून चिडून खुन्नस ठेवून संशयित पाचजणांनी संगनमत करून शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय महादेव पाटोळे (४१, रा.वाघमोड़ेनगर, कुपवाड) याचा खून करून कायमचा काटा काढल्याची माहिती शनिवारी पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास कुपवाड एमआयडीसीतील रोहीणी कोल्ड स्टोअरेजमध्ये हल्लेखोरांनी थरारक पाठलाग करून पाटोळेचा खून केला होता. याप्रकरणी सांगली एलसीबीच्या पथकाने २४ तासात पाच संशयितांना अटक करून खूनाचा छढा लावला. अटक केलेल्यामध्ये मुख्य सूत्रधार निलेश विठोबा गडदे (२१, रा. वाघमोडेनगर, कुपवाड), सचिन अज्ञान चव्हाण (२२, रा. आर.पी.पाटील शाळेजवळ, कुपवाड), वैभव विष्णू शेजाळ (२१, रा.विठुरायाचीवाडी, कवठेमहांकाळ, सध्या रा. वाघमोडेनगर), मृत्यूंजय नारायण पाटोळे (२७, रा. आंबा चौक, कुपवाड) व किरण शंकर लोखंडे (१९, रा.वाघमोड़ेनगर) यांचा समावेश आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पाटोळे राष्ट्रवादी शहर जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत होता. त्याच्याकडे मिरज एमआयडीसीतील एका कारखान्यात कामगार पुरवठा करण्याचा कंत्राट होते. शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पाटोळे हे कामगारांचा पगार भागवून घरी जात असताना त्यांच्यावर संशयित निलेश गडदेसह पाचजणांनी गाडी आडवी मारून कोयत्याने हल्ला चढविला. यावेळी पाटोळे हल्ला चूकवून लगत रोहीणी अग्रोटेक कोल्डस्टोअरेजमध्ये घूसले. हल्लेखोरांनी हातात कोयता घेऊन थरारक पाठलाग करत स्टोअरेजमध्ये जाऊन त्यांच्या डोक्यात आणि शरीरावर वार करून त्यांचा निघृण खून केला. खून केल्यानंतर पसार झालेल्या हल्लेखोरांच्या शोधासाठी कुपवाड एमआयडीसीसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची पथके रवाना झाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जत तालुक्यातील जिरग्याळ येथे छापा टाकून निलेश गडदेसह पाच संशयित हल्लेखोरांना जेरबंद केले. प्राथमिक तपासात पाटोळे यांचा खून यापुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून केल्याची कबुली मुख्य संशयित गडदे यांनी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे तपास करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








