राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन
सातारा / प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्ताने ऑनलाईन नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातंर्गत राज्यातील युवक, युवतीना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सातारा जिह्यातील युवक, युवतींनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्ताने १० रोजी राज्यव्यापी ऑनलाईन नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवातंर्गत बेरोजगार युवक युवतींना रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर असंख्य परप्रातिंय कामगारांचे स्थलांतर झाल्यामुळे औद्योगिक कंपन्यांनाही मनुष्यबळाची आवश्यकता आहे. कष्ट करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम देण्याच्या हेतूने राष्ट्रवादी ऑनलाईन नोकरी महोत्सव सुरु करण्यात येतो आहे. जिह्यातील गरजू युवकयुवतींनी अधिक माहितीसाठी नितीन 7350014493, नाना 7350014495, योगेश 7350014536 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी केले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








