पुणे /प्रतिनिधी
केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी शरद पवार हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील यावर बोलताना त्यांनी “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे धोकेबाज नेते नाहीत. ते देशाचे नेते आहेत. राष्ट्रपती पदाचे उमेदवार पवार असतील तर आमच्या शुभेच्छा असतील. मात्र, ते निवडून येणार नाहीत. त्यांना उगीच बळीचा बकरा करू नये” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
पुणे दौऱ्यावर असलेल्या आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आठवले यांनी, ओबीसी समाजाची जनगणना होणे आवश्यक आहे. जातनिहाय जनगणना झाल्याने जातीयवाद वाढेल या मताचा मी नाही. जातनिहाय जनगणना झाली तर कोणत्या जातीला किती प्रतिनिधित्व द्यायचे हर नेमकेपणाने ठरविता येईल. ओबीसींचा डेटा अंदाजे तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे केंद्र तो देत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दोनदा भेट घेतली. त्यानंतर मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही भेट घेतली. या भेटीचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात असतानाच या भेटीतील मोठा तपशील बाहेर आला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आगामी राष्ट्रपती बनविण्यासाठीप्रशांत किशोर यांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे दिल्लीत राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.