जयंतीनिमित्त देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रम : भाजप नेत्यांची उपस्थिती
नवी दिल्ली / माजी पंतप्रधान
अटलबिहारी वाजपेयी यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजकीय नेत्यांनी त्यांना पुष्पांजली अर्पित करत श्रद्धांजली वाहिली. गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक नेतेही उपस्थित होते. अनेकांनी सोशल मीडियावरही वाजपेयींप्रति असलेल्या आपल्या भावना व्यक्त
केल्या.
पंतप्रधान मोदी यांनीही सोशल मीडियावर वाजपेयी यांन श्रद्धांजली वाहिली. तसेच अटलजींवर आधारित ‘अटलबिहारी वाजपेयी इन पार्लमेंट’ या पुस्तकाचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या उपस्थितीत करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्यावतीने देशभरात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये केंद्रीय मंत्री, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार व कार्यकर्ते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.









