ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जगभरात आज जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा केला जात आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. या दिनाचे औचित्यसाधत राष्ट्रपतींनी महिलांच्या सुरक्षेचा आणि सन्मानाचा संकल्प करण्याचे आवाहन केलं आहे
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटद्वारे महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा! हा दिवस म्हणजे महिलांप्रती सन्मान प्रदर्शित करण्याचा दिवस आहे. समाज, देश आणि जगाच्या निर्मितीत महिलांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या महिला दिनानिमित्ताने सर्व महिलांच्या सुरक्षेचा आणि सन्मानाचा संकल्प करुया, जेणेकरुन त्यांना आपल्या इच्छेनुसार स्वप्न पूर्ण करता येतील.









