मेष
धनस्थानी बुध-शुक्र हा एक अतिशय चांगला योग आहे. या योगावर कितीही संकटे आली तरी त्यातून सुटका होते. आर्थिक परिस्थिती सुधारते. बोलण्याचालाण्यातून झालेले गैरसमज दूर होतील. जर कुठे पैसे गुंतवले असाल अथवा कुणाला तारण वगैरे न घेता पैसे दिलेल असेल तर ते परत मिळू शकतात. आर्थिक स्थैर्य लाभेल. व्यवहारकुशल व काटकसरी कृतीचा अवलंब केल्यास फार मोठे यश मिळेल. मधुर बोलण्याने न होणारी कामे देखील साध्य होतील. पण हा योग राहूच्या संपर्कात असल्याने पूर्वजांचे काही शापीत दोषही नडतील.
वृषभ
राशीस्वामी शुक्र स्वतःच्या राशीत, तसेच त्याला बुधाची साथ व राहूचे उत्तम सहकार्य अशा योगावर ‘न भूतो न भविष्यती’ असे मोठ यश मिळू शकते. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आनंदी असेल. वैवाहिकसौख्य चांगले राहील. विवाहाच्या प्रयत्नात असाल तर मनासारखे स्थळ मिळेल. पण त्यात काहीतरी गडबड असण्याची शक्मयता आहे. श्रीमंती, ऐश्वर्य, धनलाभ या दृष्टीने अनुकूल योग. कोणतीही महत्त्वाची कामे करून घ्या.
मिथुन.
राशीच्या बाराव्या स्थानी बुध-शुक्र-राहु हा अत्यंत विचित्र योग आहे. विलासीवृत्ती वाढेल. ऐकण्या बोलण्यातील चुकांमुळे गैरसमज होतील. खर्चावर नियंत्रण राहणार नाही. विकृत स्वभावाच्या व्यक्ती भेटतील. काहीजण गुप्त खलबते करून तुम्हाला त्रास देण्याचां प्रयत्न करतील. आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहयोग जुळण्याची शक्मयता. गूढशास्त्र, मंत्रशास्त्र शिकण्यास योग्य काळ. परदेश प्रवासासाठी प्रयत्न करीत असाल तर यशस्वी व्हाल.
कर्क
लाभस्थानी बुध-शुक्र-राहु हा लाभदायक योग आहे. कुठूनतरी काहीतरी मिळण्याची शक्मयता. विलासीवृत्ती वाढेल. काही मित्र-मैत्रिणींमुळे व्यसन व अमली पदार्थ वगैरे नको त्या प्रकरणात अडकाल. त्यासाठी व्यसन व इतर अनिष्ट बाबींपासून दूर राहणे योग्य ठरेल. घर व वाहन खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. मानसन्मान व नावलौकिक होण्याची शक्मयता. कसोटीच्या क्षणी जवळच्या नातलगांपेक्षा बाहेरील व्यक्ती ऐनवेळी मदत करतील.
सिंह
दशमात बुध-शुक्र हा एक प्रकारचा हमखास यश देणारा योग आहे. तुमचे प्रयत्न योग्य दिशेने चालू असतील तर हाती घेतलेले काम विनासायास पूर्ण होईल. सांपत्तिक स्थिती उत्तम राहील. नोकरी व उद्योग-धंद्यात लाभ होतील. श्रीमंती आणि मान-सन्मान हे दोन्ही एकाच वेळी मिळण्याची दुर्लभ संधी. कोणत्याही क्षेत्रात असला तरी त्यात एखादे उच्चपद किंवा वरची जागा अथवा पगारवाढ वगैरेसारख्या शुभघटना घडू शकतात. काहीजणांना संचालकपद अथवा राजकारणात उच्चपद मिळण्याची संधी
कन्या
भाग्यस्थानी बुध-शुक्र योग. लिखाण अथवा साहित्यातून धनलाभ दर्शवितो. कुलदेवतेची आराधना सुरू असेल तर त्याची कृपा लाभेल. जर तुमचा बौद्धिक क्षेत्राशी संबंध असेल तर मोठय़ा प्रमाणात भाग्य उजळेल. संतती व संपत्तीचा लाभ होईल. कर्तृत्वाला प्रोत्साहन देणाऱया संधी मिळतील. तुमच्या मूळपत्रिकेत जर चांगले योग असतील तर तुम्हाला जागतिक प्रसिद्धीही मिळू शकते. काही महत्त्वाच्या कामानिमित्त अचानक प्रवास योग, तसेच नोकरी व्यवसायाच्या अनेक ऑफर्स येतील.
तूळ
अष्टमस्थानी बुध-शुक्र-राहू हा संमिश्र फळ देणारा योग आहे. अचानक धनलाभ, प्रवास, नवे स्नेहसंबंध, प्रेमप्रकरण. गंभीर आजारातून सुटका, गैरसमज निवळणे अशा चांगल्या घटना घडतील. पण त्याचबरोबर अपघात, दुर्घटना, घराण्यातील पूर्वार्जित दोषांचा अथवा पूर्वजांच्या बऱया-वाईट कर्माचा अनिष्ट परिणाम देखील जाणवेल. त्याचा त्रास होऊ नये यासाठी पशुपक्षांना दाणापाणी देत जावे. त्याचा चांगला अनुभव येईल.
वृश्चिक
सप्तमस्थानी बुध-शुक्र-राहु योग वैवाहिक बाबतीत विचित्र फळ निर्माण करील. त्यासाठी विवाहाची बोलणी वगैरे करताना जरा सावध राहणे योग्य ठरेल. दिलेली माहिती व प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात जमीन-अस्मानाचा फरक असेल. भागिदारी व्यवसाय, कोर्ट प्रकरणे, प्रवास इत्यादी बाबतीत चांगले अनुभव येतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. किरकोळ कारणांवरून कौटुंबिक वातावरण दूषित होणार नाही, याची काळजी घ्या. सांसर्गिक रोगापासून जपा. ऑनलाईन व्यवहार जपून करा.
धनु
सहाव्या स्थानी बुध-शुक्र-राहूची युती तुम्हाला काही बाबतीत फार मोठे यश देणार आहे. आर्थिक भरभराट, बेकारांना नोकरी, आरोग्य सुधारणा, व्यवसायात तेजी येणे, काही रद्द झाली कामे परत मिळणे, इत्यादींचा त्यात समावेश असेल. पण आरोग्याच्या बाबतीत निष्काळजी राहू नका. एखादी चूक देखील गंभीर प्रसंग निर्माण करील. आपले वाहन, मोबाईल अथवा तत्सम महत्त्वाच्या वस्तू इतरांना चुकूनही देऊ नका. त्याचा निश्चित गैरवापर होण्याची शक्मयता आहे.
मकर
पंचमस्थानी बुध-राहु-शुक्र योग, आर्थिक भरभराट, अपेक्षित संततीलाभ, नावलौकिक, कुलदेवतेची कृपा तसेच तुमच्या हातून जर काही चांगली कर्मे घडली असतील तर त्याचे फार मोठे फायदे मिळवून देईल. पण त्याचबरोबर घराण्यातील शापित दोषांचा प्रखर प्रभाव देखील जाणवून देईल. त्यामुळे आपल्या हातून कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्या. पूर्वी जर काही चुका झाल्या असतील तर त्या निस्तरण्याचा प्रयत्न करा. देवादिकांचे नावाखाली बळी वगैरे देणे चालू असेल तर ते प्रकार बंद करा. अन्यथा शापित दोषांचे प्रमाण वाढेल.
कुंभ
चतुर्थात बुध शुक्र राहू हा योग वास्तु विषयक सर्व इच्छा पूर्ण करील कोणत्याही कारणाने जर घराचे काम अथवा खरेदीचे काम रखडले असेल तर ते पूर्ण होऊ शकेल विद्यार्थ्यांना अंतिम वर्ष असेल तर चांगल जाईल आर्थिक स्थिती भक्कम राहील कुटुंबात नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करा ल. गंजलेल्या वस्तू तसेच अडगळ काढण्याचा प्रयत्न केल्यास भा ग्य?दयातील सर्व अडथळे दूर होतील व मानसिक समाधान लाभेल वास्तुशास्त्राच्या नावाखाली फसवणूक होण्याची शक्मयता आहे काळजी घ्या
मीन
तृतीय स्थानी बुध शुक्र राहू हा योग तुमच्या कल्पनाशक्तीला वाव देऊन तुमच्या हातून मोठे काहीतरी कार्या घडवेल त्याचा आर्थिक फायदा होईल तुमच्या सल्ल्यामुळे काही जणांना नोकरी उद्योग व्यवसाय उपलब्ध होईल पण तुमच्या यशाला अथवा कर्तुत्वाला कुठेही नजर लागणार नाही याची काळजी घ्या मुलाबाळांच्या बाबतीत जरा सावधगिरी बाळगावी लागेल कुणाच्यातरी चुका अंगलट येण्याची शक्मयता आहे राजकारणात असाल तर काही काळ दूर जाणे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे.




