बुधवार दि 6 ते मंगळ दि 12 जाने. 2021
ग्रहांची युती प्रतियोग याबाबत असलेले समज-गैरसमज
जन्मपत्रिका किंवा कुंडली पाहताना कुंडलीचे 12 घरात काहीवेळा एकापेक्षा अनेक ग्रह बसलेले दिसून येतात एका राशीत अनेक ग्रह असतील तर त्याला युती म्हणतात एका राशीत एका घरात असल्याने यांच्यामध्ये टक्कर कशी होत नाही असा प्रश्न अनेकांना पडतो तसेच प्रतियोग म्हणजे समोर समोर असताना त्यांच्यात इतके शुभ किंवा अनिष्ट योग का होतात असा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो वास्तविक पाहता एका राशीत एका घरात अनेक ग्रह असले तरीसुद्धा त्यांच्यातील अंतर लक्षावधी किंवा कोटय़ावधी मैल इतके असू शकते मध्यंतरी शनी गुरू युती होती त्यावेळी त्या दोघांत्तील नंतर 45 कोटी मैल लांब होते त्या अनुषंगाने प्रत्येक ग्रह सूर्यापासून किती कोटी मैल अंतरावर आहे याचा अंदाज येऊ शकतो ब्रम्हांडाचा पसारा मानवी बुद्धिमत्तेच्या पलीकडे आहे .आकाशस्थ ग्रहांचा मानवी जीवनावर काही परिणाम होत नाही असे काही जण म्हणतात पण ते पूर्णपणे चुकीचे आहे. एक दिवस सूर्य उगवला नाही तर जगात किती हाहाकार माजेल ते पहा त्यावरून ग्रहांचा आपल्यावर किती परीणाम होतो हे सहज समजून येईल. मोठे ग्रह आपल्यापासून जितके लांब असतात तितका त्यांचा प्रभाव अधिक असतो पन्नास-शंभर फूट उंचावरून जर एखादा खडा किंवा काडी पडली त्याचा मार फार वाईट असतो पण तोच खडा दोन-तीन फूट उंची वरून पडला तर त्याचे फारसे परिणाम होत नाहीत तसाच हा प्रकार आहे संपूर्ण ब्रह्मांडाचे 360 अंश केलेले आहेत. दोन अंशातील अंतर कोटय़ावधी अब्जावधी मैल असू शकते त्यामुळे ग्रह जरी एका राशीत एका अंशात असले तरी त्यांच्यातील परस्परविरोधी आकर्षणामुळे त्यांचे निश्चित परिणाम जाणवतात त्याच न्यायाने जे ग्रह परस्परासमोर 180 अंशात असतात त्याला प्ा्रखतियोग म्हणतात त्यांचे परिणाम अतिशय प्रखर असतात शुभ ग्रहातील प्रतियोग माणसाला राज ऐश्वर्य देवू शकतो तर अशुभ. ग्रहातील युती किंवा प्रतियोग माणसाला सर्व दृष्टीने त्रासदायक व रसातळाला नेऊन पोहोचविते त्यासाठीच पत्रिकेतील ग्रहमान पाहताना अतिशय काळजी घ्यावी लागते जगात एका वेळी हजारो लाखो मुले जन्माला येत असतात वास्तविक त्यावेळेची कुंडली वगैरे एकच पडते पण प्रत्येकाच नशीब वेगवेगळे असते कारण कुटुंबातील इतरांच्या शुभ अशुभ ग्रहांच्या देखील प्रत्येकावर परिणाम होत असतो घरी एखादी अनोळखी व्यक्ती आल्यावर काही वेळा वातावरण प्रसन्न व आनंदी होते तर काही लोक आल्यानंतर वातावरण दूषित होते व संकटपरंपरा निर्माण होते असे अनेकांनी पाहिले असेल कारण मनुष्यप्राणी जन्माला येताना गेल्या हजारो जन्मातील काही ना काही चांगले अथवा वाईट कर्माचे प्रारब्ध घेऊन येत असतो त्यानुसारच त्याचे जीवन घडत असते त्यामुळेच एका वेळी जन्मलेल्या दोन मुलांच्या जीवनात जमीन-अस्मानाचा फरक दिसून येतो.आमचे ग्रहमान चांगले असूनही आम्हाला हा त्रास का असे अनेक लोक म्हणत असतात पण मागील जन्माचे प्रारब्ध कोण पहाणार.?
पूर्वार्ध
मेष.
दशमात बुधासह ग्रह एकत्रित आहेत भाग्यकारक योग या कालखंडात कोणता ही व्यवसाय सुरू करावा प्रगतीच्या अनेक संधी येतील पत्रकारिता, प्रकाशन कारखानदारी शिक्षण क्षेत्र यात असाल तर फार मोठे यश मिळेल. हर्षल मंगळ तुमच्या राशीत असल्याने काहीवेळा महत्त्वाचे निर्णय घेताना मानसिक संभ्रम निर्माण होईल जागेचे व्यवहार विद्युत उपकरणांची खरेदी एखाद्या नवीन प्लांट घालणे या दृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे जगावेगळा व्यवसाय करावासा वाटेल प्रखर कालसर्प योगाचा प्रभाव सुरू आहे त्यामुळे कोणतेही काम पूर्ण विचारांती करावे किरकोळ चुका देखील उग्र स्वरूप धारण करू शकतात.
वृषभ
भाग्यस्थानी बुध व त्याला शनि गुरुची उत्तम साथ असल्याने पुढील जीवनाला आवश्यक अशा दीर्घ योजना आखाल नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी थोडेसे कर्ज घ्यावे लागेल त्यात इतरांचीही मदत मिळेल. सध्या चालू असलेल्या व्यवसाय या व्यतिरिक्त दुसरे काहीतरी सुरू करण्याची संधी मिळेल कालसर्प योगाचां अशुभ प्रभाव सुरू असल्याने प्रत्येक काम वेळेत होईल असे नाही त्यामुळे मानसिक संतुलन स्थिर राहणार नाही तुमच्या कामाची व्याप्ती अथवा कल्पना यांच्या कुठेही ऊल्लेख करू नका एखाद्यावेळेस तुमची आयडीया वापरून लोक आपली सुधारणा करतील व तुम्ही आहात तिथेच राहाल.
मिथुन
अष्टमातील गुरु शनीबरोबर राशीस्वामी बुध ही तिथेच येत आहे सत्त्वपरीक्षा पाहणारे हे ग्रहमान आहे. त्यामुळे तुम्हाला चारीकडून सावध राहावे लागेल साधीसुधी कामेही वेळेत होतील असे नाही पण जिद्दीने कामे करीत रहा हातातील कामे संपविण्याचे प्रयत्न करा नवीन कामे तूर्तास न घेणे योग्य ठरेल अति दूरचे प्रवास टाळावेत आर्थिक बाबतीत ग्रहमान उत्तम आहे कोणत्याही वेळी आर्थिक अडचण पडणार नाही पण आरोग्याची काळजी घ्या संक्रांतीनंतर ग्रहमान अनेक समस्या निर्माण करणारआहे हे लक्षात घेऊन त्यानुसार निर्णय घेणे योग्य ठरेल वाहन किंवा घरदार वगैरे दुरुस्त करताना सावधानता पाळणे आवश्यक.
कर्क
सप्तम स्थानी बुधासह चार ग्रह हा योग अनेक बाबतीत यश देणारा आहे कोणतेही काम अवघड वाटणार नाही नवीन उद्योगव्यवसाय, भागीदारी, दूरचे प्रवास या बाबतीत चांगले अनुभव येतील आर्थिक अडचण पडणार नाही विवाहाच्या प्रयत्नात असाल तर सुस्वभावी व व्यवहारकुशल जोडीदार मिळण्याची शक्मयता पण शनि बुधाचा योग हा संकटे निर्माण करणारा आहे ऐकण्या बोलण्यातील चुकांमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात तसेच एखाद्यावर सोपविलेले काम वेळेवर पूर्ण होईलच असे नाही त्यामुळे चिडचिड अथवा संताप वाढण्याची शक्मयता दिसते. क्षमतेबाहेर कोणतेही काम करू नका जर तुमच्याकडे जुनापुराणा माल असेल तर तो विकण्याचा यावेळी प्रयत्न करावा लाभ होईल.
सिंह
बुधासह चार ग्रह मृत्यू षडाष्टकात आहेत अशा योगावर जे जे वाईट आहे ते नष्ट होते. पण त्याचबरोबर चांगल्या कामातही अडचणी निर्माण होतात कोणत्याही कामाला पैसा कमी पडणार नाही. पूर्वीची काही महत्त्वाची कामे असतील तर ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण यापुढे तुम्हाला कामाचा ताण वाढणार आहे तसेच आर्थिक प्रगतीचे नवे मार्गही दृष्टिक्षेपात येतील विवाह व तत्सम मंगलकार्याच्या दृष्टीने अनुकूलता नाही त्यामुळे बोलण्यात भाग वगैरे घेऊ नका कोणाची तरी चूक तुमच्या तुमच्यावर टाकली जाईल त्यामुळे काही जणांची वितुष्ट येऊ शकेल नोकरी-व्यवसायात जपून राहा.
कन्या
बुधासह 4 ग्रह पंचमात आहेत अतिशय छान व मोठे फळ देणारा योग आहे व्यापारीदृष्टय़ा अशक्य वाटणाऱया गोष्टी या योगावर. साध्य होऊ शकतात नोकरी विषयात प्रगतीची घोडदौड सुरू राहील. आरोग्याच्या बाबतीत जरा काळजी घ्यावी लागेल रुग्णांचा संपर्क आल्याने तुम्हालाही त्रास होऊ शकतो राहती वास्तू. व नोकरी-व्यवसायात काही तरी नवीन करून दाखवावेसे वाटेल मुलाबाळांची बाबतीत अतिशय उत्तम. नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा वगैरे असतील तर त्यात यश मिळेल विवाहाचे प्रयत्न यशस्वी होतील तुटलेली नातीगोती पुन्हा जुळतील.
तूळ
चतुर्थात महत्त्वाच्या चार ग्रहांचे वास्तव्य कौटुंबिक जीवनात महत्त्वाचे फेरफार घडवील. वास्तु विषयक समस्या मिटतील. हाती घेतलेले कोणतेही काम यशस्वी करून दाखवाल. नोकरी-व्यवसायात आनंदी घटना. पण अष्टमातील राहूकडे दुर्लक्ष करू नका. अचानक दुर्घटना, मानहानी, आर्थिक समस्या, शत्रुपीडा यासह अनेक बाबतीत हा राहू काही ना काही अडचणी निर्माण करेल पण सावध राहिल्यास त्याचा काहीही त्रास होणार नाही कोणते काम सावधानतेने करा.
वृश्चिक.
कामातील निरुत्साह कमी होईल मानसिक उत्साह वाढेल नोकरी उद्योगासाठी नवीन कल्पना लढविल्याने अनेक ऑफर्स येतील. काही अनाकलनीय महत्त्वाच्या गोष्टींचे मर्म समजेल त्यातून नवीन काहीतरी निर्माण होईल आर्थिक समस्या मि टतील जे काम हाती घ्याल ते पूर्ण करू शकाल पण राशीतील केतू आणि सप्तमातील राहू ऐनवेळी काहीतरी समस्या निर्माण करतील त्यामुळे प्रसंगानुरुप कसे वागावे हे ठरवून त्याप्रमाणे कामे करा या राहुमुळे बाधित ठिकाणे फार वाईट बाधतात त्यासाठी अशा जागा टाळण्याचे प्रयत्न करा नोकरी-व्यवसायात काही घोटाळे आढळल्यास हाताखालच्या कर्मचाऱयावर विशेष लक्ष ठेवा.
धनु
धनस्थानी चार ग्रहांची भाऊगर्दी आहे मोठय़ा प्रमाणात धनलाभ, मान्। सन्मान व अंगीकृत कार्यात यश असे याचे फळ आहे एखाद न होणारे काम सुद्धा होऊन जाईल राशीच्या षडाष्टकतील राहुमुळे आर्थिक समस्या मिटतील. कळत नकळत निर्माण झालेले गैरसमज निवळण्यास मदत होईल बँकिंग व्यवहार करताना जर काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यास हा काळ योग्य आहे कौटुंबिक जीवनात काही अनोळखी लोक हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतील अशांना अजिबात जवळ करू नका.
मकर
बुध शनिसह पाच ग्रह तुमच्या राशीत असल्याने कामाचा उरक वाढेल एकाच वेळी अनेक कामे हातावेगळी करण्याचा प्रयत्न कराल त्याचबरोबर मालक वर्ग कुटुंबातील नातेवाईक व मित्रमंडळी यांची मनेही सांभाळावी लागतील तुम्ही कष्टाळू असला तरी काम सुलभ नसते याचा अनुभव येईल कुटुंबातील काही सदस्यांची वागणूक जरा त्रासदायक वातावरण निर्माण करील त्यासाठी पाहुण्यांसमोर कोणत्याही चुका दिसणार नाहीत याची काळजी घ्या.
कुंभ
बाराव्या स्थानी बुध शनि सह चारग्रह हा योग अडचणी निर्माण करणार आहे त्यातही तुमचे काम जर बँका, लिखाण, कोर्टाची कागदपत्रे यांच्याशी संबंधित असतील तर तुम्ही सावध होणे आवश्यक आहे दैनंदिन व्यवहारात फारसा त्रास होणार नाही पण तरीही संक्रांतीनंतर सावध राहावे लागेल जवळच एखादा मित्र नातेवाईक कुठेतरी दगाफटका करण्याची दाट शक्मयता. नोकरी व्यवसायातदेखील म्हणावे तसे अनुकूल वातावरण नाही पण देवी आराधना चालू असेल तर कोणतीही संकटे आली तरी त्यातून निर्विघ्नपणे पार पडाल.
मीन
लाभस्थानी महत्त्वाची ग्रहस्थिती सर्व कामात यश मिळवून देईल मित्रमंडळी उत्तम सहकार्य करतील पत्रव्यवहार महत्वाचे वाटाघाटी यात अपेक्षेपेक्षा अधिक चांगले यश मिळेल मानसिक संतुलन चांगले राहील. मुलेबाळे व नातेवाईक यांच्या काही समस्या तुमच्यामुळे मिटतील. राहुचे चलन एक बाबतीत शुभ फलदायक आहे पण केतूचा राग मात्र काहीतरी समस्या निर्माण करेल. त्यासाठी महत्त्वाचे निर्णय जपूनच घ्या. पाण्याची टाकी, वाहन, सोलर सिस्टिम किंवा घराची दुरुस्ती यासाठी अचानक मोठा खर्च निघेल. त्यासाठी वेळही काढावा लागेल. अति वाचन. टीव्ही किंवा संगणकासमोर अधिक वेळ बसणाऱयानी पित्त विकारापासून जपावे.





