मेष
संततीच्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल काळ आहे. याकरता थोडा बहुत खर्चही करावा लागला तरी मागे पुढे पाहू नका. पूर्वी केलेल्या चांगल्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे, पण हे पैसे खर्च न करता पुन्हा गुंतवण्याकडे लक्ष द्या. घरातील जेष्ठ स्त्राrचा सल्ला उपयोगाला येईल. मन विचलित होऊ शकते.
उपाय – शंखातील पाणी प्राशन करा.
वृषभ
रोजच्या आयुष्यातील संघर्षाला एखाद्या चांगल्या व्यक्तीची साथ मिळाल्यामुळे यश मिळणे सोपे जाईल. घरातील स्त्राr वर्ग पिकनिकला किंवा पाण्याच्या ठिकाणी सहलीला जाण्याचा आग्रह करेल आणि तुम्हाला जावे लागेल. कागदोपत्री व्यवहारात यश मिळेल, त्यात सरकार दरबारी काम करणाऱ्या व्यक्तीची मदत मिळू शकते.
उपाय- शालेय वस्तू दान करा
मिथुन
येणाऱ्या काळाचा उपयोग आपल्या आरोग्याला सुधारण्याकरता कराल तर त्यात नक्कीच यश मिळेल. काही वाईट सवयी सोडण्याचा विचार करत असाल तर उत्तम कालावधी आहे. सरकारी कामांमध्ये चांगली यशप्राप्ती होऊ शकते. अधिकार असलेल्या व्यक्तीशी वादविवाद घालणे महागात पडू शकते.
उपाय – चांदीच्या भांड्यातून पाणी प्यावे.
कर्क
आपलेही लक्झरी पूर्ण आयुष्य असावे असे वाटेल. काही लोकांबद्दल असूया वाढू शकते. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमुळे धनप्राप्तीचे योग आहेत. सरकारी कामांमध्ये दुसऱ्याची मदत घ्यावी लागू शकते. व्यापारी वर्गाला संमिश्र काळ असेल. जमिनीच्याबाबतीत घाई गडबड करणे अपयशाला आमंत्रण देण्यासारखे होईल.
उपाय- बतासे दान द्यावे
सिंह
जो काही निर्णय घ्याल तो अत्यंत सावधानतेने आणि सगळ्या बाजूने विचार करून घ्याल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांवर चांगल्या प्रकारे पडेल. इतर लोकांशी अधिकारवाणीने बोलण्यामुळे तुमचा दबदबा वाढेल. कुटुंबातील कलह त्रासाला कारणीभूत ठरू शकतो. एखाद्या ठिकाणी पैसे अडकल्यास इतर व्यक्तीची मदत घ्यावी.
उपाय – आवळे दान द्यावे
कन्या
तुमचा मूळचा स्वभाव जरी सौम्य असला तरी या काळात एक घाव दोन तुकडे या प्रकारचे विचार मनातील किंवा स्वभावामध्ये उग्रता येईल. वैवाहिक जोडीदाराला याचा त्रास होऊ शकतो. धनप्राप्तीकरता थोडा संघर्ष करावा लागेल. व्यापारी वर्गाला कॉम्पिटिशनचा सामना करावा लागेल. तब्येत अचानक बिघडण्याची शक्यता आहे.
उपाय- तुळशीचे पान जवळ ठेवा
तूळ
मन चंचल होईल. कोणताही निर्णय घेताना चलबिचल होण्याची शक्यता आहे. कित्येक बाबतीमध्ये निराशाजनक विचार मनात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शारीरिक पीडा लवकरच संपेल. विनाकारण पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. बेकायदेशीर कोणतेही काम करू नका महागात पडेल.
उपाय शुभ्र वस्त्र जवळ ठेवावे.
वृश्चिक
समाजामध्ये धाक असलेल्या किंवा दबदबा असलेल्या व्यक्तींची ओळख होईल आणि जवळीक वाढेल. मित्रपरिवारामध्ये गैरसमजामुळे वाद होऊ शकतो. ज्येष्ठ बंधू किंवा भगिनीला शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे. व्यवसाय का नाही एखादी ऑर्डर कॅन्सल झाल्यामुळे नुकसान होऊ शकते. गुप्त शत्रु परास्त होतील.
उपाय – चंदनाचे अत्तर लावावे.
धनु
सध्याचा काळ संततीच्या बाबतीत चिंतेचा ठरू शकतो. विद्याभ्यास करणाऱ्या लोकांना परिश्रम जास्त घेण्याची गरज आहे, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडू नये. अचानक धनलाभाची शक्यता आहे. कुटुंबीयांना घेऊन एखाद्या धार्मिक तीर्थक्षेत्राला भेट देण्याचा विचार कराल. व्यवसाय धंदा उत्तम फळ देईल.
उपाय – खिशात हळदीची गाठ ठेवावी.
मकर
या काळात तुमचे सगळे लक्ष तुमच्या कुटुंबीयांकडे आणि धनप्राप्तीकडे असेल. कोणतीही संधी वाया जाऊ नये याकरता शर्थीचे प्रयत्न कराल. लहान भावंडांमुळे किंवा कागदोपत्री व्यवहारामुळे चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. एखादी व्यक्ती तुमचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
उपाय- वाहत्या पाण्यात नाणे टाका.
कुंभ
लहान भावंडांच्या दृष्टीने थोडा कष्टदायक काळ असेल. कोणत्याही कागदपत्रावर सही करत असताना सावध राहणे गरजेचे आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबर लहान-सहान कारणाकरता वाद घालू नका उलट त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत गाडी चालवत असताना सावध रहावे.
उपाय शनिवारी पहाटे पिंपळाला पाणी घालावे.
मीन
धनप्राप्ती उत्तम असेल पण ही धनप्राप्ती गैरमार्गाने होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातील एखादी व्यक्ती प्रवासाला जाऊ शकते किंवा व्यवसायानिमित्त इतर ठिकाणी शिफ्ट होण्याचा विचार करू शकते. प्रेमसंबंध वृद्धिंगत होतील. आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर मोठ्यातल्या मोठ्या शत्रूला पराजित कराल.
उपाय- गुरुवारी गुरुदर्शन घ्यावे.





