मेष
तब्येत चांगली रहावी म्हणून विशेष प्रयत्न करावे लागतील. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करून चालणार नाही. जेष्ठ व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. काही प्रॉब्लेम असतील तर घरातील सदस्यांनी समजूतदारपणे एकत्रित येऊन त्यावर उपाय शोधावा. . पैसे कमावण्याच्या नवीन संधी प्राप्त होतील.
काळे वस्त्र दान द्यावे
वृषभ
काही महत्त्वाच्या कामांना विलंब लागू शकतो. या आठवड्यात अति टेन्शन घेण्याने तब्येतीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे शक्मयतो शांत राहण्याचा प्रयत्न करावा. कुटुंबातील सदस्यांबरोबर एखाद्या धार्मिक स्थळी भेट देऊ शकता. आर्थिक दृष्ट्या हा काळ सर्वसामान्य असेल. प्रवास करत असताना थोडा विलंब होण्याची शक्मयता आहे.
लोकरी चा तुकडा जवळ ठेवा
मिथुन
बाहेरचे खाणे शक्मयतो टाळलेले बरे. तब्येतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. कौटुंबिक समाधानाच्या दृष्टीने हा काळ चांगला असेल. लहान सहान कारणावरून होणारी वादावादी टाळू शकता. आर्थिक दृष्ट्या हा काळ सर्वसामान्य असेल. प्लॉट किंवा फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर योग्य काळ आहे.
हकीक खडा जवळ ठेवावा
कर्क
दुसऱ्याला आर्थिक मदत करत असताना आपले नुकसान होणार नाही त्याचबरोबर समोरची व्यक्ती दगा देणार नाही याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. घरातील जेष्ठ व्यक्तीमुळे आर्थिक चणचण कमी होईल. ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांनी आपल्या प्रेझेंटेशन कडे लक्ष देणे गरजेचे असेल.
उजव्या हाताच्या मनगटा वर पिवळा आणि लाल धागा बांधावा
सिंह
शरीराच्या उजव्या बाजूला मार लागण्याची शक्मयता आहे त्यामुळे सावध राहणे गरजेचे असेल. ऑफिसमध्ये कामाचे अति टेन्शन आले तर सिरसलामत तो पगडी पचास हे लक्षात ठेवा आणि स्वत:ला सांभाळा. एकंदरीत कौटुंबिक वातावरण चांगले असेल. घरातील लोकांना घेऊन मंगल कार्याकरता बाहेरगावी जाऊ शकता.
ताक दान द्या
कन्या
पाठ दुखी किंवा सांधेदुखी यासारखे दुखणे सहन करावे लागू शकते. या आठवड्यात पायांना इजा होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. तुमचा मूड काहीसा रिलॅक्स असेल. कामांना व्यवस्थित नियोजन करून पार पाडण्याचा प्रयत्न कराल. गुंतवणूक करण्याकरता सध्याचा काळ अनुकूल नाही.
गायी च्या उजव्या पाया खालील माती जवळ ठेवा
तूळ
तब्येतीला झेपेल इतकेच काम करावे. घरातील एखाद्या सदस्याच्या तब्येतीविषयी काळजी वाटू शकते.कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला कामी येईल. तुमच्यामुळे कुटुंबातील व्यक्तींच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. . पैसा मिळवण्यापेक्षा पैसा कसा टिकेल याकडे लक्ष देणे गरजेचे असेल.
गरजू व्यक्तीला अन्न दान करा
वृश्चिक
पोटासंबंधी विकार त्रास देऊ शकतात पण या आठवड्यात मन प्रसन्न असेल. कौटुंबिक समाधानाच्या दृष्टीने हा काळ चांगला असेल. पैसे कमावण्याच्या नवीन संधी प्राप्त होतील.पार्टनरशिप मध्ये नवीन बिजनेस सुऊ करण्याचा विचार करत असाल तर कागदोपत्री व्यवहार व्यवस्थित करून मगच पुढचे पाऊल टाका.
तुरटी जवळ ठेवा
धनु
तब्येतीची विशेष काळजी करण्याचे काही कारण नाही पण तब्येतीला झेपेल इतकेच काम करावे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य प्राप्त झाल्याने काही कामे लवकर पूर्ण होतील. पैशांची गुंतवणूक करत असताना पुढचा विचार करणे आवश्यक असेल. या काळात कोणाकडेही आर्थिक मदत मागण्याचे धाडस करू नका.
औषधे दान द्या
मकर
तिखट किंवा मसालेदार खाण्यामुळे तब्येत बिघडू शकते. बाहेरचे खाणे शक्मयतो टाळलेले बरे. तुमच्या निर्णयामुळे घरातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण असेल. . नोकरदार वर्गाने वाढीव पगाराची अपेक्षा करायला हरकत नाही. . ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांनी आपल्या प्रेझेंटेशन कडे लक्ष देणे गरजेचे असेल.
निर्माल्य जवळ ठेवावे
कुंभ
आरोग्याचा पाया मजबूत असेल पण निष्काळजीपणा करून चालणार नाही. काम करण्याचा जोश वाढेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या वास्तव हट्ट पुरवावा लागेल. पैशांचा बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास करून चालणार नाही. आर्थिक बाबतीत एखादी चांगली बातमी कळण्याची शक्मयता आहे.
धार्मीक पुस्तके दान द्या
मीन
या आठवड्यात पायांना इजा होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. एकंदरीत कौटुंबिक वातावरण चांगले असेल. नवीन दाग दागिने घेण्याचे योग्य होत आहेत. भावंडांची योग्य वेळी साथ मिळाल्याने अवघड कामे पूर्ण होतील. विद्यार्थी वर्गाला ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो.
निर्जन ठिकाणी जमिनीत मध गाडा.
महिलांनी गरोदरपणात करायचा उपाय. गरोदर राहिल्यानंतर आपल्या उजव्या हाताच्या दंडात आपल्या पूर्ण हाताच्या लांबीचा लाल दोरा बांधावा. मूल झाल्यानंतर बाळाच्या कमरेमध्ये हाच दोरा बांधावा आणि आपल्या हातामध्ये नवा लाल दोरा बांधावा. 18 महिन्यापर्यंत दोरे काढू नयेत. तुटले तर बदलत राहावे





