दि. 26. 2. 2023 ते 4.3.2023 पर्यंत
मेष
आठवडय़ाची सुरुवात सर्वसामान्य असली तरी मध्याला आशादायक वातावरण तयार होईल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठीने मन प्रफुल्लित होईल. एकंदर या आठवडय़ामध्ये बऱयाच लोकांना भेटावे लागणार आहे. तब्येतीच्या दृष्टीने विशेष काळजी करण्याचे कारण नाही. या काळात तुमच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल संभवतो. कामाच्या ठिकाणी काही कामांमध्ये इतरांची मदत लागली तर ती बिनधास्त मागावी.
डाव्या अंगठय़ाच्या खाली निळय़ा शाईने 51 लिहा
वृषभ
हा आठवडा चांगल्या वाईट अनुभवांना दुर्लक्षित न करता नवीन काहीतरी शिकण्याकरता उत्तम असेल. काही मित्रांकडून किंवा जवळच्या लोकांकडून अपेक्षा भंग होऊ शकतो. आर्थिक गरजा वाढल्यामुळे नवीन कमाईबद्दल विचार करावा लागेल. आरोग्याच्या दृष्टीने या आठवडय़ात काळजीपूर्वक राहिलेले बरे. वैवाहिक जीवनामध्ये आपल्या पार्टनरच्या भावनांचा विचार केल्यास कटू घटना टाळता येतील.
सरकारी जमिनीवरील 5 झाडांना पाणी घालावे
मिथुन
हा आठवडा चांगला जाईल. ज्ये÷ व्यक्तीचा सल्ला कमी लेखू नका, भविष्यात त्याचा उचित फायदा होण्याची शक्मयता आहे. तुमच्या आसपासच्या लोकांमध्ये सामंजस्य कमी होत आहे असे वाटण्याची शक्मयता आहे. घरातील वातावरण पाठिंब्याचे असेल. कामाच्या ठिकाणी वेग वाढवल्यास कामे वेळेवर पूर्ण होतील, याकरता एकमेकाला मदत करणे गरजेचे आहे. तब्येत ठीकठाक असेल. वैवाहिक जोडीदाराला मदत करावी लागेल.
छोटय़ा मातीच्या भांडय़ात मध भरून ठेवावा
कर्क
या आठवडय़ात भावनांपेक्षा बुद्धीला जास्त महत्त्व द्या. तुम्ही घेतलेल्या निर्णयांचे परिणाम दूरवर होण्याची शक्मयता आहे. कौटुंबिक वातावरण हळवे असेल. चहुबाजूनी एक प्रकारचा तणाव येत आहे असे जाणून टेन्शन येण्याची शक्मयता आहे. पण अशाही परिस्थितीत घाबरण्याचे कोणतेही कारण नाही हे लक्षात ठेवा. धनप्राप्तीकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. व्यावसायिकांना व्यापारात तेजी अनुभवायला मिळेल.
हळदीचे पाणी पिंपळाला घालावे
सिंह
ऑफिसमध्ये वातावरण थोडे तणावपूर्ण असेल. दुसऱयांनी केलेल्या चुकांचे खापर तुमच्या डोक्मयावर फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे आपले काम चूक असेल आणि ते दुसऱयांच्या नजरेत येईल याची काळजी घेणे गरजेचे आहे. नवीन एखादी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर योग्य वेळ आहे. लेखी व्यवहारात सावध राहिल्यास फायदा होईल.
लाल रुमाल जवळ ठेवावा
कन्या
घरी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते किंवा न सांगता एखादी व्यक्ती घरी येऊ शकते जिच्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचा योग्य परतावा तुम्हाला प्राप्त होईल. या आठवडय़ात काही संधी अशा प्राप्त होतील ज्यामुळे भविष्यातील काही योजना प्रत्यक्षात आणू शकाल. वैवाहिक जोडीदार सरप्राईज गिफ्ट देईल ज्यामुळे खुश व्हाल. तब्येत सुधारण्याकरता प्रयत्न करण्यासाठी योग्य वेळ आहे.
हिरवी काचेची गोटी जवळ ठेवावी
तूळ
आठवडा धार्मिक किंवा आध्यात्मिक कामाकरता उत्तम असेल. कलाकारांना आणि खेळाडूंना या काळात उत्तम संधी प्राप्त होण्याची शक्मयता आहे. एखाद्या व्यक्तीशी पूर्वी भांडण झाले होते अशा व्यक्तीकडून आश्चर्यजनकरित्या मदत प्राप्त होऊ शकते. जुन्या मित्रांची भेट होईल. आठवडय़ाच्या मध्यानंतर कामांचा व्याप वाढण्याची शक्मयता आहे त्यामुळे पूर्वनियोजन गरजेचे असेल. समाजामध्ये चांगले नाव होईल.
लहान मुलांना आंबट गोड मिठाई वाटावी
वृश्चिक
शारीरिक आणि मानसिक लाभ होण्याकरता विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. याकरता ध्यान आणि योगासनांची मदत घेऊ शकता. ज्ये÷ व्यक्तीचा सल्ला ऐकला आणि ज्ये÷ांना मान देऊन कामे केली तर आर्थिक लाभ उत्तम होईल. घरातील एखाद्या सदस्याच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो. या काळात प्रवास घडण्याची शक्मयताही आहे. कामाकरता प्रवास करत असाल तर कागदपत्रांची विशेष काळजी घ्या, हरवू शकतात.
जलचरांना खाद्य घालावे
धनु
शिक्षणक्षेत्रामध्ये काम करणाऱया लोकांना उत्तम संधी प्राप्त होतील. व्यावसायिकांना थोडे असमाधान वाटण्याची शक्मयता आहे. विद्यार्थी वर्गाला यश प्राप्तीकरता कठोर परिश्रम घ्यावे लागतील. या काळात स्वतःकरता वेळ काढणे गरजेचे असेल नाहीतर मानसिक तणाव येऊ शकतो. आपल्या छंदांकडे किंवा आवडींकडे लक्ष द्या त्यामुळे तणाव कमी होईल. संतान पक्षाकडून काहीशी निराशा प्राप्त होऊ शकते.
बाळ लोकरीचा छोटा तुकडा जवळ ठेवावा
मकर
आजूबाजूच्या लोकांसोबत असलेले तुमचे संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. या आठवडय़ात सुरुवातीलाच कामांचा व्याप जास्त असेल. आठवडय़ाच्या मध्याला एखादी चांगली बातमी कळल्यामुळे मन प्रफुल्लित होऊ शकते. कामांचे नियोजन करत असताना इतर व्यक्तींचा सल्ला घेणे गरजेचे असेल. वैवाहिक जोडीदाराला त्याच्या ऑफिसच्या कामामध्ये तुमची मदत लागेल. व्यावसायिकांना अनुकूल वेळ आहे.
दिवसाची सुरुवात गुळ खाऊन करावी
कुंभ
ज्ञान पुष्कळ आहे पण इतरांना त्याचा फायदा जास्त होतो आणि तुम्हाला हाती काहीच लागत नाही किंवा कमी फायदा होतो अशा प्रकारचा अनुभव या आठवडय़ात येऊ शकतो. या आठवडय़ात निर्णय घेताना बऱयाच गोष्टींचा विचार करणे आवश्यक असेल. काही वेळेला गोंधळ होण्याची शक्मयताही नाकारता येत नाही. कुठला निर्णय बरोबर आणि कुठला चूक याचा निर्णय स्वतः घ्यावा,
केळीच्या झाडाला पाणी घालावे
मीन
या आठवडय़ात धावपळ वाढणार आहे. कामांचा व्याप वाढल्याने तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. पण घाई गडबडीने केलेल्या कामांमध्ये चूक होऊ शकते याचा विसर पडू देऊ नये. सोबत काम करणाऱया लोकांवर विश्वास ठेवणे घातक ठरू शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याने घेतलेला निर्णय पटेलच असे सांगता येत नाही. अशावेळी अविश्वास न दाखवता सपोर्ट देणे गरजेचे असेल. कामकाजासंबंधी गोष्टी गुप्त ठेवलेल्या बऱया.
पिवळी फुले पाण्यात सोडावी.
मध्यमवर्गीय माणसाला कोणताही खर्च करत असताना खूपदा विचार करावा लागतो. कारण पैशाची कमतरता असू शकते. आपल्याकडे कायम पैसा टिकावा आणि उद्योग धंद्यात बरकत यावी यासाठी चांदीची छोटी गोळी आणि शुद्ध केशराच्या काडय़ा पिवळय़ा चमकदार कापडात बांधून जवळ ठेवा.





