होरा आणि होळी!!
16.03.2022
नमस्कार आता बघूया कोणत्या होऱयात कोणती कामे केली की यश मिळते. रवी- औषध घेणे, सरकारी कामे, नवा व्यवसाय चालू करणे, चंद्र- सगळी कामे. मंगळ- दावा ठोकणे, वाद घालणे, बुध- पत्रव्यवहार, मेल, फोन, नोकरी, गुरु- अभ्यास करणे, विवाह, प्रपोज,पूजा, शुक्र- प्रणय, अलंकार घालणे, व्यापार, जमिनीचे व्यवहार, शनि- एफडी, गृहप्रवेश, लोखंडी वस्तू घेणे, म्हणजेच मंगळ आणि शनि हे क्रूर होरे आहेत. क्रूर कामाकरता आणि बाकीचे शुभ आहेत.
| वेळ | सोमवार | मंगळवार | बुधवार | गुरुवार | शुक्रवार | शनिवार | रविवार |
| स.6 ते 7 | चंद्र | मंगळ | बुध | गुरु | शुक्र | शनि | रवि |
| 7-8 | शनि | रवि | चंद्र | मंगळ | बुध | गुरु | शुक्र |
| 8-9 | गुरु | शुक्र | शनि | रवी | चंद्र | मंगळ | बुध |
| 9-10 | मंगळ | बुध | गुरु | शुक्र | शनी | रवि | चंद्र |
| 10-11 | रवी | चंद्र | मंगळ | बुध | गुरु | शुक्र | शनि |
| 11-12 | शुक्र | शनी | रवी | चंद्र | मंगळ | बुध | गुरु |
| दु.12-1 | बुध | गुरु | शुक्र | शनी | रवी | चंद्र | मंगळ |
| 1-2 | चंद्र | मंगळ | बुध | गुरु | शुक्र | शनी | रवी |
| 2-3 | शनी | रवी | चंद्र | मंगळ | बुध | गुरु | शुक्र |
| 3-4 | गुरु | शुक्र | शनि | रवी | चंद्र | मंगळ | बुध |
| 4-5 | मंगळ | बुध | गुरु | शुक्र | शनी | रवी | चंद्र |
| 5-6 | रवी | चंद्र | मंगळ | बुध | गुरु | शुक्र | शनी |
| 6-7 | शुक्र | शनी | रवी | चंद्र | मंगळ | बुध | गुरु |
| 7-8 | बुध | गुरु | शुक्र | शनि | रवी | चंद्र | मंगळ |
(सूर्योदय 6 वा. धरलाय. तुमच्या गावचा सूर्योदय पाहून गणित करावे.)
होळीची विशेष माहितीः पौर्णिमा 17-03-2022 होल्याष्टक (अष्टमी ते पौर्णिमा) 10-03-2022 ते 17-03-2022 सगळय़ा मंगल कामाकरता वर्ज्य. होलिका दहन मुहूर्त – रात्रौ 09.06 ते 10.16 आणि 01.12 ते पहाटे 3.00
काय करू नयेः 1. नववधूने माहेरी जाऊ नये. 2. नवदांपत्याने होळीची पूजा पाहू वा करू नये. 3. पांढऱया रंगाची वस्त्रे घालू नये. 4. उधारी घेऊ/देऊ नये. 5. रस्त्यावर पडलेली वस्तू उचलू नये.
विशेष विनंतीः वृक्षतोड करण्यापेक्षा शेण्यांची होळी करूया. मानव जातीवर आणि पर्यावरणावर उपकार करूया.
महाउपाय- घराण्यातील सगळय़ा प्रकारचे दोष जाण्याकरता दर अमावस्येला केळीच्या पानावर वरणभात, तूप घालून दु.12.30 ते 1.30 मध्ये जलचर असलेल्या पाण्याच्या ठिकाणी सोडावा.
सोपी वास्तू टीप- घराची उत्तर दिशा हलकी ठेवावी. जड वस्तू ठेऊ नये.
मेष
कोणताही धाडशी निर्णय घेण्याआधी पूर्ण विचार करा. घरातील लहान सहान भांडणांमुळे नाराज व्हाल. तीर्थयात्रा किंवा छोटय़ा प्रवासाचा योग आहे. भावंडांची मदत कराल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. प्रेमप्रकरणात फसवणूक संभवते. वैवाहिक जीवनात आनंद असेल. भाग्याची साथ आहे. उपायः मंगळवारी 3 कवडय़ा लाल कापडात बांधून जवळ ठेवा.
वृषभ
धनप्राप्ती उत्तम राहील. बँकेचे व्यवहार पूर्ण होतील. कुटुंबियांची साथ लाभेल. तब्येतीची काळजी घ्या. बाहेरच्या खाण्यामुळे तब्येत बिघडेल. वाहन किंवा जमिनीचे व्यवहार टाळा. मुलांची काळजी वाटेल. नोकरीत लाभ होईल. शत्रू त्रास आहे. जोडीदाराची साथ मिळेल. वाहन जपून चालवा. मित्रांमुळे द्रव्यहानी. उपायः कपिला गाईची सेवा करा.
मिथुन
तब्येत सुधारेल. पैसा साठवण्याकडे कल राहील. नातेवाईकांची भेट होईल. शेजाऱयांकडून त्रास संभवतो. भावंडांशी मतभेद होतील. जुन्या गुंतवणूकीतून फायदा होईल. प्रेमीजनांना आनंदाचा काळ आहे. गुप्तशत्रूंच्या कारवाया वाढत आहेत. सावध रहा. नोकरीत कौतुक होईल. वैवाहिक जीवन आनंदी असेल. उपायः गाईच्या खुराखालील माती जवळ ठेवा.
कर्क
कुटुंबातील वाद बाहेर जाऊ देऊ नका. धनप्राप्तीकरता जास्त कष्ट करावे लागतील. जमीन खरेदी किंवा विक्रीसाठी प्रयत्न करत असाल तर यश मिळैल. शेअर्समध्ये लाभाची शक्मयता आहे. प्रेमसंबंधात आनंद असेल. नोकरदारांची सुसंधी मिळेल. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. उपायः शिवमंदिरात तुपाचा दिवा लावा.
सिंह
तब्येतीची काळजी घेणे अति आवश्यक आहे. कामानिमित्त प्रवास घडेल. आईचा सल्ला फायदेशीर ठरेल. छोटय़ा गुंतवणुकीतून लाभ होईल. प्रेमीजन आनंदी असतील. नोकरीत जबाबदारी वाढेल. वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात. शत्रुंमुळे नाव खराब होण्याची शक्मयता आहे. अनावश्यक खर्च टाळा. उपायः नवग्रह मंदिरात 9 प्रदक्षिणा घाला.
कन्या
धनप्राप्ती उत्तम राहील. नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. कुटुंबीयांसोबत छोटी सहल घडू शकते. वाहन खरेदीचे योग आहेत. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरीत वरिष्ठची बोलणी खावी लागू शकतात. व्यवसायात प्रगती होईल. उपायः वृद्ध व्यक्तीला आर्थिक मदत करा.
तुळ
आरोग्याच्या तक्रारींपासून मुक्तता मिळेल. धनप्राप्तीचे उत्तम योग आहेत. कौटुंबिक बाबतीत समाधानी असाल. प्रवासाचे उत्तम योग आहेत. कागदोपत्री व्यवहारात यश मिळेल. जमिनीच्या व्यवहारात घाई करू नका. शेअर्समध्ये गुंतवणूक नुकसानदायक ठरू शकते. नोकरीत वरिष्ठचा त्रास होईल. धार्मिक कार्य घडेल. उपायः बाजारासारख्या ठिकाणी पाण्याची सोय करा.
वृश्चिक
प्रकृती उत्तम राहील. उत्साहवर्धक घटना घडतील. अडकलेले पैसे परत मिळतील. धनप्राप्ती उत्तम असेल. भावाचे सहकार्य मिळेल. आईच्या तब्येतीची काळजी वाटेल. धोकादायक गुंतवणूक टाळा. नोकरदारांना जास्त काम लागेल. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात. अपघातापासून सावध रहा. खर्च वाढणार आहे. उपायः गुरुवारी सकाळी नवग्रह मंदिरात तुपाचा दिवा लावा.
धनु
पैशांची आवक वाढल्याने खूष रहाल. कामाच्या ठिकाणी वाद संभवतो. प्रवासात नुकसान होईल. नोकरदार वर्गाने कामा व्यतिरिक्त इतर चर्चा टाळाव्या. शेअर्समध्ये गुंतवणूक टाळा. वैवाहिक जीवनात आनंदाचे प्रसंग येतील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. वडिलांसंबंधी चिंता वाटेल. कष्टाचे प्रमाण वाढवा. उपायः मोहरीचे तेल लावलेली चपाती कुत्र्याला खाऊ घाला.
मकर
आरोग्याची चिंता मिटेल. इच्छापूर्तीचा आनंद प्राप्त होईल. धनप्राप्ती करता विशेष प्रयत्न करावे लागतील. याच संबंधी वादावाद होऊ शकते. घरातील वातावरण शांत ठेवायचा प्रयत्न करा. लिखीत व्यवहारात सावध रहा. प्रवास टाळा. नोकरीत प्रमोशनचे योग आहेत. वैवाहिक जीवनात समाधान राहील. उपायः झोपताना उशीखाली नाणे ठेऊन दुसरे दिवशी स्मशानात टाका.
कुंभ
तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कौटुंबिक भांडणांमुळे मनस्ताप होईल. घरातील एका सदस्याच्या वागण्यामुळे चिडचिड होऊ शकते. छोटय़ा गुंतवणुकीतून फायदा होईल. प्रेमसंबंधात वृद्धी होईल. नोकरदारांना अनुकूल वेळ आहे. वैवाहिक जीवनात तणाव असेल. उपायः चांदीच्या भांडय़ातून पाणी प्या.
मीन
आरोग्य सांभाळावे लागेल. उधार दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी जास्त मेहेनत करावी लागेल. यातून वादावाद संभवते. प्रवास टाळा. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. प्रेम संबंधात वाढ होईल. शेअर्समध्ये लाभ होईल. देवदर्शनासाठी प्रवासाचे योग. मानसन्मानात वाढ होईल. उपायः तांबडय़ा गाईला चारा घाला.





