पंचमहाभूताविषयी कायम कृतज्ञ राहा, भाग्य उजळेल!
मनुष्य प्राण्यासह संपूर्ण जग हे पंचमहाभूतांच्या सहकार्याने निर्माण झालेले आहे. त्यांच्याविषयी आदर, कृतज्ञता म्हणजे भाग्योदयाकडे वाटचाल तर त्यांच्याविषयी अनादर किंवा अपमान म्हणजे अवनतीला आमंत्रण. येत्या 23 जुलैरोजी गुरुपौर्णिमा आणि व्यासपूजन आहे. केवळ गुरुच नव्हे तर सर्व पंचमहाभूतांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस! केवळ आपल्या गुरुचे पूजन म्हणजे व्यास पूजन झाले असे नव्हे, जीवनात घडोघडी अनेक माणसे भेटत असतात. काही जणांच्या सहकार्याने भाग्य उजळते तर काहीजण रसातळाला पोचवितात. ज्यांच्यामुळे आपली संकटे दूर होतात. ती व्यक्ती लहान-थोर, गरीब-श्रीमंत, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन यापैकी कोणत्याही वर्गवारीतील असो, त्यांच्याविषयी सतत कृतज्ञ राहा. कारण संकटे सांगून येत नसतात. कोणत्याही संकटात ऐनवेळी देवासारखे उभे राहून तुमचे संकट निवारण करणारेही असतात. त्यांना कधीही विसरू नका. अग्नी, पाणी, वायू, आकाश, भूमी ही पंचमहाभूते आहेत. यांच्या पलीकडे काहीही नाही. त्यांच्या मान ठेवलात तर भाग्य उजळायला वेळ लागत नाही, पण त्यांचा अपमान झाल्यास त्या पंचमहाभूतांपैकी कोणते तरी तत्व जीवाला घातक ठरू शकते. अनेक जण काडी पेटवून गॅस चूल, बिडी, सिगारेट पेटवून उरलेली काडी पायाने चिरडतात, आगीमध्ये नको ते पदार्थ टाकत असतात. अशुद्ध अवस्थेत दिव्याला स्पर्श करतात, अनेक जण नदी, तलाव, सरोवरे, धबधबे, समुद्र यासारख्या ठिकाणी मनोरंजनासाठी जात असतात व तेथे दंगामस्ती करतात, पण त्या पाण्याला कधीही नमस्कार करीत नाहीत. काही कारखान्यांची धुराडी वायूप्रदूषण करीत असतात तर काहीजण केमिकल अथवा तत्सम प्रयोग करून वायूप्रदूषण करीत असतात. कोरोना त्याचे उत्तम उदाहरण आहे. बस, रेल्वे अथवा विमानातून उतरल्यावर लोक भूमीला स्पर्श करून नमस्कार करण्याऐवजी प्रथम तेथे घाण करतात. अशा कळत-नकळत घडलेल्या चुकांमुळे पंचमहाभूतांचा अपमान होतो. त्यामुळे अग्निप्रलय, ज्वालामुखी उदेक, पाण्यात बुडणे, भूकंप होणे आणि प्राणवायुच्या प्रकोपाने जिवावरचे प्रसंग येणे असे प्रकार घडतात. पंचमहाभूतांची कृपा झाली तर काय होते आणि त्यांच्या कोप झाल्यास काय होते, यावर बरेच काही लिहिता येण्यासारखे आहे. येत्या गुरुपौर्णिमेला अग्नी, पाणी, वीज, भूमी, आकाश, वायु या पंचमहाभूतांचे स्मरण करून त्यांना नमस्कार करावा. शक्मय झाल्यास त्या सर्वांचे मंत्र 11 वेळा म्हणावेत आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. पंचमहाभूतांचे पूजन म्हणजे सर्व देव देवतांचे स्मरण हे लक्षात ठेवावे. रोज सकाळी आणि रात्री झोपतेवेळी पंचमहाभूतांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्यामुळे बरीच संकटे कमी होतात असे अनुभव आहेत. प्रत्येक गावात मंत्र जाणणारी अनेक मंडळी असतात. त्यांच्याकडून अग्नि, पाणी, भूमी, आकाश, वायु या पंचमहाभूतांचे मंत्र घ्यावेत आणि रोज त्याचे पठण करावे. एक वर्षभर हा उपाय करून पहा. तुमचे संपूर्ण जीवनच बदलून जाईल.
मेष
नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या शोधात असाल तर तसेच आर्थिक अडचणी असतील तर खालील उपाय करा. गुरुपौर्णिमा भाग्य व दशमस्थानी पडलेली आहे. कुलदेवतेचे पूजन करून जिथे काम करता त्या मालकांचा आशीर्वाद घ्या. अज्ञात शक्तींच्या आशीर्वादाने भाग्यउदय व भरभराटीस सुरुवात होईल. कालांतराने मनाप्रमाणे सर्व कामे होऊ लागतील. तसेच तुमच्या कष्टाला योग्य न्याय मिळेल. नोकरीविषयक अपेक्षाही पूर्ण होऊ लागतील. सध्या ग्रहमान सर्वदृष्टीने अनुकूल आहे. त्याचा फायदा करून घ्या.
वृषभ
मंगळ-शुक्र-गुरुचा होणारा योग अतिशय उत्तम आहे. अडचणी कमी होऊ लागतील. मानसिक समाधान मिळेल. कोणतेही काम वेळेवर होत नसेल, आरोग्य सतत बिघडत असेल, पैसा टिकत नसेल तर अष्टम व भाग्यस्थानात होणारी गुरुपौर्णिमा तुमच्या समस्यांचे निराकरण करू शकेल. त्यादिवशी तुमच्या जीवनास आधार देणाऱया व्यक्तीचे स्मरण करून त्याच्याविषयी चांगले चिंतन करा. त्याच्याविषयी कृतज्ञ राहा. अनेक अडचणी कमी होऊन दैवीकृपेने कामे होऊ लागतील.
मिथुन
जीवनात अनपेक्षितरीत्या उद्भवणाऱया अडचणी, भागिदराकडून आर्थिक फसवणूक, नोकरीचा आदेश मिळूनही कामावर रुजू करून घेण्यास टाळाटाळ, वैवाहिक जीवनातील गंभीरसमस्या, भागिदारी व्यवसायातील अडचणी, हरवलेला दस्तावेज किंवा व्यक्ती यांच्या समस्या, मानसिक अस्वास्थ्य यांच्या तडाख्यात सापडला असेल तर येत्या गुरुपौर्णिमेला तुमच्या जीवनास हातभार लावणाऱया गुरुजनांचे स्मरण करून त्यांना गुरु समजून वंदन करा. त्यांच्याविषयी आदरभाव बाळगा. अडचणीतून आपोआप मार्ग निघू लागेल.
कर्क
गुरुपौर्णिमा ष÷ व सप्तमस्थानी होत आहे. व्यवसायातील अडचणी, गुप्तशत्रुपिडा, नातेवाईकांच्या बघण्यात अनिष्ट बदल, प्रत्येक कामात खोळंबा असे प्रकार अनुभवास येत असतील तर येत्या गुरुपौर्णिमेला गणेश व दत्तपूजन करा. गुरुजनांविषयी आदरभाव बाळगा. चांगल्या विचारांचे बीज रोवले गेल्याने त्याचे उत्तम अनुभव येऊ लागतील. कामातील उत्साहदेखील वाढेल.
सिंह
मुले ऐकत नसतील, पती-पत्नीत दुरावा असेल, कुणाचा पायपोस कोणाच्या पायात नसेल, आर्थिक अडचणी, नोकरीतील ताण-तणाव, शिक्षणातील त्रास अशा समस्या जाणवत असतील तर व्यासपौर्णिमेला गणेश पूजन व सूर्यस्तोत्र वाचून घरातील वडीलधारी मंडळी आणि मालकवर्ग यांच्याविषयी चांगले चिंतन करा. चांगल्या विचारांचा प्रभाव कसा पडतो, हे स्वतः तुम्ही अनुभवाल आणि सर्व कामे ही आपोआप होऊ लागतील.
कन्या
घरादाराचे प्रश्न, जागेची समस्या, कौटुंबिक वाद-विवाद, कामाचे श्रेय न मिळणे, निष्कारण गैरसमज असे प्रकार घडत असतील, तर गुरुपौर्णिमेला कुलदेवतेचे पूजन करून नवग्रह स्तोत्र वाचा. तसेच चांगले काम करून मालकवर्गाची मर्जी राखण्याचा प्रयत्न करा. यांच्या आशीर्वादाने तुमची बरीच कामे होऊ लागतील. बेकारांना नोकरी मिळेल, कोणतीही समस्या निर्माण झाली तरी त्यामागील कारण शोधून ते निवारण्याचा प्रयत्न करा, निश्चितच मार्ग मिळेल.
तूळ
पराक्रम व चतुर्थस्थानी व्यासपौर्णिमा होत आहे. नातेसंबंध बिघडले असतील, शेजारी व आजूबाजूचे लोक सरळ वागत नसतील, मनात कपटनाटय़ धरून असतील. वास्तुविषयक काही अडचणी जाणवत असतील तर या व्यासपौर्णिमेला कुलदैवत आणि महादेव यांना गुरु मानून त्यांचे पूजन करा. तसेच आजूबाजूच्या लोकांना शुभेच्छा द्या. या चांगल्या विचाराने लोक आपोआपच तुम्हाला अनुकूल होऊ लागतील.
वृश्चिक
दशमस्थानी मंगळ-शुक्र आहे. हा चांगला आणि भाग्यवर्धक योग आहे. अपेक्षित नोकरी मिळणे, हाती घेतलेल्या कामात यश मिळणे, मान-सन्मान प्रतिष्ठेत वाढ, धनलाभ या दृष्टीने चांगले अनुभव येतील. गुरुपौर्णिमेचे भजन आर्थिक भरभराटीसाठी उत्तम ठरणार आहे. अष्टमातील बुध महत्त्वाचे कागदपत्र, व्यवहारात यश देईल. जागेचे रेंगाळलेले व्यवहार पूर्ण होतील. काही अनावश्यक बाबींचा त्याग केल्यास महत्त्वाची कामे होऊ लागतील.
धनु
लग्न आणि धनस्थानातून होणारी व्यासपौर्णिमा आरोग्य आणि आर्थिक स्थिती या बाबतीत चांगला अनुभव देऊन जाईल. जर कुठे पैसे अडकले असतील तर ते परत मिळू शकतील. पूर्वी जर कुठे नोकरीसाठी अर्ज केला असाल तर त्याचे अपेक्षित उत्तर येईल. वास्तु, फ्लॅट, जागा, दुकान खरेदीस अनुकूल काळ आहे. कुटुंबात जर कोणाला गंभीर आजार असेल तर त्यातून बरे होतील. त्यामुळे कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही राहील. या आठवडय़ात नवीन जबाबदाऱया पडण्याची शक्मयता आहे.
मकर
शुभ आणि अशुभ अशा दोन्ही स्थानात व्यासपौर्णिमा होत आहे. आरोग्य सुधारण्यासाठी आणि शत्रुपीडा नष्ट होण्यासाठी व्यासपूजन अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावेल. नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशी जाण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. काही कारणाने खोळंबलेले विवाहकार्य पुन्हा गती घेईल. संतती इच्छुकांची अपेक्षा पूर्ण होईल. अनवधानाने घडलेल्या पूर्वीच्या काही चुका निस्तराव्या लागतील. त्यासाठी थोडा खर्चही करावा लागेल. बाकी इतर बाबतीत ग्रहमान अनुकूल आहे.
कुंभ
सप्तमातील मंगळ-शुक्र वातावरण आनंदीं ठेवतील. अपेक्षित व आवडत्या व्यक्तीशी विवाह होण्याची शक्मयता. भागिदारी व्यवसायात नवीन सदस्यांचा समावेश होईल. व्यासपौर्णिमा लाभस्थानात होत आहे. काहीतरी निश्चित फायदा करून जाईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू लागेल. कमाई आणि खर्च यांचे गणित मात्र जरा बिघडण्याची शक्मयता आहे. वडीलधारी मंडळी आणि गुरुजन यांना यापूर्वी कधी जर काही वचन वगैरे दिलेले असेल तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्याचा निश्चितच फायदा होईल.
मीन
काहीवेळा न होणारी कामे देखील सहज होऊन जातात. तर अपेक्षा नसलेल्या ठिकाणी मोठे धनलाभ होऊ शकतात. हा आठवडा त्यादृष्टीने महत्त्वाचा ठरेल. थोडेसे धाडस आणि धैर्य व चातुर्य दाखविल्यास एखादा मोठा व्यवसाय हाती येण्याची शक्मयता आहे. पण जे काही कराल ते शांतमनाने आणि गुप्त सल्लामसलतीने करणे योग्य ठरेल. विवाहाच्या प्रयत्नात असाल तर थोडीशी तडजोड आणि समजून घेण्याची वृत्ती ठेवा. म्हणजे काही अडचण न येता विवाह ठरेल. एखाद्याची किमती वस्तू शक्मयतो जवळ ठेवू नका, ती हरवण्याची शक्मयता आहे





