बुधवार दि. 30 जून ते मंगळवार दि. 6 जुलै 2021
गरज ही शोधाची जननी!
ज्या ज्यावेळी संकटे येतात, त्यावेळी ती काहीतरी शहाणपण शिकवून जातात. त्यांचा अर्थ समजून घेऊन जो त्याचा शहाणपणाने वापर करतो, तोच जीवनात पुढे येतो आणि यशस्वी ठरतो. कोरोनामुळे नोकऱया सुटल्या, उद्योगधंदे बंद पडले, हाती असलेला पैसा खर्च झाला, आता काय करावे? कुणाकडे हात पसरावे? अशी समस्या सर्वांनाच भेडसावत आहे. सरकार मदतीची अनेक पॅकेजेस जाहीर करते पण खऱया गरजवंताला त्यातील काहीही मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. चारीकडून कमाईचे रस्ते बंद झाल्यानंतर लोकांना आपोआपच मार्ग सुचू लागतात. मान-प्रति÷ा वगैरे बाजूला ठेवून अनेकांनी या कोरोना काळात नवनवीन उद्योगधंदे शोधून ते सुरू केल्याचे पहावयास मिळत आहे. घरबसल्या नवनवीन शोध लावून त्यांचा व्यापार करणे, यासह अनेक नवनवीन उद्योग, व्यवसाय लोकांनी शोधून काढलेले आहेत. कोरोनामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झालेले असले तरी ‘एखाद्याचे विष ते दुसऱयाचे अमृत’ या म्हणीचा उपयोग करून काही जणांनी आपले जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. काहीजणांनी पडेल ती कामे करून तसेच अडगळीतील सामानविक्री करून त्यातूनही पैसे कमवल्याचे दिसून आले. कोणतेही काम अथवा उद्योग धंदा वाईट नसतो हे कोरोना काळात दिसून येत आहे. जन्मपत्रिकेत ‘धनसहम बिंदू’ म्हणून एक अदृश्य बिंदू असतो. कायमस्वरूपी कमाई कशातून असेल हे त्याच्यावरून समजते. पण सध्याच्या परिस्थितीत आगामी दोन-तीन महिन्यात कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या मार्गाने पैसे कमवावेत हे देखील या ‘धनसहम बिंदु’वरून समजू शकते. त्याचे संशोधन सुरू आहे. ते जर योग्य ठरल्यास त्याची सर्व तऱहेने पडताळणी करून त्याचा अनुभव पाहून पुढे केव्हातरी ते प्रसिद्ध केल sजाईल. पण कोरोनाने नवनवीन व्यवसाय करण्याची संधी सर्वांना दिलेली आहे. कोणतेही काम वाईट नसते किंवा कमी दर्जाचे नसते हे लक्षात ठेवून जर कुणाला नवीन काही करायची इच्छा असेल तर त्यांनी या कोरोनामुळे निर्माण झालेल्या संधीचे आभार मानून त्या संधीचा अवश्य फायदा करून घ्यायला हवा. संकटे कधी सांगून येत नसतात, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. परिस्थितीनुसार बदलण्याची तयारी असणे आवश्यक आहे. आतापर्यंत मी कारने आणि विमानाने फिरलो मग यावेळी सायकलने कसा फिरणार? आंबेमोहोर अथवा बासमती तांदळाची सवय असताना रेशनचे तांदूळ कसा खाणार? मी जर साध जीवन जगू लागलो तर जग काय म्हणेल? असा विचार चुकूनही करू नका. जगण्यासाठी जे आवश्यक आहे त्याचा स्वीकार करा आणि धैर्याने संकटाला सामोरे जा. त्यात तुमची सत्त्वपरीक्षा आहे. तुमच्या जन्मकुंडलीतील ग्रहमान कसेही असू देत पण कष्टाला आणि उद्योगाला प्राधान्य द्या. प्राप्तपरिस्थिती कायम राहत नसते. आजची कठीण परिस्थिती बदलेल आणि उद्या चांगले दिवस नक्कीच येतील यावर विश्वास ठेवा. हा संदेश सर्व राशींना ‘धनसहम बिंदु’ने दिलेला आहे. प्रत्येकाच्या जन्मवेळ आणि राशीनुसार ‘धनसहम बिंदू’ वेगवेगळे येतात.
मेष
या आठवडय़ात चतुर्थातील मंगळ-शुक्र युती तसेच गुरुचे सहकार्य मिळणार आहे. वैवाहिक बाबतीत चांगले योग. प्रेमप्रकरणात असाल तर यश मिळेल. व्यवसाय जोरात चालेल. प्रवासाचे योग येतील. नोकरीचे कॉल येतील. पण त्याची वाच्यता करू नका अन्यथा हातची संधी जाईल. इतर बाबतीत ग्रहमान अनुकूल आहे. लाभातील गुरु व दशमातील शनि यांचा सर्व बाबतीत मोठा फायदा होईल.
वृषभ
राशीस्वामी शुक्र हा मंगळाच्या युतीत आहे. त्यामुळे मानसिक विकार बळावतात. विशेषतः सर्वत्रच व्यसने आणि प्रेमप्रकरणे यापासून जपावे लागेल. कोणत्याही अवघड कामात चांगले यश मिळेल. गूढविद्या शिकण्याची इच्छा असेल तर त्यात उत्तम यश मिळेल. शनि-मंगळाच्या प्रतियोगात जीवनात काहीतरी खळबळ माजू शकते. त्यासाठी सर्व तऱहेने जपून रहा. वाहन अपघात संभवतात. काळजी घ्या. सार्वजनिक क्षेत्रात भाग घेऊ नका. राजकारणातील व्यक्तींनी जरा जपून राहणे आवश्यक. नवीन उद्योगधंद्यात व्यवसायिकांनी व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करावा.
मिथुन
धनस्थानी शुक्र-मंगळ. चैन आणि इतर नको त्या कामासाठी खर्च वाढतील. चंद्र-शुक्राचा योग धनलाभ, मंगलदायी वातावरण, सर्व कामात यश. मानसिक समाधान तसेच आर्थिक लाभ घडवील. कौटुंबिक अडचणी कमी होतील. वास्तुच्या प्रतीक्षेत असाल तर इच्छुकांना अपेक्षित बातमी समजेल. पती-पत्नीतील प्रेम वृद्धिंगत होईल. व्यवसायात उत्तम प्रगती झालेली दिसेल. कौटुंबिक जीवनात समाधान राहील. शनि-मंगळ प्रतियोग आरोग्याच्या बाबतीत चांगला नाही. वाहन जपून चालवा.
कर्क
तुमच्या राशीतच आलेले शुक्र-मंगळ म्हणजे उत्साही व आनंदी वातावरण, काही स्वप्न साकार होणे, कुटुंबात शुभ घटना, किमती वस्तूंची खरेदी तसेच आवडत्या व्यक्तींची भेट असे शुभफळ मिळेल. पण शुक्र-मंगळामुळे अनैतिक प्रवृत्ती व व्यसनाकडे मन वळण्याची शक्मयता असते. त्यासाठी सांभाळा. जर तुमच्याकडे कणखरपणा, योग्य निर्णय घेण्याची क्षमता व नियमितपणा आणि शिस्त असेल तर फार मोठे यश मिळवू शकाल. मुलाबाळांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा.
सिंह.
मंगळ-शुक्र युती अशुभस्थानी आहे. अतिसलगी अतिप्रेम व भावनाशीलपणा अंगलट येऊ शकतो. थट्टा मस्करी मतभेद वादावादी सट्टा लॉटरी जुगार तसेच वाहनाचा दुरुपयोग अशा गोष्टीमुळे मनस्ताप होण्याची शक्मयता आहे.
तरुण-तरुणींनी नको त्या आणाभाका घेऊ नयेत. पुढे अडचणीत याल. प्रवास, पत्रव्यवहार, नातेवाईक व मित्रमंडळ, वाटाघाटी, धनलाभ, नव्या उत्पन्नाचे मार्ग दिसणे, मंगलकार्य इत्यादी क्षेत्रात मोठी झेप घ्याल. कामाचा उत्साह वाढेल.
कन्या
शुक्र-मंगळ लाभस्थानी असल्याने मन उत्साही राहील. व्यसन आणि प्रेम करण्याकडे मन वळेल. काळजी घ्या. मंगळ-शनि प्रतियोग. हा योग चांगला नाही. काहीतरी करायचं म्हणून ठरवाल पण घडेल वेगळेच. अपघात, दुर्घटना यांची शक्यता. त्यामुळे मनस्ताप होईल. तुमची बाजू कितीही बरोबर असली तरी समोरची व्यक्ती ते मान्य करीलच असे नाही. पण इतर बाबतीत ग्रहमान शुभ आहे.कोणतेही काम करा त्यात बऱयापैकी पैसा मिळेल. नोकरीत भरती अथवा बढतीसाठी प्रयत्न चालू असतील तर त्यात यश मिळेल. सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी देवी कृपेने आर्थिक सहाय्य मिळेल.
तूळ.
दशमात शुक्र-मंगळ असल्याने मानसिक समाधान देणारा कालखंड. आजूबाजूचे लोक, नातेवाईक व आपल्या संपर्कात येणारी व्यक्ती यांच्याशी किरकोळ कारणावरून संघर्ष निर्माण होईल, त्यासाठी आपण सावध राहणे आवश्यक आहे. तुमच्या स्वभावाचा कोणी गैरफायदा घेणार नाही, भांडणे, संघर्ष, वादावादी, मतभेद, गैरसमज याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शनि-मंगळाचे सहकार्य असल्याने सर्व इच्छा पूर्ण करू शकाल. आर्थिक भरभराट होईल व विवाहाच्या प्रयत्नात असाल तर विवाह होऊ शकेल.
वृश्चिक.
पापस्तानी मंगळ-शुक्र व त्याला शनिचा प्रतियोग. हा योग चांगला नाही. प्रवास, प्रेमप्रकरण व सासरच्या व्यक्ती आणि आर्थिक बाबतीत आपण सावध राहावे लागेल. देणे-घेणे जपून करा. निष्कारण कोणाशीही शत्रुत्व घेऊ नका. तसेच कुणालाही जामीन वगैरे राहू नका. एखाद्याच्या सांगण्यावरून कोणत्याही आर्थिक व्यवहारात सहभागी होऊ नका. अशा योगावर काहीवेळा चुकीचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे पुढील कामकाजावर त्याचा परिणाम होतो. त्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेताना चार-पाच वेळा विचार करून सलामसलत करून मगच अंतिम निर्णय घ्या.
धनु.
मंगळ-शुक्र युतीशी होणाऱया शनिचा प्रतियोग कष्ट वाढविल. पण त्याच प्रमाणात धनलाभ करून देईल. प्रवासाचे योग. हा महिना तुम्हाला अतिशय भाग्यवान ठरणार आहे. काहीजणांना नोकरीचे कॉलही येतील, तर इतरांना नव्या क्षेत्रात स्वतंत्र नोकरी करण्याची संधी मिळेल. मंगलकार्याच्या दृष्टीने हा योग अतिशय चांगला आहे. कोणतेही शुभकार्य चांगले फळ देऊन जाईल. विद्यार्थ्यांनी मोबाईलवर अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयाकडे लक्ष देऊ नये.
मकर.
सप्तमात शुक्र-मंगळ म्हणजे वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण, धनलाभ, वाहनयोग, स्वतःची वास्तु होणे, चांगले मित्र, मैत्रिणी भेटणे आणि कर्तृत्वाला योग्य व्यक्तीकडून मदत मिळणे असा अर्थ आहे. त्यामुळे या कालखंडात तुम्हाला सर्वतऱहेने लाभ होणार आहेत. पण शनि-मंगळ प्रयोगामुळे काही गंभीर समस्या निर्माण होतील. त्यातील काही आर्थिक, सामाजिक तसेच वास्तूसंदर्भात आणि सरकारशी संबंधित असतील. त्यासाठी आपण सावध राहावे. शनि-गुरुचा सहयोग अवघड कामात यश देईल. कुटुंबात जर एखादी व्यक्ती हरवली असेल अथवा दूर गेली असेल तर तिची पुन्हा गाठभेट होऊ शकते. काही जणांना गेलेली नोकरी परत मिळण्याची ही शक्मयता आहे.
कुंभ.
मंगळ-शुक्र युती म्हणजे जीवनात चैतन्य, आनंद, समाधान, मानसन्मान अशी फळे मिळतात. नोकरीतील काही त्रास कमी होतील. नवीन व्यवसायाची संधी मिळेल. विवाहाच्या प्रयत्नात असाल तर नक्की यश मिळेल. ऑनलाईन बक्षीस लागल्याची ऑफर सांगून काहीजण लुबाडण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी बँक बॅलन्स, पिननंबर अथवा इतर महत्त्वाचे नंबर वगैरे शक्मयतो कोणालाही सांगू नका. मित्र-मैत्रिणीने थोडय़ावेळासाठीही मोबाईल मागितला तरी शक्मयतो देणे टाळा. गुरु कृपेमुळे न होणारे एखादे काम या आठवडय़ात होईल.
मीन
शुक्र-मंगळ योगामुळे कोणत्याही कामासाठी आर्थिक अडचणी पडणार नाहीत. ऐनवेळी कुणीतरी मदत करतील. या योगामध्ये व्यसन व प्रेमप्रकरण निर्माण होण्याची शक्मयता असते. त्यासाठी सावध राहावे. शनि-मंगळ प्रतियोग हा योग नोकरी-व्यवसायात काही नको ते प्रसंग निर्माण करील. मालकवर्गाची मर्जी सांभाळावी लागेल. या आठवडय़ात महत्त्वाची कागदपत्रे आणि वाहन संदर्भातील कामे करून घ्या. अचानक मोठे धनलाभ, जमीन आणि वास्तु ही स्वप्नेही साकार होऊ शकतील. खर्चाच्या नव्या वाटा निर्माण होण्याआधीच आलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवा.