बुधवार दि. 17 ते मंगळवार दि. 23 -3 -2021
अंगारक योगाला होलाष्टकाची साथ
सध्या राहू मंगळाचा अंगारक योग सुरू आहे त्यातच होलाष्टक योगाचा कालखंडही सुरू होत आहे हे दोन्ही अत्यंत अशुभ मानले जातात 21 मार्च पासून 28 मार्च पर्यंत या होलाष्टक योगाचा प्रभाव राहणार आहे या काळात कोणतेही महत्त्वाच्या कामाची सुरुवात मंगल कार्य वगैरे करीत नाहीत साखरपुडा, विवाह , वाटाघाटी, मोठे व्यवहार बारसे मुंडण उपनयन गर्भाधान संस्कार घरबांधणी हवन यज्ञ नवीन नोकरीवर जाणे वाहन खरेदी ऍडव्हान्स बुकिंग खरेदी-विक्री तसेच महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करीत नाहीत. होलाष्टक काळात केलेली कोणतीही महत्त्वाची शुभकार्य अनेक अडचणी निर्माण करतात, असे म्हणतात. यामागे पुराणात उदाहरणे व कारणे दिलेली आहेत. पूर्वी जर काही कामे ठरवलेली असतील तर त्याचा दोष लागत नाही पण एकदम नवीन कामे या काळात शक्मयतो करू नयेत हिरण्यकश्यपू व प्रल्हाद यांच्या कथेत तसेच शिवपुराणात याचे दाखले मिळू शकतात जन्म व मृत्यू नंतरची आवश्यक ती सर्व कामे या काळात करता येतात होळी म्हणजे आसुरी शक्तींचे दहन असा अर्थ आहे फाल्गुन अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत दर दिवशी निरनिराळे ग्रह उग्र व रागीट तसेच संतापी होत असतात त्यांची शुभफले देण्याची क्षमता कमी होत असते त्यामुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते अष्टमीला चंद्र बिघडतो नवमीला सूर्य दशमीला शनी एकादशीला शुक्र द्वादशीला गुरु त्रयोदशीला बुध चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू असेही ग्रह उत्तरोत्तर अधिक अनिष्ट प्रभावशाली होत जातात या काळात नकारात्मक शक्तींचा प्रभाव लाखो पटीने वाढलेला असतो त्यामुळे महत्त्वाच्या शुभकार्यात म्हणावे तसे यश मिळत नाही सर्व कामात अनंत अडचणी येतात पौर्णिमेला होलिका दहन झाल्यावर हा अशुभ काळ कमी कमी होत जातो होळीच्या दिवशी मध्यानी स्त्रिया होळीचे पूजन करतात व सायंकाळी सूर्यास्तानंतर केव्हाही होळी दहन करण्याची प्रथा आहे जवळ जवळ सर्व ग्रह या होलाष्टक काळात बिघडत असल्याने त्यांची चांगले फळ देण्याची शक्ती क्षीण होते आणि अनिष्ट शक्तींचे प्राबल्य असंख्य पटीने वाढते त्यामुळे सर्व राशीच्या लोकांनी या होलाष्टक काळात मन शांत ठेवून कामे करावीत. सध्या मंगळ राहुचा अत्यंत विषारी असा अंगारक हलाहल योग सुरू आहे त्याला या. होलष्टकाची साथ आहे त्यामुळे या अनिष्ट शक्तींचे प्राबल्य खूपच वाढणार आहे सर्व राशीच्या लोकांना त्याचा प्रभाव जाणवेल या काळात काय करावे व काय करू नये याचा तारतम्याने निर्णय घ्यावा शस्त्रक्रिया अति दूरवरचे अथवा प्रवास नोकरीवर रुजू होणे अथवा मुलाखती बस अथवा टेनचे रिझर्वेशन महत्त्वाची देणी-घेणी करारमदार वगैरे पूर्वी ठरलेला असेल तर ते ऐनवेळी बदलता येणे शक्मय नसते या आठ दिवसाच्या काळात अनिष्ट ग्रहांचा कोणताही त्रास होऊ नये यासाठी आपल्याला येणाऱया कोणत्याही मंत्राचा जप करावा त्यातही कुलदेवतेचा मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र याला विशेष प्राधान्य द्यावे म्हणजे संकटे येणार नाहीत व आलीच तर त्यातून काहीतरी मार्ग निश्चित दिसेल वादावादी भांडणं गैरसमज मार्मिक टीका टिपणी अतिवेग उतावळेपणा अनैतिक व्यवहार भ्रष्टाचार छळवाद दंगेधोपे शत्रुत्व वगैरे मागे चुकूनही लागू नका कारण या काळात देवादिकांना बळ नसल्यामुळे वाईट शक्तींचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो या कालखंडात कुणाही अनोळखी लोकांच्या घरात काहीही खाताना पिताना काळजी ,घ्या या काळात कोणताही अनिष्ट कार्यात गुंत्तल्यास त्या आपल्यावरच बुमरँग सारखे उलटते व त्याचे परिणाम फार गंभीर असतात.
मेष
रवि शुक्र बाराव्या स्थानी आहेत खर्चावर नियंत्रण ठेवा डोळय़ांची काळजी घ्या महत्वाचे कागदपत्रावर सही करताना घाई गडबड करू नका आर्थिक बाबतीत उत्तम योग आहे पण अचानक होणाऱया खर्चामुळे बेजार व्हाल शनि राहू मंगळ कौटुंबिक बाबतीत वाद-विवाद निर्माण होतील तसेच काही नको असलेल्या जबाबदारीही स्वीकारावे लागतील प्रसंगावधान राखून योग्य ते निर्णय घ्या म्हणजे अडचण येणार नाहीत नोकरदार व्यक्तींना नोकरी-व्यवसायात वरि÷ांची मर्जी सांभाळावी लागेल.
वृषभ
राशीतील राहू मंगळामुळे उतावळेपणा वाढण्याची शक्मयता आहे तसेच काही अविचारी गोष्टी करण्याकडे मन.वळेल. रवी शुक्राचे लाभ स्थानातील भ्रमण शुभ आहे त्यामुळे आर्थिक व्यवहार हातावेगळी करू शकाल कर्जप्रकरणे असतील तर ती मिटवा कुणाला जामीन राहू नका घशाचे विकार उद्भवती ल. हा एक प्रकारचा शापीत योग असल्याने जुन्यापुराण्या वस्तू शक्मयतो खरेदी करू नका अन्यथा त्यातून काही बाधा घरात शिरू शकतात व त्याचा परिणाम तुमच्या आरोग्य व प्रगतीवर होईल.
मिथुन
दशमातील रवी शुक्राचे भ्रमण सर्व बाबतीत अनुकूल आहे त्यातही नोकरी व्यवसायाशी संबंध असेल तर चांगली फळे मिळतील कामाच्या नवनवीन ऑर्डरी मिळतील पण कामाचा पसारा आणि व्याप मात्र काही बाबतीत डोकेदुखी ठरणार आहे होलाष्टकच्या अशुभ कालखंडात. सर्व बाबतीत जपा राहू मंगळाचे भ्रमण चांगले नाही आरोग्याच्या तक्रारी खर्चात वाढ निष्कारण गैरसमज किरकोळ अपघात असे प्रकार घडू शकतात पण झाल्यास कोणताही त्रास होणार नाही.
कर्क
भाग्यातील रवी शुक्रामुळे कुणाच्यातरी मंगल कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल त्यातच तुमचेही मंगल कार्य ठरू शकते वाहन प्रवास देणी-घेणी नवीन नाती गोती जोडणे नोकरी-व्यवसायासाठी प्रयत्न करणे यासाठी अनुकूल काळ आहे राहू मंगळ व होलाष्टक या योगाचा प्रभाव सुरू केली असून त्यामुळे आगामी काही दिवस सर्व बाबतीत जपून राहा निष्कारण कुणीतरी खोडय़ा काढून तुमची मनशांती भंग करण्याचा प्रयत्न करतील अशावेळी स्वतःच्या मनाने जो निर्णय घ्याल तोच योग्य ठरेल व त्यानुसार वागा.
सिंह
अष्टमातील धारवे शुक्रामुळे काही प्रसंगातून सुटका होईल अचानक धनलाभाचे योग दिसतात वैवाहिक बाबतीत जर काही गैरसमज देणी-घेणी मतभेद असतील तर ते मिटू. शकतात दशमातील राहुं मंगळाचा प्रभाव वाढत आहे कोणत्याही परिस्थितीत सध्या असलेली नोकरी सोडू नका किंवा गोड बोलून कोणीतरी तुमच्या गळय़ात एखादी नको ती जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे तुम्ही सावधतेने कोणतेही व्यवहार करणे अति आवश्यक आहे.
कन्या
सप्तम स्थानी आलेल्या रवि शुक्रामुळे वैवाहिक जीवनात काही अनुकूल घटना घडतील न ठरणारे लग्न जूळु शकेल भागीदारी व्यवसाय कोर्ट मॅटर वगैरे वगैरे असेल तर त्यात काठावर यश मिळेल होलाष्टक योग आणि राहू मंगळाचा प्रभाव वाढणार आहे त्यामुळे प्रेम प्रकरणे मुलांची वागणूक कुटुंबातील सदस्यांची वर्तन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावे लागेल कुणी तरी चूक करतील आणि तुमच्या वर त्याचे खापर फोडले जाईल तसेच बोलण्या-चालण्यात शक्मयतो कटू शब्द वापरू नका.
तूळ
ऐनवेळी संकटात कोणी मदत करतील या आशेवर राहू नका स्वतः जे काही कराल तेच चांगले यश देऊन जाईल. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवून सावधगिरिने व्यवहार करा. कारण यापुढे राहु मंगळ आणि कॉल आष्टीकाचा प्रभाव वाढणार आहे अशावेळी कळत-नकळत काही चुका होतात आणि त्यामुळे गंभीर स्वरूप धारण करू शकतात सर्व प्रकारची व्यसने, वादावादी, भांडणं, मतभेद यापासून दूर राहा म्हणजे अनिष्ट रोगाचा प्रभाव जाणवणार नाही.
वृश्चिक
होलाष्टकचा प्रभाव आणि राहु मंगळ याचा जोर यामुळे काही बाबतीत मानसिक आणि वैचारिक गोंधळ होईल नक्की काय करावे ते समजणार नाही त्यामुळे मन शांत ठेवूनच निर्णय घ्या जोडीदार व भागीदाराची मतभेद करू नका अथवा तुमच्या मनातील काही गोष्टी त्यांना सांगू नका या कालखंडात जर नवीन नोकरीचे कॉल आले तर चारीकडून चौकशी करून मगच स्वीकारा कामाची दगदग आणि घाई गडबड यातूनच काहीतरी महत्त्वाचा शोध लागेल आणि त्याचा तुमच्या जीवनावर मोठा प्रभाव पडेल विवाहाच्या वाटाघाटीत होतास काही दिवस करू नका
धनु
चतुर्थातील रवी शुक्रामुळे नवीन वास्तूत जाण्याचे योग वाहन घेण्याची हाऊस पूर्ण होईल मनातील अनेक गोष्टी सहज साध्य होतील धाडस धडाडी बुद्धिचातुर्य श्रीमंती पैसा हलका सर्व काही असूनही काही गोष्टी आपल्या हातात नसतात त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अभिमान अथवा गर्व न करता दैनंदिन कामे करीत राहा कारण सध्या राहू मंगळाचा अंगारक योग आणि होलाष्टकाचा अशुभ प्रभाव सुरू आहे तो कोणत्या तऱहेने प्रभाव दाखवून देईल ते सांगता येणार नाही पण या योगावर काही जणांचे आयुष्य देखील बदलू शकते व संपूर्ण कुटुंबाचे कल्याण ही होऊ शकते.
मकर
जर तुमच्याकडे एखादी कला असेल तर त्याचे चीज होण्यास अनुकूल काळ आहे रवि शुक्र हा. चांगला योग आहे त्यामुळे आर्थिक व्यवहारात फारशा अडचणी येणार नाहीतअशुभ होलाष्टक आणि राहु मंगळ यांचा शापित प्रभाव सुरू आहे त्यामुळे अचानक काही गंभीर समस्या उद्भवू शकतात त्यासाठी सर्व कामे जागरूक राहूनच करावी लागतील कोर्ट प्रकरणे वगैरे असतील तर ती काही काळ ठेवा व्यवसाय व नोकरीसाठी ग्रहमान अनुकूल आहे काही भाग्यवंतांना नवी कंत्राटे मिळू शकतात वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल जत्रा यात्रा व्यसन तसेच मुक्मया प्राण्यांचे बळी देणे अशा प्रकारा पासून दूर राहा.
कुंभ
माणूस कितीही शिकला सवरला हुशार असला तरी देवाची साथ असेल तरच तो वर येऊ शकतो अन्यथा सर्व काही असूनही नकारात्मक भूमिकाच वाटय़ाला येते असे काही प्रसंग आगामी कालखंडात जाणवतील शिक्षणाच्या बाबतीत अचानक काही महत्त्वाचे फेरफार घडू शकतात एखाद्या मंगल कार्यात कोणाच्यातरी ओळखीने तुमचेही मंगल कार्य होऊ शकते पण त्या त काहीतरी जगावेगळे वैशिष्टय़ असेल आर्थिक बाबतीत जपून राहा असा संदेश हा सप्ताह देत आहे.
मीन
तुमच्या राशीतच ठाण मांडून बसलेले रवी शुक्र तुमचे व्यक्तिमत्त्व खुलविण्यासाठी प्रयत्न करतील. आर्थिक व्यवहार यशस्वी ठरतील. जागा, घर ,वाहन, व्यवसाय, विवाह यासह कोणतेही मंगल कार्य करण्यास हरकत नाही. पण राहू मंगळ अंगारक योग आणि होलष्टक यांचा अशुभ प्रभाव सुरू आहे. त्यामुळे कोणतेही काम जबाबदारीने आणि मन शांत ठेवून करणे अति आवश्यक समजावे. काहीवेळा एका दिवशी गैरसमज निर्माण होईल, पण त्यात गुंतू नका, अन्यथा संबंधित बिघडतील.





