बुधवार दि. 9 ते मंगळवार दि.15 डिसेंबर 2020
सर्वात जास्त भाग्यवान कोण? ( दुसरा भाग)
देवाने प्रत्येकाला काही ना काही दिलेले असते. सर्वांना सर्वच काही मिळते असे नसते. राजयोग हा प्रत्येकाच्या कुंडलीत असतो. फक्त त्याचे स्वरूप वेगवेगळे असते. काही जणांना श्रीमंती, सत्ता, बुद्धी तर काहीजणांना रूप, सौंदर्य, नावलौकिक, विमानप्रवास यासह कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ते दिलेले असते. सर्वकाही मिळूनदेखील माणूस सुखी असतोच असेही नाही. जोतिषशास्त्रात नविन संशोधनात जे महत्त्वाचे नियम सापडले आहेत, त्यानुसार पाहता खरे भाग्यवान कोण ते सहज समजते. त्यानुसार कुंडली तपासल्यास कुंडली कोणत्या दर्जाची. आहे व आपले जीवन कसे जाणार ते समजते. देवाने आपल्याला काय दिलेले आहे, त्याचा वापर कसा करायचा, हे मूलतत्व समजल्यास प्रत्येकाला आपले जीवन सुखी करता येते. देव तुम्हाला काय हवे ते देणार नाही, पण ज्यातून तुमचे भले होणार ते, मात्र नकीच देईल. एखादे व्यंग अथवा शारिरिक अपंगत्व असेल पण, तीच गोष्ट त्याच्या भाग्योदय व भरभराटीस कारणीभूत ठरू शकते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी प्रत्येकाने आपल्याकडे कोणते गुण आहेत. ते पहावे व त्यानुसार आपले जीवन घडवावे. शिक्षण कोणतेही असू द्या, कमाई कशातून होणार, तुमची उपजीविका कशातून चालणार, हे परमेश्वर ठरविणार. फक्त आपल्याला ते ओळखता आले पाहिजे. लाखो रुपये खर्चून मोठमोठय़ा पदव्या घेतलेले लोक, आज नोकरी नाही म्हणून फिरत आहेत, तर साधीसुधी माणसे ज्यांचे काहीही शिक्षण नाही ते, आपल्या अंगच्या कलागुणांवर यश मिळवित आहेत. कोणतेही काम वाईट नसते हे दाखवून देत आहेत. साधा चहावालादेखील डॉक्टर, इंजिनीअरपेक्षा जास्त कमवीत असल्याचे दिसून येते. कुणी आपल्याला मदत करतील, नोकरी लावून देतील, धंदा-व्यवसाय घालून देतील या आशेवर राहू नका. ‘तुमचे जीवन तुम्हालाच घडवायचे आहे’ हे जीवनाचे सूत्र लक्षात ठेवल्यास जगात कुणीही दु:खी राहणार नाही. देव कुणावरही अन्याय करीत नाही. प्रत्येकाच्या पूर्वजन्मातील प्रारब्धसंचित यानुसार त्याला फळ देत असतो. यामुळे कुणी कुणाशी तुलना करू नये.
मेष
गुरु-शनिचे भ्रमण मोठय़ा कामात येईल. नवीन प्रकारच्या कोणत्याही संशोधनात यशस्वी व्हाल. राहूचे भ्रमण कौटुंबिक अडचणीतून मार्ग दाखविल. मंगळाचे अनिष्ट स्थानातील भ्रमण चांगले नाही. अचानक मोठे खर्च निघतील. अष्टमात रवि, बुध, गुरु, शुक्र हा योग आरोग्याच्या दृष्टीने चांगला नाही. सर्व तऱहेने काळजी घ्या. सध्या कालसर्प योगाच्या प्रभावात तुमची रास अडकलेली आहे. त्यामुळे बाधिक दोष, पितृदोष जाणवू शकेल. कुलदेवतेची आराधना व्यवस्थित चालू असेल तर काहीही त्रास होणार नाही. धाडसाची व दूरवरची प्रवासाची कामे शक्मयतो स्थगित ठेवा.
वृषभ
लाभातील मंगळ जमीन, घरदार, वास्तू व इस्टेटीच्या बाबतीत उत्तम आहे. धनलाभ मोठे यश मिळवून देईल. गुरु-शनिमुळे नोकरी व्यवसायातील अडचणी कमी होतील. जर तात्पुरती नोकरी असेल तर ती कायमस्वरूपी होऊ शकेल. त्यादृष्टीने तुमचे प्रयत्न चालू ठेवा. सप्तमातील रवि, बुध, केतू, शुक्र हा चार ग्रहांचा मैत्रीयोग वैवाहिक जीवनात गडबड व गोंधळ निर्माण करेल. दूरचे प्रवास, भागिदारी या बाबतीत जास्तीत जास्त सावध राहा. न्यायालयीन प्रकरणे सुरू असतील तर ती पुढे ढकलणे योग्य ठरेल. शत्रूंच्या कारवायांकडे लक्ष ठेवा.
मिथुन
दशमातील मंगळ नोकरी व्यवसायाच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा आहे बेकारांना नोकरी मिळू शकेल तसेच काही जणांना नोकरीत बदल व स्थलांतरही होण्याची शक्मयता आहे ष÷स्थानातील चार ग्रहांची युती आरोग्याच्या बाबतीत चांगली नाही एखाद्या क्षुल्लक कारणावरून किरकोळ अपघात घडू शकतात काही नवे आजार उद्भवण्याची शक्मयता आहे मातुल पक्षाकडील काही व्यक्तींच्या बाबतीत महत्त्वाच्या वार्ता ऐकू येतील आगामी कालखंड धोक्मयाचा आहे धार्मिकत्तेकडे विशेष लक्ष द्या
कर्क
भाग्यस्त मंगळामुळे नावलौकिक व प्रसिद्धी मिळेल. आध्यात्मिक क्षेत्रात उत्तम प्रगती होईल. खर्च पण वाढेल. उद्योगधंद्यातील काही अंदाज चुकतील. सप्तमस्थ शनि-गुरु मुळे वैवाहिक जीवनात किरकोळ कारणावरून कटुता निर्माण होईल. त्यासाठी वातावरण स्वच्छ व पारदर्शक ठेवा. कुणालाही खाजगी जीवनात प्रवेश करू देऊ नका. पंचमातील रवि, बुध, शुक्र, केतू संततीच्या बाबतीत विशेष काळजी घेण्यास सुचवीत आहे. आध्यात्मिक क्षेत्रात असाल तर काही भाग्यवंतांना साक्षात्कारही घडू शकेल.
सिंह
अष्टमात मंगळ आहे. घाई-गडबडीत व अविचाराने कोणतेही काम करू नका. वाहन जपून चालवा. अपघाताचे योग दिसतात. कोणतेही काम वेळेवर होईलच असे नाही. त्यासाठी नियोजनबद्ध काम करा, म्हणजे अडचणी येणार नाहीत. चतुर्थातील चार ग्रहांची युती शापीतयोग निर्माण करणारी आहे. काहीजणांच्या आगमनामुळे वास्तुशक्ती दोष निर्माण होतील. त्यासाठी काळजी घ्या. गुरु-शनि षडाष्टक योग नोकरी-व्यवसायात फार मोठे यश मिळवून देईल. साधा उद्योग असेल तर त्यात उंच भरारी घेऊ शकाल.
कन्या
सप्तमातील मंगळ पती-पत्नीत वाद-विवाद आणि तेढ निर्माण करील. त्यासाठी मोबाईल वरील मेसेज वगैरे पासून जपावे लागेल. जोडीदार संशयी असेल तर विशेष काळजी घ्या. पराक्रमातील रवि, बुध, शुक्र, केतु योग धनलाभ दर्शवित असला तरी आजूबाजूचे लोक व नातेवाईक यांच्या बरोबर तेढ निर्माण करेल. लिखाणात सावध राहा. फोन, मोबाईल, पत्रव्यवहार पुन्हा पुन्हा तपासून मगच त्याचा वापर करा. अनोळखी अथवा तिऱहाईत व्यक्तीला तुमच्या किमती वस्तू वापरण्यास देऊ नका. त्याची एखादी किरकोळ कृतीदेखील तुम्हाला मोठय़ा संकटात टाकू शकते.
तूळ
मंगळ राशी षडाष्टकात आहे. आर्थिक बाबतीत मोठे यश देऊन जाईल. पैशामुळे अडकलेल काही व्यवहार मार्गस्थ होतील. शनि-गुरु सुखस्थानातून भ्रमण करीत आहेत. वास्तुविषयक स्वप्न पूर्ण करण्यास अनुकूल काळ आहे. कर्ज वगैरे प्रकरणे असतील तर त्यात यश मिळेल. आर्थिक बाबतीत कोणतेही व्यवहार जपून करावेत. धनस्थानी रवि, शुक्र, बुध, केतू हा योग जेवढे पैसे देईल, त्यात दुप्पट खर्चही करावयास भाग पडेल. आर्थिक व्यवहारावरून कुणाशी वितुष्ट येणार नाही याची काळजी घ्या.
वृश्चिक
तुमच्या राशीत चंद्रासह पाच ग्रह बसलेले आहेत. अशा योगावर जीवनात अत्यंत महत्त्वाच्या घटना घडतात. काहीवेळा महत्त्वाचे निर्णय चुकू शकतात अथवा त्यात गडबड होऊ शकते. त्यामुळे मन शांत ठेवून कोणतेही व्यवहार करावेत. शनि-गुरुचे भ्रमण एखादा प्रवास लांबविण्यावी शक्मयता आहे. राशीस्वामी मंगळ पंचमात आहे. कोणत्याही क्रीडा क्षेत्रात असाल तर त्यात चांगले यश मिळेल, पण त्यामुळे शिक्षणात अडथळे येऊ शकतात. करिअरकडे विशेष लक्ष द्या.
धनु
चतुर्थातील मंगळामुळे किरकोळ कुरबुरी अथवा वादावादीचे प्रसंग निर्माण होतील. घरदुरुस्ती आता रंगरंगोटी करताना काळजी घ्या. पाय वगैरे घसरण्याची शक्मयता आहे. धनस्थानातील शनि, गुरुमुळे विस्कटलेली आर्थिक घडी व्यवस्थित बसेल, पण बेशिस्तीला मात्र कुठेही वाव देऊ नका. रवि, बुध, शुक्र, केतू अनिष्ट स्थानी आहेत. सर्व ती काळजी घ्या. खर्च आटोक्मयात ठेवा. शत्रुत्वाला वाव देऊ नका. प्रेमप्रकरण असेल तर कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घ्या.
मकर
लाभस्थानात चार ग्रह आहेत, हा एक प्रकारचा सुवर्ण मणिकांचन योग मानला जातो. मोठय़ा प्रमाणात धनलाभ, आर्थिक सहाय्य मिळणं, वाहनयोग या दृष्टीने हा योग अत्यंत महत्त्वाचा आहे पण, त्याचबरोबर मित्रमंडळांकडून फसवणूक देखील होऊ शकते. राशीस्वामी शनि आणि गुरु तुमच्या जीवनाला कलाटणी देण्याचा प्रयत्न करतील. तुमचे विचार आणि कर्तृत्व कसे असेल त्यावर ही कलाटणी अवलंबून असेल.
कुंभ
दशम स्थानातील रवि-बुध, केतू-शुक्र युतीयोग म्हणजे एकीकडे उच्चपद आणि दुसरीकडे नोकरी सुटणे, धंदा-व्यवसाय जोरात चालणे, त्याच वेळी काही कारणांमुळे अचानक नुकसान होणे असे अनुभव येतात. धनस्थानातील मंगळामुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. नको त्या कामासाठी अथवा प्रति÷sसाठी खर्च कराल. संकटातून ऐनवेळी कसा मार्ग काढावा यांचे उपजत ज्ञान तुम्हाला असल्याने ग्रहमान कितीही खडतर असले तरी घाबरण्याचे काहीही कारण नाही.
मीन
तुमच्या राशीतच मंगळ ठाण मांडून बसलेला आहे. एक प्रकारचा उच्च प्रतीचा धनयोग. त्यामुळे सतत पैसे मिळत राहतील, पण ते कोणत्या मार्गाने ते मात्र कळणे अवघड आहे. भाग्यस्थानातील 4 ग्रहांची युती तीर्थक्षेत्रे, जत्रा, यात्रा या ठिकाणी हरवणे, नुकसान, फसवणूक, लुटालुट असे प्रकार दर्शविते पण, सत्शील सत्प्रवृत्त आणि निर्व्यसनी व्यक्ती हाच योग अतिशय चांगले फळ देईल. वाहन जपून चालवा. नको ते स्टंट करण्याचा प्रयत्न करू नका. एखादी किरकोळ चूक देखील कायमचे अपंगत्व निर्माण करू शकेल.





