मेष ते धनू या सात राशीवर शापीत योगाचा प्रभाव
बुध. दि. 11 ते 17 मार्च 2020
गेल्या काही दिवसापासून मेष ते धनू या सात राशीवर कालसर्पयोगाची छाया पसरलेली आहे. अग्नि राशीवर ज्यावेळी कालसर्पयोगाचा प्रभाव पडतो, त्यावेळी आर्थिक व्यवहार मंदावतात, कोणतीही कामे वेळेवर होत नाहीत, देवाधर्मावरील श्रद्धा कमी होऊ लागते. कोणत्या राशीवर कोणत्या प्रकारचा शापीत योग लागलेला आहे, हे राहुच्या स्थितीवरून समजू शकते. कालसर्पयोग किंवा शापीत योग हे केवळ पूर्वजांच्या दुष्कृत्यामुळेच निर्माण होतात, अशी गैरसमजूत आहे. पण आपल्या स्वत:च्या चुकीमुळेही हे शापीत दोष तयार होत असतात. स्वत:बरोबर ते पुढील पिढीवरही परिणाम करीत असतात. त्यामुळे त्याचे परिणाम घडोघडी जाणवत असतात. लग्न जुळत नसेल तर खोटय़ा कुंडल्या करून देणे, तारखा बदलणे, किरकोळ कारणावरून एखाद्याला सतत छळणे, स्वत:च्या चुका लपवून त्याचे खापर दुसऱयावर फोडणे, चांगले चाललेले संसार मोडण्याचा प्रयत्न करणे यासह असंख्य चुका सतत कुठे ना कुठे होत असतात. मुद्दाम कुणी चुका करीत नसतात, पण काही हेतुपुरस्सर केले जातात. कर्माची गती गहन असते. ‘जे पेराल ते उगवेल’ हा निसर्गाचा नियम असल्याने त्यातून कोणाचीही सुटका नाही. जे काही कराल ते भरभरून देणे हा निसर्गाचा नियम आहे. एखादे बी पेरले तर ते ज्यावेळी उगवेल, त्यावेळी हजारो पटीने ते आपल्याला फळ देत असते. त्याच न्यायाने जर कुणावर मुद्दाम हस्ते परहस्ते अन्याय केला तर ते देखील हजारो पटीने भोगावे लागते. आपण काहीवेळा रागात कुणाला तरी वाटेल तसे बोलत असतो, पण त्यातून कलीचा संचार होऊन त्याचे फळ संचितात जमा होते व वेळ फिरली की त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. जर कुणाला गुपचूप मदत केला असाल अथवा कुणा मुक्मया पशु-पक्षी-प्राण्याला काही खाऊ घातलेले असेल तर त्याचे फळ संचितात जमा होऊन योग्य वेळ येताच त्याचा हजारोपटीने फायदा झालेला दिसून येतो. आपल्यावरील संकट जावे म्हणून काहीजण मुक्मया प्राण्यांचा बळी देतात, तर काही जण स्वत: अथवा मुलावरून कपडे ओवाळून ते गरिबांना दान देतात. लग्नात नवरा-नवरीवरून पैसे ओवाळून ते गरिबांना वाटले जातात. अशाने पुण्य न लागता शाप लागतात व आपली वेळ फिरली की ते भोगावे लागते, त्यासाठीच दान देताना चांगल्या मनाने व सत्पात्री द्यावे असे म्हणतात. जर एखाद्या माणसाला दान दिलात व त्याचा त्याने दुरुपयोग केल्यास तर त्याच्या कर्माचे पाप तुम्हाला लागते. कुत्री, मांजरी, कावळे, चिमण्या, मैना, पोपट यासह अनेक पशू-पक्षी खायला काही मिळेल का, या आशेने पहात असतात. लोक दानपेटीत देणग्या देतात, पण त्या मुक्मया पशुपक्ष्यांना एक घास खाऊ घालावे असे त्यांना वाटत नाही. उलट त्यांना हुसकावून लावतात. अशातूनच शापीत दोष निर्माण होत असतात. मग तुमच्या कमाईला बरकत कशी येणार? आपल्या हाती पैसा टिकत नाही, असे अनेक जण म्हणत असतात. आपल्या कमाईचा काही भाग पशु-पक्ष्यांना खावू घातल्यास त्यांच्या आशीर्वादाने आपली परिस्थिती सुधारत जाते व त्यांचा छळवाद केल्यास त्याचे अनिष्ट परिणाम आज ना उद्या स्वत:ला अथवा पुढील पिढीला भोगावे लागतात. त्यातूनच कालसर्पयोगासारखे भयानक शापीत दोष निर्माण होतात.
मेष
राशीस्वामी मंगळ, शनिच्या युतीत दशमात हा एक प्रकारचा अत्यंत धाडशी उद्योsजक योग म्हणता येईल. कारखाना वगैरे घालणार असाल तर अनुकूल योग आहे. शुक्राचा गुरुशी होणारा नवपचंम योग. वास्तू, घरदार, वाहन व इतर महत्त्वाच्या व्यवहारात यश मिळवून देईल. अति महत्त्वाची कामे होऊ लागतील. पूर्वी केलेल्या कामातून धनलाभाची शक्मयता.
वृषभ
बाराव्या स्थानी शुक्र आहे. गुरु, शुक्राचा शुभयोग हा योग जितका लाभ त्याच्या दुप्पट खर्च दाखवितो. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. जेथे सायकलने काम भागते तेथे कार अथवा मोटार सायकलचा वापर करू नका. भाग्योदय भरभराटीच्या दृष्टीने वाटचाल सुरू होईल. अनेक इच्छा पूर्ण होतील. नोकरीत स्थलांतर अथवा प्रवास योग. मानसिक समाधान देणाऱया घटना.
मिथुन
लाभात शुक्र व त्याच्याशी गुरुचा होणारा त्रिकोण योग म्हणजे कुबेर व लक्ष्मीची कृपा म्हणता येईल. धनलाभाचे योग. भाग्योदयाच्या दृष्टीने चांगले अनुभव येतील. आयुष्यात कधीही पाहिला नसाल असे मोठे यश किंवा ऐश्वर्य लाभेल, पण तुमच्या मुळ कुंडलीत तसे योग असावे लागतात. नोकरी व्यवसायात लाभदायक वातावरण शनि-मंगळ युती अपघातदर्शक असल्याने सांभाळा.
कर्क
शुक्र-गुरुचा त्रिकोण योग अनेक बाबतीत मोठे यश देईल. नोकरी व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. शनि, मंगळ सप्तमात हा योग चांगला नाही. वैवाहिक जीवन, भागीदारी व्यवसाय, कोर्टप्रकरणे व लांबचे प्रवास या बाबतीत जरा सावध रहावे लागेल. संशयी स्वभावाला मुरड घाला, अन्यथा गंभीर वादळ घोंघावण्याची शक्मयता आहे.
सिंह
गुरु पंचमात बलशाली आहे. त्यामुळे अत्यंत अवघड कामातदेखील सहज यश मिळवाल. सरकारी कामातील अडथळे दूर होतील. शनि, मंगळ युती अशुभ योगात आहे. त्यामुळे अपघात, आजार, गैरसमज, शस्त्रक्रिया, शत्रुत्व, लागणे, खरचटणे, फसवणूक यापासून जपावे. नवख्या ठिकाणी दंगामस्ती अथवा सेल्फी वगैरेच्या नादात नको ते प्रसंग.
कन्या
राश्याधिपती बुध, नेपच्यूनच्या युतीत आहे. काही गोष्टींची पूर्वसूचना मिळेल. कोणतेही मोठे काम यशस्वी करून दाखवाल. शनि, मंगळ युती, पंचमात हा योग चांगला नसतो. वैवाहिक बाबतीत अडचणी, तसेच प्रेमप्रकरणात असाल तर अपयश मिळण्याची शक्मयता. तरुणींनी विशेष खबरदारी घ्यावी. नको त्या प्रकरणात गुंतविण्याचा प्रयत्न होईल.
तुळ
गुरु, शुक्र नवपंचम योगामुळे विवाह ठरण्याचे योग. आर्थिकदृष्टय़ा अति महत्त्वाचे शुभ योग. जगावेगळे काही तरी करून दाखवाल. इतर मार्गाने मोठय़ा प्रमाणात धनलाभाची शक्मयता. पण चतुर्थातील शनि, मंगळामुळे कागदोपत्री व्यवहारात फसगत, तसेच काही अघोरी प्रयोगांचीही शक्मयता असते. बाधिक वस्तू ओलांडू नका.
वृश्चिक
शुक्र, गुरुचा शुभयोग आर्थिक व वैवाहिक सौख्यात वाढ करील. वास्तुत काही दोष असतील. वास्तुशास्त्राच्या मागे न लागता केवळ मंत्रपठण चालू ठेवा. संपूर्ण वातावरण बदलून जाईल व कुटुंबात सुखसमृद्धी लाभेल. तृतीयातील शनि, मंगळामुळे नातेवाईकाशी मतभेद. शत्रुपीडा व अपघातापासून जपावे लागेल. तरुण वर्गाने कुणावर छाप मारण्यासाठी वाहनाशी मस्ती करू नये.
धनु
राशीस्वामी गुरुशी शुक्राचा शुभ योग होत आहे. सर्व कार्यात यश देणारे ग्रहमान, योग्य नियोजन असेल तर लक्षाधीश, कोटय़ाधीश होऊ शकाल. धनस्थानी शनि, मंगळ असल्याने खर्च वाढतील. वैवाहिक जीवन व भागीदारी व्यवसायात काळजी घ्या. बुवाबाजी व नाटकी आध्यात्मिक व्यक्तीच्या मागे लागल्याने आर्थिक हानी होईल.
मकर
राशीस्वामी शनि, मंगळासोबत आहे. बेसावध राहिल्यास किरकोळ अपघात घडू शकतात. कोणतेही महत्त्वाचे निर्णय जपून घ्यावेत. अपघात व दुर्घटनेपासून जपा. गुरु, शुक्राचा शुभयोग. स्वत:ची वास्तू होऊ शकेल. धनलाभाचे चांगले योग. खर्च मात्र वाढतील. वाहन जपून चालवा. सर्व तऱहेने भाग्योदयकारक ग्रहमान आहे. मनातील आवड, इच्छाही पूर्ण होऊ शकतील.
कुंभ
गुरु, शुक्राच्या शुभयोगामुळे, शुक्रामुळे घरगुती वातावरण चांगले राहील. धनलाभ, प्रवास, शिक्षण, नोकरी व संततीच्या दृष्टीने चांगले योग. शनि, मंगळ युतीमुळे महत्त्वाची कामे खोळंबतील. अशावेळी मन शांत ठेवून मगच निर्णय घ्यावे लागतात. वास्तू, वाहन व इतर किमती वस्तुंच्या खरेदीचा विचार तूर्तास स्थगित ठेवणे फायदेशीर ठरणार आहे.
मीन
या आठवडय़ात धनस्थानी शुक्र व त्याच्याशी गुरुचा होणारा नवपंचम योग, मंगलकार्य व मोठे धनलाभ घडविण्याची शक्मयता आहे. भाग्यातील शनि, मंगळ युतीमुळे कोणतेही काम सावधपणाने करावे. सरकारी कामातील अडथळे वाढतील. पण तरी कामे मात्र होतील. णानसान्मान, प्रति÷ा यांच्यामागे न लागता नेहमीची कार्ये करीत रहा.