रविवार दि.11 ते शनिवार दि. 17 ऑक्टोबर 2020
मेष
या सप्ताहात तुळा राशीत सूर्यप्रवेश, बुध, शुक्र लाभयोग होत आहे. तुमचा मार्ग योग्य असला तरी अडचणी येतील. संयम ठेवा. विलंबाने यश मिळेल. धंद्यात संधी मिळेल. मागील येणे वसूल करा. नोकरीत काम वाढेल. राग आवरा. राजकीय- सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव वाढत असलेला पाहून विरोधक नवी चाल खेळण्याचा प्रयत्न करतील. नम्रता ठेवा. यश तुमचेच असेल. जिद्द ठेवा.
वृषभ
या सप्ताहात तुळा राशीत सूर्यप्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. महत्त्वाची कामे लवकर करण्याचा प्रयत्न करा. धंद्यात स्थिरता ठेवा. कठोर शब्दात बोलू नका. कायदा पाळा. नोकरीत प्रभाव पडेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची प्रति÷ा राहील. लोकांच्या समस्या सोडवा. संसारातील कामे करून घ्या. शिक्षणात मेहनत घ्या. कलाक्षेत्रात ओळखी होतील.
मिथुन
या सप्ताहात तुळा राशीत सूर्यप्रवेश, बुध, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात फायदा होईल. नवे काम मिळेल. प्रयत्न करा. योग्य ठिकाणी पैसा गुंतवा. नोकरीत वर्चस्व राहील. राजकीय, सामाजिक कार्यात किचकट कामे करून घ्या. समस्या सोडवा. प्रसिद्धी, लोकप्रियता मिळेल. कुटुंबात सुखद समाचार मिळेल. शिक्षण, साहित्य, कलावंत यांना प्रगतीची संधी मिळेल. परीक्षा द्या. आळस नको.
कर्क
या सप्ताहात तुळा राशीत सूर्यप्रवेश, बुध, शुक्र लाभयोग होत आहे. तुमचा आत्मविश्वास टिकून राहिल्याने नोकरीत, व्यवसायात चांगले काम करून दाखवाल. मागील येणे वसूल करा. परिचयात वाढ होईल. मोठे काम मिळवा. राजकीय, सामाजिक कार्यात हातात घेतलेले काम वेळेत पूर्ण करा. लोकांच्या भेटी घ्या. समस्या सोडवा. संसारात चांगली बातमी कळेल. नोकरी मिळवा. शिक्षण, कला क्षेत्रात प्रगती होईल.
सिंह
या सप्ताहात तुळा राशीत सूर्यप्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसेल. मागील येणे वसूल करा. मोठे कंत्राट मिळवा. नोकरीत प्रभाव पडेल. वरि÷ खूष होतील. राजकीय, सामाजिक कार्यात किचकट प्रश्न सोडवता येईल. जास्तीत जास्त कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. लोकप्रियता मिळेल. शिक्षणात आळस करू नका. मुलांची प्रगती आनंद देईल.
कन्या
या सप्ताहात तुळा राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. धंद्यात गोड बोला. संताप करू नका. तुमचा प्रभाव वाढेल. नोकरीत महत्त्वाचे काम करून दाखवाल. मैत्रीत गैरसमज होईल. घरात किरकोळ तणाव होईल. व्यसन नको. खर्च वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगतीची संधी मिळेल. प्रवासात सावध रहा. नवीन ओळखीवर भाळून जाऊ नका.
तुळ
या सप्ताहात तुमच्याच राशीत सूर्यप्रवेश, बुध, शुक्र लाभयोग होत आहे. या सप्ताहात संयमाने वागा. जिद्द ठेवा. काम करा. जास्त अपेक्षा ठेवू नका. अहंकार नको. धंद्यात फायदा होईल. वसुली करा. नोकरी टिकवा. वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात काम करा. प्रति÷ा सांभाळा. टीका होऊ शकते. कायदा पाळा. वाहन जपून चालवा. परीक्षा टाळू नका. कला, साहित्यात प्रगती होईल.
वृश्चिक
या सप्ताहात तुळा राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाढ होईल. नवे काम मिळवा. वसुलीचा प्रयत्न करा. नोकरीतील किचकट कामे करून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाची कामे रेंगाळत ठेवू नका. लोकप्रियता मिळेल. परीक्षेसाठी चांगली तयारी होईल. कला, साहित्यात प्रगती होईल. संसारात कठोर शब्द वापरु नका.
धनु
या सप्ताहात तुळा राशीत सूर्यप्रवेश, बुध, शुक्र लाभयोग होत आहे. वादाचे प्रसंग प्रत्येक ठिकाणी येण्याची शक्मयता आहे. प्रवासात घाई नको. धंद्यात फायदा होईल. वसुली करा. नोकरीत वरि÷ांना मदत करावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात मागे राहू नका. तुमचा प्रभाव वाढत जाईल. योजना तयार करा. शिक्षण, साहित्य, कला क्षेत्रात प्रगती होईल. आनंदी व्हाल.
मकर
या सप्ताहात तुळा राशीत सूर्यप्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. मैत्रीत तणाव होईल. संसारात नाराजी होईल. खर्च वाढेल. व्यसन नको. वस्तुनि÷ रहा. धंद्यात तडजोड करा. काम सोडू नका. कायदा पाळा. नोकरीत प्रभाव राहील. कठोर शब्द वापरू नका. राजकीय, सामाजिक कार्यात योजना पूर्ण करण्यावर भर द्या. जवळच्या, चांगल्या लोकांना ओळखून ठेवा. दुखवू नका.
कुंभ
या सप्ताहात तुळा राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, शुक्र युती होत आहे. अहंकार न ठेवता कोणतेही काम करा. गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. धंद्यात काम मिळेल. वसुली करा. नोकरी टिकवा. डोळय़ांची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात चातुर्य वापरा. कठीण प्रश्न सोडवता येईल. प्रसिद्धीचा विचार करू नका. परीक्षा टाळू नका. कलाशक्ती वाढेल.
मीन
या सप्ताहात तुळा राशीत सूर्यप्रवेश, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. कोणताही प्रश्न सोडवतांना भावना व संताप वाढेल. संयम ठेवा. महत्त्वाची कामे करून घ्या. धंद्यात समझोता करावा लागेल. व्यसन नको. कठोर शब्द वापरू नका. संसारात नम्रता ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात जिद्द ठेवा. टीका करतांना विचार करा. खाण्याचे तंत्र सांभाळा. परीक्षा टाळू नका. वाकडी वाट धरू नका.





