रविवार दि. 4 ते शनिवार दि.10 ऑक्टोबर 2020
मेष
या सप्ताहात मीन राशीत मंगळ वक्री, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. कठीण प्रसंगातून मार्ग काढता येईल. रागावर ताबा ठेवणे, अहंकार न ठेवणे यामुळे तुम्ही तुमची कामे योग्य प्रकारे करू शकाल. धंद्यात नम्रपणाने बोला, वागा. नोकरीच्या कामात चूक करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होईल. तुमचे ध्येय गाठा. सर्व तात्पुरते असेल. परीक्षेसाठी तयारी चांगली करा.
वृषभ
या सप्ताहात मीन राशीत मंगळ वक्री, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. कोणतेही महत्त्वाचे काम या सप्ताहात करण्याची तयारी ठेवा. धंद्यात वाढ होईल. मनस्ताप दि. 4,5 ला होईल. वसुली संयमाने करा. नोकरीत महत्त्वाचे काम करता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा मुद्दा वादग्रस्त ठरला तरी प्रसिद्धी मिळेल. संसारात खर्च वाढेल. जवळच्या व्यक्तीची काळजी घ्या. कायद्याच्या कामात प्रगती होईल. कला, शिक्षण यात मेहनत घ्या.
मिथुन
या सप्ताहात मीन राशीत मंगळ वक्री होत आहे. चंद्र, बुध त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर कायद्याची कक्षा सांभाळा. धंद्यात सुधारणा करता येईल. संसारात सहाय्य मिळेल. नोकरीत कामात चूक करू नका. वरि÷ांची मदत मिळू शकेल. राजकीय, सामाजिक कार्यात मागे राहू नका. लोकांची कामे करा. लोकसंग्रह वाढवा. नवीन गोष्टी शिकून घ्या. शिक्षणात प्रगती होईल. परीक्षा टाळू नका. कलाक्षेत्रात ओळखी होतील.
कर्क
या सप्ताहात मीन राशीत मंगळ वक्री, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यातील अडचणी सोडवा. कामे रेंगाळत ठेवू नका. वसूली करा. नवीन परिचय होईल. नोकरीत प्रभाव दाखवा. सौम्य प्रतिक्रिया राजकीय, सामाजिक कार्यात द्या. लोकांचे सहकार्य, प्रेम मिळेल. संसारात मुलांच्या संबंधी नवा विचार कराल. न्यायालयीन कामात सावध रहा. शिक्षणात मागे राहू नका. कलाक्षेत्रात चमकाल.
सिंह
या सप्ताहात मीन राशीत मंगळ वक्री, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाढ करता येईल. मोठे काम मिळवा. वसुली करा. किचकट कामे करून घ्या. नोकरीत वरि÷ांना खूष कराल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. न होणारे काम करून दाखवा. प्रवासात घाई नको. औषध वेळेवर घ्या. स्थान मजबूत करा. कला, साहित्य, शिक्षणात वर्चस्व वाढेल.
कन्या
या सप्ताहात मीनेत मंगळ वक्री, चंद्र-शुक्र केंद्रयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला रागावर ताबा ठेवा. संसारात वाद वाढवू नका. प्रवासात घाई नको. धंद्यात छोटय़ा तडजोडी करावी लागेल. नोकरीत इतरांना मदत करावी लागेल. यांत्रिक बिघाड संभवतो. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. जवळच्या नेतेमंडळींना दुखवू नका. व्यसन नको. पोटाची काळजी घ्या. शिक्षणात आळस नको. वाकडी वाट धरू नका.
तुळ
या सप्ताहात मीनेत मंगळ वक्री, सूर्य, चंद्र षडा÷क योग होत आहे. धंद्यात वाढ होईल. कायदा मोडू नका. अरेरावी नको. नोकरी टिकवा. वरि÷ांना कमी लेखू नका. वसुलीचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. जिवावर उदार होऊ नका. विचारपूर्वक बोलता येईल. संसारात वृद्धांची काळजी वाटेल. एखादा शुभसमाचार मिळेल. परीक्षा टाळू नका.
वृश्चिक
या सप्ताहात मीनेत मंगळ वक्री, बुध, हर्षल प्रतियुती होत आहे. महत्त्वाचे काम करतांना विचारपूर्वक वक्तव्य करा. धंद्यात चर्चा होईल. काम मिळवणे सोपे वाटेल. वसुली करा. नोकरीत वरि÷ांच्या कामात मदत करावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात आरोप येतील. स्पर्धा वाढेल. महत्त्वाचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. कला, शिक्षणात प्रगती होईल. परीक्षा द्या.
धनु
या सप्ताहात मीनेत मंगळ वक्री, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. कठीण प्रश्न सोडवता येईल. धंद्यात काम मिळवा. वाद न करता वसुली करा. नोकरीत काम वाढेल. प्रशंसा होईल. राजकीय, सामाजिक कार्याला वेग येईल. लोकांच्या भेटी घ्या. अभ्यासपूर्वक कार्य करा. संसारातील तणाव कमी करता येईल. चित्रपट, साहित्य, शिक्षणात प्रगती होईल. ओळखी वाढतील. केस जिंकता येईल.
मकर
या सप्ताहात मीनेत मंगळ वक्री, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात अडचणी येतील. तडजोड करा. तात्पुरत्या फायद्याचा विचार करा. भागीदार, जीवनसाथी, मुले यांची मर्जी पाहून बोला. नोकरीत वर्चस्व राहील, पण काम वाढेल. व्यसन नको. खाण्याची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. सरकारी वर्गाला दुखवू नका. शिक्षणात आळस नको. वाकडय़ा वाटेने जाऊ नका. प्रेमात फसगत होईल.
कुंभ
या सप्ताहात मीनेत मंगळ वक्री, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. नोकरीत कायद्याचे पालन करून कामे करा. अरेरावी करू नका. धंद्यात काम मिळाले तरी खर्च वाढेल. डोळय़ांची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात निष्फळ प्रश्नावर बोलणे टाळा. महत्त्वाचा मुद्दा मांडता येईल. प्रसिद्धीचा विचार न करता कामे करा. शिक्षणात आळस नको. कलाक्षेत्रात नवा विचार कराल.
मीन
तुमच्याच राशीत मंगळ वक्री होत आहे. सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. संयम ठेवा. सर्व कामे होतील. अरेरावी नको. जास्त मोह धंद्यात ठेवू नका. नवे काम मिळवा. किचकट प्रश्न सोडवा. नोकरीत वरि÷ांच्या मर्जीप्रमाणे काम करावे लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रशंसा होईल. कोणालाही कमी समजू नका. परीक्षा द्या. संसारात कुणाला नाराज करू नका. लोकांची मने जाणून घ्या.





