शनिचा मकर राशीत प्रवेश उत्तरार्ध
बुध. दि. 22 ते 28 जाने. 2020
शनि हा योग्य न्यायनिवाडा करणारा ग्रह आहे. त्यामुळे जे सरळ व न्याय मार्गाने जातात, त्यांना हा शनि राजयोगासारखे फळ देईल. साडेसाती असेल तरीही हा शनि चांगलेच फळ देईल. मनुष्यप्राण्याच्या सर्व बऱया-वाईट कर्माचा हिशोब शनि ठेवत असतो. यम हे शनिचे स्वरुप आहे, हे शनिच्या कारकत्वाचा नीट अभ्यास केल्यास त्याच्यासारखा दाता कुणी नाही व तो चिडला तर राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. कर्म स्वच्छ ठेवणे हा शनिला खूष ठेवण्याचा राजमार्ग आहे. साडेसातीच्या काळात त्रास होतो पण त्याला शनि कारणीभूत नाही. कळत न कळत आपल्या हातून घडलेली पापे व अक्षम्य अपराधाची ती शिक्षा समजावी अनेक लोक देव देव करतात. सतत पूजापाठात मग्न असतात. हजारो रुपये खर्चून महागडय़ा शांती करतात. चारधाम यात्रा करतात. पवित्र स्थळांची तीर्थयात्रा करतात. जपजाप्य करतात पण मन जर स्वच्छ नसेल तर या सर्वाचा काहीही फायदा नाही. असंख्य पुण्यकर्मे करूनही लोक अपघातात मृत्यूमुखी पडतात. काहीतरी विचित्र प्रकरण घडून पोलीसप्रकरणात अडकतात. साधेसुधे निमित्त होऊन गंभीर शस्त्रक्रियेचे प्रसंग ओढवतात. कुटुंबे उद्ध्वस्त होतात. असे का घडते? माणूस म्हटल्यावर चुका होणारच. राग, द्वेष, मत्सर, इर्षा, पोटदुखी टीका बदनामी या बाबी आल्याच पण त्यातून जे परिणाम होतात, ते मात्र महाभयंकर असतात. शनिकडे दयामाया, क्षमा हा प्रकार जरा कमीच. तो जर कोपला तर एकवेळच्या अन्नाला महाग करील व प्रसन्न झाला तर सात जन्माचे कल्याण करील. तो कुणाचेही अनिष्ट करणार नाही, सर्वाचेच भले करील. या शनिचे उत्तम लाभ मिळण्यासाठी आपले नित्य नियमित कर्म व्यवस्थित करावे, हा कायदा शास्त्राचा कारक आहे. त्यामुळे कोर्टकचेरीत खोटय़ा साक्षी अथवा पैशाच्या लोभाने इकडचे तिकडे केल्यास हा शनि त्यांना सोडणार नाही. भ्रष्टाचार व अन्यायाचे प्रमाण जेथे असेल तेथे शनिचा कोप ठरलेलाच आहे. शनि चांगला असला तरी सुद्धा ज्या ज्यावेळी मंगळ, केतू, रवि, चंद्र तसेच ग्रहणयोगाशी त्याचा अशुभ योग होईल त्यावेळी हाहाकार माजेल. अपघात, दुर्घटना, मारामाऱया, दंगली, राजकारणी नेते व चित्रपट क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा मृत्यू सत्तापालट अशा घटना घडतील. स्वच्छता, पावित्र्य राखावे. कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतल्यास या शनिचे शुभ परिणाम दिसून येतील. शास्त्राsक्त मंत्रोच्चाराने शनिवर केलेल्या अभिषेकाचे तेलाने स्पाँडेलायसीस, हात-पाय दुखणे व सांधेदुखीसारखे रोग कमी होऊ शकतात. साडेसाती सुरू झाल्याचे सांगून अनेकजण भीती घालत आहेत. ज्या राशीना साडेसाती सुरू आहे त्यांनी तर रडकुंडीला यावे, अशी भीती घालतात व अमुक शांती, तमुक दान करा वगैरे सांगतात. पण जो ग्रह मुळातच चांगला आहे तो चांगलेच फळ देणार. शुभग्रहाच्या अंमलाखालील पदार्थांचे दान केल्यास त्याचे विपरित परिणाम होतात. काहीजण साडेसाती अथवा एखादा ग्रह अनिष्ट आहे म्हणून गरिबांना अन्न, वस्त्रे देतात, पण देण्यापूर्वी आपल्या मुलांवरून ओवाळून सर्व पीडा दूर व्हावी, असा संकल्प करून ते दान करतात. पण कर्म तसे फळ या न्यायाने ते दान त्यांच्यावरच उलटते व नको ती भयानक संकटे त्यांच्यामागे लागतात व आयुष्यभर ते भोगावे लागते.
मेष
शनि स्वराशीत दशमात आलेला आहे. नोकरी-व्यवसायात उन्नती होईल. सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. सरकारी क्षेत्रात असाल तर लाभदायक योग. सर्व सरकारी कामे होऊ लागतील. व्यवस्थित आयसाधन करून घर बांधल्यास निश्चितच लक्ष्मीची कृपा होईल. दुसऱयांचे भले कराल त्याचा फायदा तुम्हाला भरभराटीच्या रुपाने होईल. जमीन मालमत्तेसाठी प्रयत्न करा, हमखास यश मिळेल.
वृषभ
बदललेल्या शनिमुळे शुभ व कल्याणकारक घटना घडतील. राजकारणात प्रवेश कराल व त्यात नावलौकिक व पैसाही बऱयापैकी मिळेल. मुलामुलींच्या लग्नात कोणतेही अडथळे येणार नाहीत. वारंवार प्रवास घडतील. त्यातील अर्धे प्रवास, देवादिकांसाठी असतील. घर बांधणार असाल तर योग्य आयसाधन करून बांधा, ते लाभदायक ठरेल.
मिथुन
मृत्यूस्थानी शनि आलेला आहे. मोठय़ा प्रमाणात धनलाभाचे योग. भागीदारी व्यवसायात लाभ. नोकरीत उत्कर्ष होईल. अपघाताची भीती राहील. या शनिचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी नशेपासून दूर राहणे चांगले ठरेल. साप, विंचू यापासून सावधगिरी बाळगा. कुणालाही तुमचे वर्तन जितके स्वच्छ व न्यायी असेल त्या प्रमाणात शनि तुमचे सर्व संकटातून रक्षण करील. आगामी अडीच वर्षापर्यंत हे अनुभव येतील.
कर्क
शनि सप्तमात आलेला आहे. ऐश्वर्यलाभ, आरोग्यात सुधारणा, प्रवास, शत्रुना नामोहरम करणे द्रव्यलाभ, मुलाबाळांचा भाग्योदय अशा शुभ घटना घडतील. एखादे जातीबाहय़ प्रेमपत्र नव्याने आयुष्यात येण्याची शक्मयता आहे. पती-पत्नीनी एकमेकांची काळजी घ्यावी. कुणावरही अन्याय झालेला नसेल, कोणतेही व्यसन नसेल, घरातील वातावरण शुद्ध व सात्विक असेल तर हा शनि सर्वप्रकारे रक्षण करील.
सिंह
शनिचे ष÷ातील आगमन अनेक बाबतीत शुभ ठरणार आहे. करणीबाधा व शत्रुपीडा यांचा काहीही त्रास होणार नाही. वकिली, इंजिनियरिंग वगैरे क्षेत्रात असाल तर चांगले यश मिळेल. लहान भावंडांशी मतभेद होऊ शकतील. काही महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. या शनिच्या कालखंडात चामडय़ाच्या वस्तू खरेदी करणे धोक्मयाचे ठरेल. अपघात व दुर्घटनेपासून तुम्हाला सावध रहावे लागेल.
कन्या
पंचमात शनिचे झालेले आगमन काही बाबतीत एकदम शुभ फलदायक आहे पण तरीसुद्धा कोणतेही काम योग्य शहानिशा करून केल्यास अपयश येणार नाही. संततीबाबत चितेंचे प्रसंग. वैवाहिक जीवनात काही कटु प्रसंग निर्माण होतील. कष्टाने कमविलेला पैसाच टिकेल, हे अनुभव दोन वर्षे टिकतील.
तुळ
शनि चतुर्थात आल्याने स्वत:ची वास्तू होण्यासाठी प्रयत्न करा. सुखस्थान हे शनिला मानवत नाही त्यामुळे घरात काहीवेळा मतभेदाचे प्रसंग येतील. शत्रुत्वात वाढ करणारा हा शनि आहे. त्यामुळे घरासंदर्भातील कोणतीही सजावट वगैरे करताना ती लोकांच्या नजरेत येईल, असे करू नका. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे योग. जमिनीचे व्यवहार, कारखानदारी यात मोठे धनलाभ होऊ शकतात.
वृश्चिक
पराक्रमात आलेला शनि तुम्हाला अतिशय शुभ आहे. धनलाभाचे नवनवे कायमस्वरुपी मार्ग सापडतील. कोर्टमॅटरमध्ये विजयी व्हाल. काही बाबतीत रोख रकमेपेक्षा बार्टर सिस्टीमचा वापर करावा लागेल. काही महत्त्वाच्या कामात समाजाने झिडकारलेल्या नको त्या लोकांची मदत घ्यावी लागेल. कारखानदारी तसेच डोळय़ांशी संबंधित व्यवसाय असेल तर मोठे यश मिळेल.
धनु
शनिचे धनस्थानी झालेले आगमन आरोग्य सुधारण्यास मदत करील. मंत्री, आमदार, खासदार, सीए तसेच वकील यांच्या तोडीसतोड अशी बुद्धी चालवाल. त्यामुळे जीवनाच्या अनेक क्षेत्रात चमकाल. नोकरी व्यवसायात तुमचा दबदबा वाढेल. कुटुंबात मंगलकार्ये होतील. आर्थिक बाबतीत होणारे घोटाळे ऐनवेळी लक्षात आल्याने मोठे नुकसान टळेल. हे सारे अनुभव दोन वर्षांच्या कालखंडात येतील.
मकर
स्वत:च्या मालकीच्या राशीत शनिचे आगमन झालेले असून त्याचा प्रभाव अडीच वर्षापर्यंत राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. माता-पित्याचा भाग्योदय होईल. नोकरीपेक्षा स्वतंत्र व्यवसाय केल्यास भरभराट होईल. सरकारी नोकरी, डॉक्टरी, कारखानदारी, पेट्रोलपंप यांच्याशी संबंधित व्यवसाय केल्यास भरभराट होईल. सरकारी नोकरी, डॉक्टरी, कारखानदारी, पेट्रोलपंप यांच्याशी संबंधित व्यवसाय केल्यास जीवनाचे सोने करू शकाल.
कुंभ
साडेसातीची सुरुवात होत आहे. जुने घर अथवा मंदिर यांचा जिर्णोद्धार करण्याचा विचार कराल. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय भाग्योदयकारक, सरकारी कामात यश, घरमालक, भाडेकरू वाद मिटतील. सांसारिक जीवनातील सर्व तऱहेचे गैरसमज निवळतील. घरदार, वाहन तसेच इतर वस्तुसाठी बराच खर्च कराल. अपघात, आजार, स्फोटक पदार्थामुळे तसेच रसायने वगैरेपासून धोका होईल.
मीन
लाभात आलेल्या बलवान शनिमुळे काळय़ा रंगाच्या व्यवसायात उत्तम लाभ होतील. तीन-चार घरे व वाहन होण्याचे योग. शेअर बाजार वगैरेत मोठे लाभ होतील. मुलाबाळांचे सौख्य चांगले राहील. तुमच्यामुळे सासरच्या घराण्याचा उत्कर्ष होईल. कोणतेही व्यसन अथवा अवैध व्यवसाय नसतील तर हा शनि तुम्हाला गडगंज श्रीमंती देईल, हे सारे अनुभव अडीच वर्षाच्या कालखंडात येतील.





