सौभाग्य व प्रजापती योगावरील अक्षय्य तृतीया
येत्या 26 एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे. अक्षय्य म्हणजे कायम टिकणारे पुण्य. सतत राबत रहा, लक्ष्मी व परमेश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी आहे, हे दर्शविणारी ही तिथी आहे. वर्षातील काही धार्मिक कृत्ये या दिवशी केल्यास त्याचे वर्षभर चांगले फळ मिळत रहाते. दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया अक्षय्य तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. विष्णू-पार्वतीचे स्वामित्त्व असलेली ही तिथी आहे. या दिवशी देवादिकांची जी शुभ कर्मे केली जातात, त्यांचे अक्षय्य फळ मिळते. या दिवशी केलेल्या देवपूजेमुळे घराण्यातील अनेक बाधिक दोष नष्ट होतात. पैसा शिल्लक टाकल्यास तो टिकतो. माणसाच्या हातून रोज अनेक चुका होत असतात. शुभकार्ये घडले, परीक्षेत यश मिळाले, लग्न झाले, पैसा मिळाला, सत्कार समारंभ झाले, घरदार झाले, संतती झाली, चांगली नोकरी मिळाली, प्रमोशन झाले की, पुण्याचा साठा कमी होतो. जोपर्यंत पूर्वपुण्याई शिल्लक असते, तोपर्यंत सर्व काही सुरळीत चालते. काही त्रास होत नाहीत, पण पापाचे प्रमाण वाढले की त्रासाचे दिवस सुरू होतात. हाती घेतलेली कामे होत नाहीत. व्यवसाय बंद पडतात. आरोग्य वारंवार बिघडू लागते. सांसर्गिक रोगराई, आर्थिक अडचणी, गैरसमज व भांडणतंटे, दंगली सुरू होतात. व्यसनांकडे ओढा वळतो. घरातील वातावरण बिघडते. पैसे अडकून बसतात. यासाठी पुण्याईचा साठा वाढविणे आवश्यक आहे. गुरुजन व माता-पित्याविषयी आदरभाव नाही.
आपल्याला आवडणारी कोणतीही पूजा या दिवशी करावी. जलदान, वृक्षसंवर्धन व मुक्मया प्राण्यांना जीवदान दिल्यास अनेक दोष नष्ट होतात. शक्मय असेल तर या दिवशी पाणपोई सुरू कराव्यात. पशुपक्ष्यासाठी पाण्याची सोय करावी. या दिवशी घराण्याच्या परंपरेप्रमाणे कुलदेवतेची पूजाअर्चा करावी. म्हणजे कुलदेवतेची कृपा लाभते व त्याचा परिणाम वर्षभर टिकतो. कोणत्याही देवाची आराधना केली तरी कुलदेवाची कृपा निश्चितच होते. अक्षय्य तृतीयेला केलेली पूजा ही घराण्यातील अनेक दोष नष्ट करून कुटुंबाचा उद्धार करते. यादिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध केल्यास पितरांना मुक्ती मिळते, असे म्हणतात. सर्व शापीत दोषही नष्ट होतात. व्यवहारात ही अक्षय्य तृतीया शुभ योगावर आलेली असल्याने सर्व कार्यात मोठे यश देणारी आहे.
मेष
हर्षल, बुध, रवी भ्रमण अचानक महत्त्वाच्या घटना घडवते. तसेच लाभही होऊ शकतात. नुकसान दर्शविते. भरभराटीच्या दृष्टीने अनुकूल असल्याने किरकोळ गुंतवणूक वगैरेस उत्तम ठरेल. राशीस्वामी मंगळ लाभात आहे. कोणतेही काम विचारपूर्वक करावे, तसेच खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
वृषभ
दशमात मंगळ तसेच बुध, रवि, हर्षल व्ययस्थानी हा योग सर्व कामात मोठे यश देईल, पण संघर्ष करावा लागेल. काहीवेळा ताणतणाव तसेच मनाविरुद्ध घटना घडू शकतात. नोकरी व्यवसायात सावधगिरी बाळगावी. हर्षल-रवीचे भ्रमण अचानक फायदा पण दर्शविते. व्यसनापासून दूर रहा.
मिथुन
शुक्र व्ययात, भाग्यात मंगळ, तसेच लाभात रवि, हर्षल, बुध हा योग चांगला आहे. नोकरी, व्यवसाय व उपजीविकेवर परिणाम करणारा आहे. लाभदायक वातावरण आहे. शनि, गुरु अष्टमात असल्याने नोकरी व्यवसायात अचानक बदल. नको त्या ठिकाणी स्थलांतराची शक्मयता. काम विचारपूर्वक करावे.
कर्क
लाभात शुक्र म्हणजे धनलाभाचे योग. कष्टाचे पैसे मिळणे, अडकलेली रक्कम वसूल होणे यांचा त्यात समावेश राहील. अष्टमात मंगळ जरा त्रासदायक आहे. रवि, हर्षल, बुध दशमात आहेत. नोकरीत अचानक महत्त्वाचे फेरबदल व त्याचा फायदाही होईल. कुटुंबातील बऱयाच अडचणी कमी होतील.
सिंह
नवे संकल्प पंधरवडय़ात पूर्ण होऊ लागतील. दशमात शुक्र सुखसमाधान देईल. मंगळ सप्तमात, वैवाहिक जीवनात मतभेद होण्याची शक्मयात. बुध, रवि, हर्षल योग शारीरिक व आर्थिक बाबतीत चांगला आहे. शिक्षणात यश, धनलाभ, विवाहाच्या वाटाघाटीत यश मिळेल.
कन्या
सहावा मंगळ सर्व कामात यश देईल. रवि, हर्षल, बुध योग अष्टमातून होत आहे. जीवावरची संकटे टळतील, पण तरीही बेसावध राहू नका. कुणाही अनोळखी व्यक्तीला आपले फोटो, बँक खाते, नंबर देऊ नका. महिलांनी मोबाईलवरील बाबी हाताळताना सावध रहाणे, योग्य ठरेल.
तूळ
राशीस्वामी शुक्र अष्टमात शुभ आहे. लक्ष्मीची कृपा राहील. पंचमात मंगळ असल्याने देवीची आराधना सर्व बाबतीत शुभ कल्याणकारी ठरेल. रवि, बुध, हर्षल सप्तमात आहेत. कुणाच्याही भानगडीत पडू नये. शनि, गुरु चतुर्थात आहेत. रहात्या जागेसंदर्भात प्रश्न सुटतील. गुप्त शत्रुंच्या कारवाया उघड होतील.
वृश्चिक
सप्तमात शुक्र वैवाहिक सौख्यास चांगला आहे. चतुर्थात मंगळ असल्याने कौटुंबिक वातावरण गरम राहील. रवि, हर्षल, बुध योगामुळे आर्थिक अडचणी कमी होऊ लागतील. नोकरी व्यवसायात काही चमत्कारीक घटना घडतील. मन शांत ठेवून निर्णय घ्यावेत. सांसर्गिक व्याधी लागण्याची शक्यता.
धनु
सहाव्या स्थानी शुक्र नवीन कलेत चांगले यश देईल. तृतीयेत मंगळ, अवघड कामे सहज हातावेगळी करू शकाल. रवि, हर्षल, बुध पंचमात असल्याने दैवीकृपा लाभेल, पण स्वभावात हटवादीपणा व रागीटपणा दिसून येईल. त्यातून विपरीत काही होणार नाही याची काळजी घ्या.
मकर
पंचमात शुक्र शुभ आहे. संततीस्थानी हा योग होत आहे. मुलांच्या वागणुकीवर लक्ष ठेवा. शेजारी व नातेवाईक यांच्यामुळे नको त्या प्रकरणात अडकाल. जागा, स्थावर इस्टेट, वैवाहिक जीवनात काही अडचणी असतील तर त्या दूर होतील. वाहन जपून चालवा.
कुंभ
चतुर्थात शुक्र असल्याने कौटुंबिक व घरगुती सुधारणा कराल. ऐषारामी वृत्ती वाढेल. राशीतील मंगळ लक्ष्मीदायक योगात आहे. रवि, हर्षल, बुध पराक्रमात आहे. भाग्योदयाच्या दृष्टीने चांगले योग. प्राप्तीचे नवे मार्ग दिसतील. डोळय़ांचे विकार उद्भवतील. टोकदार वस्तूपासून जपावे.
मीन
बारावा मंगळ खर्च वाढवील, तसेच निष्कारण वादावादीही निर्माण करील. धनस्थानी बुध, रवि, हर्षल योग होत आहे. ध्यानीमनी नसता मोठमोठी कामे निघतील. वैवाहिक जीवनात काही विचित्र प्रकार अनुभवास येऊ शकतात. आरोग्य व मानसिक स्थितीवर परिणाम करणारा हा योग आहे. शत्रू निष्प्रभ होतील.
आनंद एस. मत्तीकोप कुलकर्णी
1812-1 ब, केळकर बाग, बेळगाव
मो- 9449410911 फोन 0831 – 2424739





