दिनांक 09-10-2022
मेष
आर्थिक आणि सामाजिक यशा बरोबर समाजातील तुमचे नाव वाढण्याची शक्मयता आहे. वयाने ज्ये÷ व्यक्तीच्या असल्यामुळे घरातील वातावरणामध्ये फरक पडेल. दुसऱया गावी राहणाऱया एखाद्या मित्राच्या कामाकरता प्रवास करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी काही सहकाऱयांचा पुरुष पत्करावा लागेल. तब्येतीच्या तक्रारिंकडे दुर्लक्ष करू नये. वैवाहिक आयुष्य सुखमय असेल.
काळय़ा गाईची सेवा करावी
वृषभ
मनासारख्या घटना घडतील. पाहुण्यांच्या गाठीभेटी होते. निर्णय घेताना चार चौघांना विचारून मगच निर्णय घ्यावा. कामाच्या ठिकाणी संधींचे सोने कराल. पोटाच्या तक्रारी त्रास देऊ शकतात. मित्राच्या परिवारातील सदस्य त्याची मदत करावी लागेल. मनातील योजना गुप्त ठेवून कोणासमोरही उघड करू नका.
भीमसेनी कापूर जवळ ठेवावा आणि संध्याकाळी जाळावा
मिथुन
कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाने वेळ घालवाल. संततीच्या दृष्टीने चांगली बातमी कळेल. कामाच्या ठिकाणी चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव येतील. आर्थिक बाबतीमध्ये गाफील राहून चालणार नाही. या आठवडय़ामध्ये आपले कोण आणि परके कोण याची जाणीव ठेवणे महत्त्वाचे ठरेल. तब्येत ठीक ठाक राहील. हसतमुख स्वभावामुळे मित्रांची साथ मिळेल.
पिवळय़ा कागदावर 24 हा नंबर लिहून जवळ ठेवावा
कर्क
तब्येतीच्या दृष्टीने येणारा आठवडा हा तितकासा अनुकूल असणार नाही. सर्दी ताप किंवा व्हायरल इन्फेक्शन त्रास देऊ शकते. या आठवडय़ामध्ये शक्मयतो बँकेचे व्यवहार टाळावे. गुंतवणूक करत असताना फसव्या आश्वासनांवर अति विश्वास ठेवू नये. मित्रांची साथ म्हणावी तशी न मिळाल्यामुळे कामे होण्याकरता विलंब होईल. प्रवासाच्या दृष्टीने सुद्धा हा आठवडा तितकासा अनुकूल नाही. दिलेले वचन पाळणे करता मेहनत घ्यावी लागेल.
कोरफडीचे पान घरात ठेवावे
सिंह
तुमच्या स्वभावाला साजेसे प्रसंग येणार या आठवडय़ामध्ये घडू शकतात. पण त्याचबरोबर तुमच्यामुळे कुणाचे मन दुखावले जाऊ नये याची काळजी घ्या. कुटुंबीय किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्यासोबत काम करणाऱया व्यक्तींची मने सांभाळावी लागतील. आर्थिक दृष्टय़ा येणारा आठवडा हा चांगला असेल. तब्येतीच्या लहानसहान तक्रारी उद्भवू शकतात. इलेक्ट्रॉनिक सामान आयत्या वेळी बिघडू शकते. वैवाहिक जोडीदाराची मदत घ्यावी लागेल.
सूर्य प्रतिमा जवळ ठेवावी
कन्या
थोडी आडजस्टमेंट केली तर बर् याच कामांना वेळेवर पूर्ण करू शकाल. तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे मन कसे वळवावे हे तुम्हाला चांगले माहीत असल्याने त्यांची मदत मिळेल. आर्थिक नुकसान जरी होणार नसले तरी म्हणावा तितका आर्थिक फायदा या आठवडय़ात कठीण दिसतो. नोकरदार वर्गाने टीम वर्क चे महत्व समजून घ्यावे. घरच्यान करता वेळ काढण्याकरता मागेपुढे पाहू नका. या आठवडय़ामध्ये खर्चाचे प्रमाण देखील वाढण्याची शक्म\यता आहे.
एक चमचा गाईचे दूध पाण्यात घालून आंघोळ करावी
तूळ
प्रयत्नांना नशिबाची साथ मिळाली की तो आनंद काहीतरी वेगळाच असतो याचा अनुभव येईल. हाती घेतलेल्या कामांना यशस्वी करून दाखवाल. वृद्धा?नी ज्ये÷ व्यक्ती बद्दल चिंता वाटू शकते. कामाच्या ठिकाणी स्त्री वर्गाकडून विशेष सावध राहावे. नोकरदार वर्गाला राजकारणाचा त्रास होऊ शकतो. तब्येतीची दुखणे कमी होतील. खुपच छान टाळायला लागेल.
पांढऱया कागदावर ती सहा हा आकडा लिहून जवळ ठेवावा
वृश्चिक
कामाची गती थोडी मंदावते आहे. नवीन कामे मिळवण्याकरता ही प्रयत्न करावे लागतील. सोबत काम करणाऱयांची वादविवादाचे प्रसंग येऊ शकतात. कुटुंबी आणि तुमच्या कामाच्या संदर्भात हस्तक्षेप केलेला आवडणार नाही. घरी आनंदाच्या प्रसंगी छोटा वाद होण्याची शक्मयता आहे. पैशांच्या बाबतीत तितकासा अनुकूल असा हा आठवडा नाही. काही ठिकाणी पैसे अडकु शकतात.
निळय़ा रंगाच्या काचेच्या बाटलीतुन पाणी प्यावे
धनु
कामाच्या संदर्भात सतत दुसऱयांची मदत घ्यावी लागल्याने थोडे फ्रस्ट्रेट वाटू शकते. घरची कामे आणि बाहेरची कामे पूर्ण करण्यामध्ये दमछाक होण्याची शक्मयता जास्त आहे. कुटुंबातील व्यक्तींची साथ मिळेल पण तुमच्या अपेक्षा मर्यादित ठेवा. एखाद्या बाल मित्राची आठवण येऊन त्याच्याशी बोलावे असे वाटेल. व्यापारी वर्गाला अनुकूल काळ आहे. तब्येत उत्तम राहील. पितृतुल्य व्यक्ती बद्दल काळजी वाटू शकते.
पाच थेंब मोहरीचे तेल कच्चा जमिनीवर सोडावे
मकर
हा सप्ताह तुम्हाला आनंदाचा जाईल. जवळच्या व्यक्तींची साथ मिळेल. कुटुंबियांसोबत एक लहानशी सहल आयोजित कराल. काहीवेळा आर्थिक तंगी जाणवु शकते. पाण्याच्या ठिकाणी गेलात तर सावध राहा. कलाकारांना चांगल्या संधी प्राप्त होतील. नोकरदार वर्गाला सर्व साधारण असा आठवडा असेल. व्यावसायिकांनी संधींचा चांगला फायदा उचलावा. तब्येतीची मोठी तक्रार दूर होईल. मानसिक आरोग्य सांभाळा.
कुत्र्याला बिस्किटे घालावीत
कुंभ
छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा त्रास करून घेण्याची सवय सोडावी. खर्च करत असताना आर्थिक नियोजन बिघडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. एखादे येणे वसूल न झाल्याने चिडचिड होऊ शकते. या आठवडय़ात कोणत्याही प्रकारच्या उधारीच्या देण्या घेण्यामध्ये अडकू नका. संतती ची काळजी मिटेल. कामाच्या ठिकाणी सहकार् यांसोबत योग्य रीतीने काम केल्याने कामे पूर्ण होतील. शुक्रवार आणि शनिवारी तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल.
मोगऱयाचे अत्तर वापरावे
मीन
योजलेल्या कामांमध्ये यश मिळेल. सरकार दरबाराची कामे वेळेवर पूर्ण होतील. गुरुतुल्य व्यक्तीची साथ मिळेल. कामानिमित्त प्रवास कराल. तुमच्यामुळे एखाद्याचे भले होण्याची शक्मयता आहे. नको त्या व्यक्तीशी बोलावे लागल्याने थोडा मानसिक त्रास संभवतो. हा आठवडा कष्टाचे प्रमाण वाढवणारा आहे. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक रित्या तयार रहावे लागेल. कुटुंबातील व्यक्ती कडून भेट वस्तू प्राप्त होईल.
पिवळय़ा रंगाचा हात रुमाल जवळ ठेवावा.
टॅरो उपायः काही घरांमध्ये बिलकुल बरकत येत नाही. घरातील व्यक्ती एकमेकांशी नीट वागत नाहीत. अशावेळी जिथे राहता तिथून पूर्व दिशेला एखाद्या सुगंधित झाडाचा शोध घ्यावा. रविवारी सकाळी सूर्योदय अगोदर तिथे जावे. सूर्य उगवताना दिसला की लगेच त्याचे एक फूल तोडावे आणि पाण्यात टाकून द्यावे. त्या पाण्याने सगळय़ा व्यक्तींनी अंघोळ करावी





