वार्ताहर / राशिवडे
राधानगरी तालुक्यात “माझे कुटुंब ,माजी जबाबदारी'” योजनेच्या अंमलबजावणी बाबत आज राधानगरीच्या तहसीलदार मीना निंबाळकर यांनी राशिवडे, येळवडे, पुंगाव या गावांना अचानक भेटी दिल्या व सुचना केल्या. तर राशिवडे येथे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांची दुकाने सिल करण्यात आली. तहसिलदार निंबाळकरांच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
“माझे कुटुंब माझी जबाबदारी” योजनेच्या अंमलबजावणीसाठी तहसीलदार मीना निंबाळकर यांनी राशिवडे, येळवडे, पुंगाव आदी गावामध्ये अचानक भेटी दिल्या. त्यानंतर राशिवडे बाजारपेठेमध्ये फेरफटका मारला. त्यावेळी मास्क न वापरणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, सुरक्षित अंतर न ठेवणे या कारणावरुन येथील दोन दुकाने तात्काळ सिल करुन त्यांना नोटीसा देण्यात आल्या. यावेळी मंडलनिरिक्षक देवीदास तारडे, तलाठी सुनिल खेडेकर, सरपंच कृष्णात पोवार, उपसरपंच अनिल वाडकर, ग्रामविकास अधिकारी शिवाजी आरडे, ग्रा. पं. सदस्य डॉ. जयसिंग पाटील, किरण बिल्ले, सम्राटसिंह पाटील आदी उपस्थित होते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येतील अशा सुचना यावेळी तहसीलदार निंबाळकर यांनी व्यापाऱ्यांना दिल्या.








