वार्ताहर / राशिवडे
राशिवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकार्याच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या संपर्कात असणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
राशिवडे येथे आरोग्य केंद्र आहे. या केंद्रामध्ये परिसरातील नागरिक आरोग्य तपासणीसाठी नेहमी येत असतात. तसेच याठिकाणी बाह्य रुग्णांची तपासणी मोठ्या प्रमाणात होत असते. या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्गाने चार महिन्यात झोकुन काम करत असुन घर टु घर, गाव टु गाव सर्वेचे काम करत आहेत. या नित्य संपर्कामुळे या अधिकार्याला लागण झाल्याची शक्यता आहे. त्यांच्या संपर्कातील अन्य कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.
Previous Articleख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे अमेरिकेत निधन
Next Article मिल्कबास्केट, अर्बन लॅडरवर रिलायन्सचा डोळा









