प्रतिनिधी / राशिवडे
राशिवडे (ता.राधानगरी) .शुभांगी बाजीराव कुरणे(वय३२) या विवाहीतेने कौटुंबिक नैराश्याने आपल्या राहत्या घरी पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास लावुन आत्महत्या केली.ही घटना आज (शनिवार दि.२० )सकाळच्या दरम्यान घडली.या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत राधानगरी पोलिसाकडुन मिळालेली माहीती अशी की, शुभांगी यांचे पती बाजीराव हे पुणे येथे नोकरीसाठी होते,याच नैराश्येतुन तीने राहत्या घरी तिसऱ्या मजल्यावर जाऊन पंख्यास साडीने गळफास लावुन आत्महत्या केली.या घटनेची वर्दी तिचे पती बाजीराव याने राधानगरी पोलीस ठाण्यात दिली. सोळांकुर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली,सासरे असा परिवार आहे.