23.01.2022 ते 29.1.22
राशींचा देश टॅरोचा संदेश
मेष
व्यवसायात प्रगती दाखवणारा आठवडा आहे. कुटुंबातील स्त्रीमुळे समस्या सुटतील. वैयक्तिक अडचणींवर मात कराल. संधींचा फायदा घ्या. तब्येत ठीक राहील. कामाच्या ठिकाणी मन स्थिर ठेवा. मन दोलायमान असेल. पैशांची आवक सर्वसामान्य राहील. लवमेट्सनी आपल्या जोडीदाराच्या वर्तनावर लक्ष ठेवावे. त्यासंबंधी नवी माहिती कळेल. स्वतःमध्ये सुधारणा करा.
वृषभ
या आठवडय़ात स्वभाव बंडखोर होईल. कुटुंबातील सदस्याशी मतभेद झाल्याने मन उदास असेल. या आठवडय़ाचा उपयोग व्यसनांपासून दूर जाण्यासाठी आणि स्वतःला शिस्त लावण्यासाठी करा. पैशांची आवक चांगली असेल. तब्येतीची काळजी घ्या. कामाच्या बाबतीत आपले खरे मित्र कोण आणि गुप्तशत्रू कोण हे समजून घेऊन व्यवहार करा. पेरीडॉट क्रीस्टल जवळ ठेवा.
मिथुन
तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. तुमचे इन्टूशन्स तुम्हाला संकटातून वाचवतील. स्वप्नांचे महाल बांधण्यापेक्षा वास्तवाशी दोन हात करा. असा टॅरोचा संदेश आहे. पूर्वी केलेल्या चांगल्या कर्माचे फळ मिळेल. परिवारात चांगले वातावरण असेल. पाण्याच्या ठिकाणी जाणे टाळा. पैशाची व्यर्थ चिंता करू नका. कामाला जाताना एक सुगंधी फूल जवळ ठेवा.
कर्क
हा आठवडा सकारात्मक आहे. संधींचे सोने कराल. संततीसंबंधी काळजी मिटेल. दुखणे अंगावर काढू नका. ज्या बाबतीत बोलणे टाळत होता तिथे बोलावे लागेल. गैरसमजामुळे थोडा त्रास होऊ शकतो. पैशांची आवक ठीक राहील. लवमेट्सनी आपले मत स्पष्ट सांगावे. समोरची व्यक्ती ग्रँटेड पकडू शकते. हिरवा हात रुमाल जवळ ठेवावा.
सिंह
ज्ये÷ व्यक्तीच्या सल्ल्यामुळे, मदतीमुळे कठीण प्रसंगापासून वाचाल. कुटुंबातील स्त्राrवर्गामुळे चिडचिड होईल. अध्यात्माकडे मन झुकेल. पैशांची आवक उत्तम राहील. खांदा आणि मानेचे दुखणे येऊ शकेल. गुंतवणुकीकरता योग्य वेळ आहे. कामाच्या ठिकाणी कष्ट जास्त पण नफा कमी असे वाटेल. उगवत्या सूर्याचा फोटो जवळ ठेवा.
कन्या
धरसोड वृत्तीला आळा घालून ठामपणे निर्णय घेण्याची गरज आहे. आठवडय़ाच्या मध्यावर घरातील वातावरण गंभीर असेल. एखाद्या गोष्टीबद्दल चर्चा होईल. पोटाचे विकार असणाऱयांनी बाहेर खाणे टाळावे. धनप्राप्ती उत्तम. लवमेट्सकरता काळ प्रतिकूल आहे. कामाच्या ठिकाणी गेंधळून जाऊ नका. घरात लाजाळूचे झाड लावा.
तुळ
उत्साहाचा आणि आनंदाचा आठवडा आहे. जे काम कराल त्यात योग्य माणसांची साथ मिळेल. तब्येत सुधारण्यासाठी चांगल्या सवयी लावून घ्याल. कुटुंबातील क्यक्तींच्या छोटय़ा मोठय़ा चुकांकडे दुर्लक्ष करावे लागेल. आर्थिक पक्ष मजबूत असेल. लवमेट्सना एकमेकांची पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी अनावश्यक चर्चा टाळा. आंब्याची 5 पाने आणि हळकुंड जवळ ठेवा.
वृश्चिक
सकारात्मक बदलाला सामोरे जाल. गेल्या काही दिवसांपासून होत असलेली ओढाताण कमी होईल. यशप्राप्तीकरता नक्की काय करावे हे तुम्हाला कळेल. तब्येतीच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल आहे. पैशांची आवक ठीक राहील. कुटुंबातील वृद्ध व्यक्तीबद्दल काळजी वाटेल. काम करत असताना मन एकाग्र ठेवा. लाल रंगाची काचेची गोटी जवळ ठेवा.
धनु
उज्ज्वल भविष्याची चाहूल देणारा आठवडा आहे. त्याचबरोबर टॅरोचा संदेश असाही आहे की आपल्या मित्रांवर, जवळच्या व्यक्तींवर विश्वास जरुर असावा पण आंधळा विश्वास नको. या आठवडय़ात तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल. आर्थिक आवक चांगली राहील. लवमेट्सनी थोडी तडजोड स्वीकारावी. कामे मंद गतीने होतील. झऱयाचे वाहते पाणी घरी ठेवावे.
मकर
अंतःप्रेरणेमुळे अनेक प्रश्न मार्गी लागतील. या आठवडय़ात काही दैवी अनुभव येऊ शकतो. कुटुंबातील ज्ये÷ स्त्रीच्या मार्गदर्शनामुळे किंवा मदतीमुळे फायदा होईल. परिवाराची साथ मिळेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. लवमेट्सनी भावना योग्य प्रकारे व्यक्त कराव्या. कामाच्या ठिकाणी दुसऱयांचे सहकार्य घ्यावे लागेल. निळय़ा रंगापासून दूर राहावे.
कुंभ
सगळे ठीक असूनसुद्धा एकाकी वाटू शकते. हा काळ व्यर्थ काळजी न करता आत्मपरीक्षणाचा आहे. घडलेल्या चुकांना स्वीकारून यशासाठी प्लॅनिंग करण्याचा आहे. अनेक लोक सहकार्य करतील. पण तुम्ही योग्य रितीने ते स्वीकारले पाहिजे. पैशाची आवक ठीक असेल. कामात उशिरा यश मिळेल. मोरपीस जवळ ठेवावे.
मीन
काम करण्याची गती वाढवावी लागेल. परिवारातील सदस्यांची मने सांभाळावी लागतील. जबाबदारी वाढेल. पैशांची आवक ठीक राहील. लवमेट्सना काळ अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात सकारात्मक वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी वरि÷ांच्या चुकांमुळे मनस्ताप संभवतो. आपली जबाबदारी पूर्ण कराल. पिवळा कागद पैशाच्या पाकिटात ठेवा.
टॅरो उपायः
आंब्याच्या झाडावरचे बांडगूळ (एक छोटा तुकडा) घराच्या ईशान्य भागात ठेवावे. बाधा येत नाही.





