रवि. 31 मे 6 जून 2020
मेष
सूर्य, चंद्र त्रिकोण योग, सूर्य, बुध युती होत आहे. तुमचा उत्साह, आत्मविश्वास जास्त वाढेल. धंद्यात लाभ होईल. विरोधक तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. नोकरीत नम्रता ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात किरकोळ कारणाने तुमच्या कामात व्यत्यय आणण्याचा डाव खेळला जाईल. सावध रहा. शांत रहा. मार्ग मिळेल.
वृषभ
चंद, गुरु त्रिकोण योग, सूर्य, शुक्र युती होत आहे. कठीण वाटणारे काम करून घेता येईल. धंद्यात वाढ होईल. बुधवार, गुरुवार कायदा पाळा, वाद वाढवू नका. नोकरीत वरि÷ांची मर्जी राखता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. लोकांच्या हिताचे कार्य करू शकाल. समस्या सोडवाल. मेहनत घ्या. कला, साहित्यात विशेष काम करता येईल.
मिथुन
चंद, मंगळ केंद्रयोग, बुध, हर्षल लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या शेवटी तुमच्यावर आरोप येईल. धंद्यात समस्या येईल. कायद्याचे योग्य प्रकारे पालन करा. वाद वाढवू नका. नवीन ओळखीवर अवलंबून कोणताही व्यवहार करू नका, फसाल. प्रकृतीची काळजी घ्या. वृद्धांच्या संबंधी चिंता वाटेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला कमी लेखले जाईल. घरात गैरसमज होईल.
कर्क
चंद्र, गुरु त्रिकोणयोग, सूर्य, शुक्र युती होत आहे. धंद्यात नवे काम मिळवता येईल. सुधारणा होईल. उत्साह वाढेल. प्रवासात घाई करू नका. नोकरीत जबाबदारी पूर्ण कराल. राजकीय, सामाजिक कार्यात लोकांच्या उपयोगी पडा. त्यांच्या सहाय्यानेच तुम्ही मेठेपणा घेतले आहे. महत्त्वाची कामे करा. रागावर ताबा ठेवा. घरात शुभ समाचार मिळेल.
सिंह
सूर्य, चंद्र त्रिकोण योग, सूर्य, शुक्र युती होत आहे. धंद्यात काम वाढेल. सप्ताहाच्या शेवटी कोणतेही काम करताना कायदा मोडू नका. रागावर ताबा ठेवा. नोकरीत तुम्ही प्रगती कराल. वरि÷ खूष होतील. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाची भूमिका निभावून न्याल. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. घरातील वातावरण उत्साहवर्धक राहील.
कन्या
चंद्र, गुरु त्रिकोण योग, सूर्य, शुक्र युती होत आहे. धंद्यातील समस्या कमी होईल. चर्चा सफल होईल. भागिदाराला खूष कराल. वसुली होऊ शकेल. नोकरीत विरोध मोडून काढता येईल. मित्रांना मदत कराल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रतिष्ट सांभाळता येईल. लोकांच्या कामात मदत करून तुमचे महत्त्व वाढवाल. आर्थिक सहाय्य मिळवता येईल.
तुळ
सूर्य, चंद्र षडाष्टक योग, बुध, हर्षल लाभयोग होत आहे. धंद्यात जपून निर्णय घ्या. फसगत होऊ शकते. मौल्यवान वस्तू सांभाळा. स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्या. जवळच्या व्यक्तीसंबंधी समस्या निर्माण होईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कोणताही मोह तुम्हाला संकटात टाकेल. व्यसन करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न होईल. तुमची बाजू घेणारे कमी असतील.
वृश्चिक
सूर्य, चंद्र त्रिकोण योग, सूर्य, शुक्र युती होत आहे. धंद्यात वाढ करता येईल. सुधारणा होईल. नवे काम मिळेल. नोकरीत महत्त्व वाढेल. वसुली करण्याचा प्रयत्न करा. संसारात मंगळवार, बुधवार तणाव होईल. नम्रता उपयुक्त ठरेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या निर्णयाचे, कामाचे कौतुक होईल. विरोधक टीका करतील. शब्द जपून वापरा.
धनु
सूर्य, चंद्र षडाष्टक योग, बुध, हर्षल लाभयोग होत आहे. धंद्यात उतावळेपणा करू नये. गोड बोलून तुम्हाला जास्त मोह दाखवण्याचा प्रयत्न होईल. सावध रहा. नोकरीत कामाची कटकट वाढेल. कामात चूक होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्ही केलेले प्रयत्न विरोधकच नाही तर जवळचे लोक मोडून काढतील. निरीक्षण करून ठेवा. पुढे संधी मिळेल. प्रकृतीची काळजी घेण्यास विसरु नका, सावध रहा.
मकर
सूर्य, चंद्र त्रिकोण योग, सूर्य, शुक्र युती होत आहे. महत्त्वाचा सप्ताह ठरेल. धंद्यातील तणाव कमी करून चांगली वाढ करता येईल. चर्चा सफल होईल. नोकरीत प्रभाव वाढेल. वरि÷ांना खूष करा. घरातील वातावरण आनंदी राहील. मुले प्रगती करतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्ही वेगाने कार्य सुरू ठेवा. प्रत्येक संधी महत्त्वाची ठरेल.
कुंभ
शुक्र, मंगळ केंद्रयोग, बुध, हर्षल लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात धावपळ होईल. खर्च वाढेल. रागावर ताबा ठेवा. प्रवासात घाई करू नका. नोकरीत तुमच्यावर जास्त कामाचा बोजा टाकला जाईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर टीका होईल. तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. संसारात चिंताजनक वातावरण वाटेल, लेखन करता येईल.
मीन
चंद्र, गुरु त्रिकोण योग, सूर्य, बुध युती होत आहे. धंद्यात फायदा होईल. शेअर्समध्ये तात्पुरता लाभ करून घेता येईल. नोकरीत महत्त्वाचे काम करून दाखवाल. प्रवासात वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात लोकांच्या हितासाठी निर्णय घ्या. मदत कार्यात नावलौकिक मिळेल. आर्थिक सहाय्य जमा करून योग्य कार्य करता येईल. कला, साहित्यात प्रगती करा.





