रवि. दि. 31 ऑक्टो. ते 6 नोव्हें. 2021
मेष
या सप्ताहात तुला राशीत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. दीपावली आनंदात व उत्साहात साजरी करा. अनेक महत्त्वाची कामे कशा पद्धतीने लवकर पूर्ण करता येतील याकडे लक्ष द्या. धंद्यात वाढ होईल. नवे काम मिळवता येईल. वसुली करून योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करा. मंगळवार, बुधवार रागावर ताबा ठेवा. नोकरीत वरिष्ठची मर्जी राखता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे डावपेच फारच प्रभावी ठरतील. वर्चस्व वाढेल. सर्वांना योग्य मार्गदर्शन करून पुढे जाता येईल. कला, क्रीडा, साहित्यात मान सन्मान मिळेल.
वृषभ
या सप्ताहात तुला राशीत बुध प्रवेश, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. दीपावली आनंदात साजरी करा. कोणताही कायदा मोडू नका. वादविवाद वाढवू नका. नरकचतुर्दशी, लक्ष्मी कुबेर पूजन, भाऊबीज यादिवशी संयम ठेवा. प्रवासात घाई करू नका. पूजनात मन एकाग्र करा. धंद्यात गोड बोला, महत्त्वाच्या वस्तू नीट सांभाळा. संसारात खर्च वाढेल. घरातील व्यक्तींना नाराज करू नका. नोकरी टिकवा. कामात चूक करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात बोलताना कृति करताना काळजी घ्या. चुकीचे वक्तव्य टाळा. सर्वांच्या बरोबरच नमते धोरण ठेवा. स्पर्धेत जिद्द ठेवा. नवीन व्यवहारात फसू नका. मोह टाळा.
मिथुन
या सप्ताहात तुला राशीत बुध प्रवेश, बुध, शुक्र लाभयोग होत आहे. दीपावली खूप आनंदाची वाटत नसली तरी परंपरेनुसार वागण्याने मन प्रसन्न राहते. धंद्यात वाढ होईल. उत्साह व आत्मविश्वास वाढेल. जुने येणे वसूल करा. नवे मोठे काम मिळवता येईल. नोकरीत वरि÷ तुमच्या कामाचे कौतुक करतील. राजकीय, सामाजिक कार्याला गती मिळेल. कामे रेंगाळत ठेवू नका. नवीन ओळखी होतील. आर्थिक सहाय्य मिळवता येईल. घरातील वातावरण आनंदी ठेवता येईल. भाऊ बिजेच्या दिवशी कायदा पाळा. वस्तू सांभाळा. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल. प्रेमाला चालना देणारी घटना घडेल. कोर्टाच्या कामात सहाय्य घेता येईल.
कर्क
या सप्ताहात तुला राशीत बुध प्रवेश, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. दीपावली आनंदात साजरी करा. सणांच्या परंपरा आपल्याला दुःखातून बाहेर काढण्यासाठी उपयुक्त असतात. खरेदी करताना सावध रहा. पाकीट नीट ठेवा. धंद्यात वादविवाद वाढवू नका. फायदा होईल. नोकरीत वरि÷ांना मदत करावी लागेल. सौम्य शब्दात मत मांडा. राजकीय, सामाजिक कार्यात जबाबदारी घ्यावी लागेल. जवळची माणसे तिरसटासाठी वागत आहेत, असे वाटेल. प्रवासात घाई करू नका. संसारात क्षुल्लक कारणाने मनावर दडपण येईल. खाण्या-पिण्याचे तंत्र सांभाळा. कला, क्रीडा, साहित्यात उतावळेपणा करू नका.
सिंह
या सप्ताहात तुला राशीत बुध प्रवेश, सुर्य, चंद्र लाभयोग होत आहे. दीपावली आनंदात साजरी करा. दीपोत्सव म्हणजे निराशेकडून आशेकडे जाण्याचा उत्सव आहे. दीपावलीचा प्रत्येक दिवस मनाप्रमाणे साजरा करू शकाल. भाऊबिजेच्या दिवशी घाई करू नका. वस्तू नीट ठेवा. धंद्यात फायदा होईल. गुंतवणूक विचारपूर्वक करा. नोकरी टिकवता येईल. इतरांना मदत केल्याने तुमचे वर्चस्व वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाची कामे करून घ्या. वेळकाढू धोरण नंतर त्रासदायक ठरेल. सर्वांचे सहाय्य घेता येईल. कला, क्रीडा, साहित्यात पुढे जाता येईल.
कन्या
या सप्ताहात तुला राशीत बुध प्रवेश, बुध, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात जम बसेल. रविवार, सोमवार क्षुल्लक तणाव वाढवू नका. दीपावली आनंदात साजरी करा. येणारा दिवस महत्त्वाचा ठरेल असे काम करता येईल. मागील येणे वसूल करा. नोकरीत वर्चस्व वाढेल. राजकीय, सामाजिक कार्याला गती मिळेल. वरिष्ठ मदत करतील. पैशांचा उपयोग चांगल्या कार्यासाठी झाल्याने जनता खूष होईल. महत्त्वाची कामे करून घ्या. घरातील कामे होतील. व्यवहार रेंगाळत ठेवू नका. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती कराल. ओळखी वाढतील. प्रेरणा देणारी व्यक्ती सहवासात येईल.
तुला
या सप्ताहात तुमच्याच राशीत बुध प्रवेश करीत आहे. चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. मनावरील दडपण कमी होईल. धंद्यात वाढ झाल्याने उत्साह वाढेल. मोठे काम मिळेल. पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी करा. दीपावली आनंदात साजरी करा. मंगळवार, बुधवार सावधपणे कामे करा. दुखापत टाळा. प्रवासात घाई करू नका. रागावर ताबा ठेवा. नोकरीत वरि÷ांचे मत ऐकावे लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात वेगाने पुढे जाता येईल. कायदा मात्र मोडू नका. तुमचे स्थान मजबूत करण्यासाठी मेहनत घ्या. कला, क्रीडा साहित्यात जिद्दीने प्रगती करू शकाल. ओळखी वाढतील.
वृश्चिक
या सप्ताहात तुला राशीत बुध प्रवेश करीत आहे. चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. लक्ष्मी, कुबेर, पूजन, दिवाळी पाडवा या दिवशी मन अस्थिर होईल. प्रवासात सावध रहा. दीपावली आनंदात साजरी करा. कोणताही निर्णय उतावळेपणाने घेऊ नका. धंद्यात तडजोड करावी लागेल. अरेरावी करण्याने वाद वाढेल. नोकरी टिकवा. वरिष्ठचा शब्द मोडू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्यावर आरोप होईल. प्रवासात धोका होईल. काळजी घ्या. इतरांचे मत विचारात घ्यावे लागेल. हट्टीपणा करून तणाव होईल. घरातील वृद्ध व्यक्तीसाठी धावपळ होईल. कोणतीही स्पर्धा सोपी नाही. मैत्रीने वागा.
धनु
या सप्ताहात तुळेत बुध प्रवेश होत आहे. सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. दीपावली आनंदात साजरी कराल. दिवाळी पाडवा व भाऊबीज या दिवशी जास्त धावपळ करू नका. कायदा मोडू नका. आप्तेष्टांच्या सहवासाने उत्साह वाढेल. धंद्यात वाढ करता येईल. मागील येणे वसूल करा. नवीन ओळखीचा उपयोग करून घेता येईल. नोकरीत वरिष्ठचे मन जिंकाल. प्रेमाला चालना मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात योग्य कार्यपद्धतीचा अवलंब करा. योजनांना वेगाने पुढे न्या. मान-प्रति÷ा मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात उत्तम प्रगती कराल. महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. वेळापत्रक पुढच्यासाठी बनवा.
मकर
या सप्ताहात तुला राशीत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. दीपावली आनंदात व उत्साहात साजरी करा. नव्या कार्याचा आरंभ दिवाळी पाडव्याला करता येईल. धंद्यात फायदा होईल. योग्य प्रकारे पैसा गुंतवा. मोहाला बळी पडू नका. अनाठायी खर्च टाळा. नोकरीत मित्रांना मदत करावी लागेल. नवीन ओळखीत व्यवहार करण्याची घाई करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात चांगली कामे कराल. विरुद्धलिंगी व्यक्तीकडून मनस्ताप होईल. फसगत टाळा. क्रीडा, साहित्य, शिक्षणात पुढे जाल. संसारात क्षुल्लक वाद वाढवू नका.
कुंभ
या सप्ताहात तुला राशीत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. मंगळवार, बुधवार धावपळ होईल. कायदा मोडू नका. दीपावली आनंदात साजरी करता येईल. घरातील व्यक्तींना खूष कराल. मागील येणे वसूल करा. नवीन मैत्री तयार होईल. नोकरीत प्रभाव दाखवता येईल. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे प्रभाव ठरतील. अनुभवी व्यक्तीची मदत घेताना कमीपणा मानू नका. म्हणजे चूक होणार नाही. संसारात मुलांच्याकडून शुभ समाचार मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात प्रसिद्धी मिळेल. पैसा मिळेल. चांगला निर्णय विचारपूर्वकतेने घ्या.
मीन
या सप्ताहात तुला राशीत बुध प्रवेश, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. दीपावलीमध्ये उत्साह वाढेल. परंतु कोणतेही काम करताना हातून चूक होऊ देऊ नका. दुखापत टाळा. वाहन हळू चालवा. धंद्यात दादागिरी करू नका. समोरच्या व्यक्ती तुमच्या विरोधात जातील. सौम्य धोरण ठेवा. नोकरीत नम्रता ठेवा. नोकरी टिकवा. राजकीय, सामाजिक कार्यात चुकीचे विधान होणार नाही याकडे लक्ष द्या. वरिष्ठना कमी लेखू नका. मनमानी केल्याने त्रास वाढेल, कला, क्रीडा, साहित्यात सांभाळून रहा. जिद्द ठेवा. अभिमान नको. बेकायदा कृत्य टाळा. प्रकृतीची काळजी घ्या.





