रवि. दि. 17 ते 23 ऑक्टोबर 2021
मेष
या सप्ताहात तुळ राशीत रवि, मंगळ, प्रवेश करीत आहे. सोमवार, मंगळवार बोलण्यात चूक करू नका. व्यवहारात हिशोब नीट करा. मौल्यवान वस्तू नीट सांभाळा. धंद्यात गोड बोला. कायद्याचे पालन योग्य प्रकारे करा. नोकरीत कामाचा व्याप वाढला तरी तुमचे वर्चस्व राहिल. मैत्रीत गैरसमज होईल. संसारात खर्च वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात विरोधक मैत्रीचे नाटक करून गुपित काढून घेण्याचा प्रयत्न करतील. कला, क्रीडा, साहित्यात जिद्दीने यश मिळवता येईल.
वृषभ
या सप्ताहात तुळ राशीत रवि, मंगळ प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या शेवटी तुम्हाला काळजीपूर्वक कामे करावयाची आहेत. कायदा मोडू नका. विरोधक तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न राजकीय, सामाजिक क्षेत्रात करतील. प्रति÷ा सांभाळा. धंद्यात कामे मिळतील. मागील येणे वसूल करा. नोकरीत वरि÷ांच्या विरोधात जाऊ नका. तणाव होईल. संसारात अनाठायी खर्च वाढेल. घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. कला, क्षेत्रात विशेष यश मिळेल क्रीडा, साहित्य, शिक्षणात मेहनत घ्या. स्पर्धा कठीण असेल.
मिथुन
या सप्ताहात तुळ राशीत रवि, मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यात खर्च वाढेल. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका. नवे काम मिळवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत मेहनत घ्या. मैत्रीत कामे करताना सावध रहा. दुसऱयांना मदत करताना फसगत टाळा. घरातील व्यक्तीच्या समवेत क्षुल्लक तणाव होईल. घरासंबंधी खर्च वाढेल. मौल्यवान कागदपत्रे, वस्तू जागेवर ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला समस्या वेळच्या वेळी सोडवाव्या लागतील. खाण्याची काळजी घ्या. स्पर्धेत यश मिळवणे सोपे नाही.
कर्क
या सप्ताहात तुळ राशीत सूर्य, मंगळ प्रवेश करीत आहे. रविवारी तणाव होईल. प्रवासात सावध रहा. धंद्यात जम बसेल. नवे काम मिळवता येईल. व्यक्तीचे काम लवकर करून घ्या. थकबाकी वसूल करा. नोकरीत कामाचे कौतुक होईल. नवीन ओळखी वाढल्याने उत्साह वाढेल. नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात राहून गेलेली कामे वेळेत मार्गी लावा. स्थान मजबूत करा. लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न करा. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती कराल. घर, जमिनीसंबंधीची कामे लवकर करून घ्या.
सिंह
या सप्ताहात तुला राशीत सूर्य, मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यात तडजोड करावी लागेल. हिशोब चुकू नका. गिऱहाईकाबरोबर वाद वाढवू नका. भागिदार कुरबूर करेल. पैशांची चणचण भासेल. नोकरीत तुमच्या बुद्धिमत्तेचे कौतुक होईल. वरि÷ांना खूष करता येईल. मैत्रीत वाहवत जाऊ नका. मोह आवरा. व्यसनाने नुकसान होईल. पोटाची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणीवर मात करावी लागेल. सल्ला देणारी व्यक्ती योग्यतेची असावी याकडे लक्ष द्या. कला, क्रीडा, साहित्यात तुमचे महत्त्व वाढले तरी जवळची माणसे काडय़ा घालतील. स्पर्धेत टिकून राहता येईल.
कन्या
या सप्ताहात तुळेत रवि, मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यात वाढ होईल. थकबाकी वसूल करा. कर्जाचे काम करताना रागावर ताबा ठेवा. नवीन ओळखी होतील. त्यांची मदत घेता येईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. किचकट कामे लवकर संपवा. कोर्टकेस मार्गी लावा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. विरोधकांना नमवता येईल. दिग्गज लोकांचा सहवास वाढेल. आत्मविश्वासात भर पडेल. तुमचे डावपेच यशस्वी करता येतील. सप्ताहाच्या शेवटी प्रवासात सावध रहा. वाद वाढवू नका. संसारात किरकोळ मतभेद होतील. चांगली बातमी मिळेल.
तुळ
या सप्ताहात तुला राशीत सूर्य, मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यात कठोर शब्दात बोलू नका. चर्चा करताना, करार करताना सावध रहा. थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न करा. नोकरी टिकवण्याचा प्रयत्न करा. वरि÷ांना मदत करावी लागेल. स्वतःच्या कामात चूक करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चुकीचे वक्तव्य होणार नाही याची काळजी घ्या. प्रति÷ा सांभाळा. कायदा मोडणार नाही, विरोधकांच्या कटात अडकणार नाही. याकडे लक्ष द्या. कला, क्रीडा, साहित्यात मेहनत घ्यावी लागेल.
वृश्चिक
या सप्ताहात तुळ राशीत रवि, मंगळ प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या शेवटी राजकीय, सामाजिक कार्यात समस्या वाढतील. विरोधक त्रस्त करतील. दौऱयात सावध रहा. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. नवीन परिचय तुमचा उत्साह वाढवतील. धंद्यात चर्चा यशस्वी होईल. धंद्यात नावाजलेल्या व्यक्तीबरोबर तंटा करू नका. थकबाकी वसूल करा. बुद्धिचातुर्य वापरा. स्पष्ट बोलणे त्रासदायक ठरेल. नोकरीत वरि÷ांची नाराजी होईल. अचानक कामात बदल झाल्याने अडचणी येतील. संसारात वरि÷ांची काळजी वाटेल. स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या, स्पर्धा कठीण आहे.
धनु
या सप्ताहात तुला राशीत रवि, मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यात वाढ होईल. खर्चही करावा लागेल. जास्त मोह ठेवू नका. नवीनच परिचय झालेल्या व्यक्ती समवेत व्यवहार करताना फसगत होईल. सावध रहा. प्रेमात तणाव होईल. व्यसनाने नुकसान होईल. खाण्याची काळजी घ्या. वस्तु नीट सांभाळा. घरात जवळच्या व्यक्ती मनस्ताप देतील. नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तत्परता दाखवा. सहकारी मंडळींना कमी लेखू नका. जनहिताच्या योजनेत अडथळे येतील. जिद्द ठेवा. स्पर्धा जिंकाल. मैत्रीत नाराजी होईल.
मकर
या सप्ताहात तुळेत सूर्य, मंगळ प्रवेश करीत आहे. साडेसातीचे पर्व सुरू आहे. धंद्यातील समस्या सोडवता येईल. नवे कंत्राट मिळवता येईल. कर्जाचे काम मार्गी लागेल. नवीन ओळखी वाढतील. तुमचा उत्साह वाढेल. नोकरीत चांगली प्रगती कराल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात वेगाने पुढे जाता येईल. योग्य कार्यपद्धतीची मांडणी करा. लोकप्रियता व लोकसंग्रह वाढेल. संसारात चांगली बातमी मिळेल. विवाहासाठी स्थळे मिळतील. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल.
कुंभ
या सप्ताहात तुला राशीत रवि, मंगळ प्रवेश करीत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात कायदा पाळा. चर्चा करताना फसगत टाळा. कठोर बोलणे टाळा. धंदा टिकवा. मनोबल टिकवून ठेवण्यात यश मिळेल. नोकरीत संयम व सहनशीलता ठेवा. नोकरी टिकवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न विरोधक करतील. तुमचे मुद्दे खोडून काढले जातील. तरीही प्रति÷ा सांभाळून ठेवता येईल. जवळचे चाहते तुमची बाजू घेतील. कला, क्रीडा, साहित्यात तुमचा प्रभाव वाढेल. संसारात कामे वाढतील. दगदग होईल.
मीन
या सप्ताहात तुळेत रवि, मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यात जम बसवण्याचा प्रयत्न करा. मागील येणे वसूल करा. रविवारी रागावर ताबा ठेवा. प्रवासात वाहनाचा वेग कमी ठेवा. किचकट, कठीण वाटणारी कामे करण्याचा प्रयत्न करा. नम्रता ठेवा. नोकरीत व्याप वाढेल. मित्रांची मदत मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला कोणताही वाद वाढवून चालणार नाही. प्रति÷ा सांभाळा. वेळेला महत्त्व द्या. जवळच्या लोकांना कमी समजू नका. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. संसारात आनंदी रहाल. शेअर्समध्ये लाभ मिळेल.





