रवि. दि. 29 ऑगस्ट ते शनि. 4 सप्टेंबर 2021
मेष
या सप्ताहात सूर्य, चंद्र लाभयोग, शुक्र, नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. धंद्याच्या व्यवहारात लक्ष ठेवा. व्यसन करू नका. चर्चा करताना वाद होईल. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. संसारात तणाव होईल. प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात प्रति÷ा वाढेल. जवळची नेतेमंडळी तुम्हाला संभ्रमात टाकतील. कुणालाही कमी समजू नका. स्पर्धेत जिंकाल, मैत्री टिकवा.
वृषभ
या सप्ताहात चंद्र, शुक्र त्रिकोण योग, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करा. शेअर्समध्ये फायदा होईल. नोकरीत वरि÷ांच्या मर्जीनुसार कामे करावी लागतील. नवीन ओळखीमुळे उत्साह वाढेल. राजकीय, सामाजिक कार्याला गती मिळेल. भेट घेता येईल. चर्चा यशस्वी होईल. संसारात आनंदी रहाल.
मिथुन
या सप्ताहात सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला धंद्यात समस्या वाद वाढवू नका. कायदा मोडू नका. नोकरीत तुमचे महत्त्व टिकवून ठेवता येईल. अनाठायी खर्च टाळावा लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाची कामे रेंगाळत ठेवू नका. आळसाने नुकसान करून घेऊ नका.
कर्क
चंद्र, बुध त्रिकोण योग, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात चांगली संधी मिळेल. शेअर्समध्ये फायदा होईल. नवीन व्यवसायाचा विचार करता येईल. वसुली करा. नोकरीत वरि÷ांना खूष कराल. संसारात चांगली बातमी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्याला गती देऊन योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. लोकप्रियता लाभेल. स्पर्धा जिंकाल.
सिंह
चंद्र, बुध त्रिकोण योग, चंद्र, शुक्र केंद्रयोग होत आहे. धंद्यात जम बसेल. चर्चा सफल होईल. वसुली करा. शेअर्समध्ये फायदा होईल. शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल. नोकरीत तुमच्या कामाची उत्तम छाप पडेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या प्रगतीशील, संयमी स्वभावाचे कौतुक होईल. नवीन ओळखी होतील. आर्थिक सहाय्य घेता येईल. स्पर्धा जिंकाल.
कन्या
या सप्ताहात सूर्य, शनि षडाष्टक योग होत आहे. धंद्यात अरेरावी करू नका. फायदा होईल. मोठेपणाच्या आहारी न जाता कामे करा. वसुली करा. नोकरीत वरि÷ांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या. संसारात चांगली बातमी मिळेल. वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात बुद्धी वापरा. प्रेमाने बोला. प्रभाव पडेल. अहंकार नको.
तुळ
या आठवडय़ात सूर्य, चंद्र लाभयोग, शुक्र, नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. धंद्यात कठोर शब्द वापरू नका. वाद वाढेल, असे कृत्य टाळा. पाकीट सांभाळा. नोकरीत तुमच्या कामाची स्तुती होणार नाही. वरि÷ मात्र तुम्हाला मान देतील. संसारात अडचणी येतील. पोटाची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या कामावर वरि÷ खूष होतील. सरकारी वर्ग, नेते मंडळी यांना दुखवू नका.
वृश्चिक
या आठवडय़ात चंद्र, बुध त्रिकोण योग, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात तुम्हाला जम बसवता येईल. वसुली करा. शेअर्समध्ये फायदा काढून घ्या. जास्त लोभ नको. नोकरीत तुमच्या कामाचा ठसा उमटेल. विरोधकांना शह देता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती होईल. नवीन ओळखीमुळे उत्साह वाढेल. लोकप्रियता वाढेल. स्पर्धा जिंकाल.
धनु
या आठवडय़ात चंद्र, बुध त्रिकोण योग, सूर्य, चंद लाभयोग होत आहे. धंद्यात धावपळ होईल. पण फायदा होईल. मनाची चंचलता होईल. वसुली करा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. तुमचे महत्त्व टिकवून ठेवता येईल. संसारात सर्व ठीक असले तरी तणाव वाटेल, अस्वस्थ व्हाल. राजकीय, सामाजिक कार्याचा ताण वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. चिंता नको चिंतन करा.
मकर
या सप्ताहात सूर्य, शनि षडाष्टक, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात नवा पर्याय समोर येईल. चर्चा करा. मोठेपणाच्या आहारी न जाता निर्णय घ्या. वसुली करा. कर्जाचे काम करून घ्या. संसारात चांगली बातमी मिळेल. दिग्गज लोकांचा सहवास मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात सावधपणे वागा. प्रति÷ा धोक्मयात आणू नका. भूलथापावर भावून जाऊ नका.
कुंभ
या सप्ताहात सूर्य, चंद्र लाभयोग, शुक्र, नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. धंद्यात आळस करू नका. वाद वाढवू नका. पाकिट सांभाळा. मैत्रीत गैरसमज होईल. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. तुमच्या चांगल्या वागण्याचा हेतू समोरच्या व्यक्तीच्या ध्यानात येणे कठीण आहे. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती कराल. जवळच्या लोकांच्या मनात संशय निर्माण होईल.
मीन
या सप्ताहात चंद्र, बुध त्रिकोण योग, सूर्य, शनि षडाष्टक योग होत आहे. धंद्यात प्रगती कराल. नवे काम मिळेल. वसुली करून घ्या. नोकरीत अहंकाराची भाषा वापरू नका. संसारात आनंदी रहाल. वृद्ध व्यक्तींना प्रेमाने वागवा. राजकीय, सामाजिक कार्यात तत्परता ठेवा. अरेरावी केल्यास नुकसान होईल. गोड बोला, दूरदृष्टिकोन ठेवा. स्पर्धा टाळा.





