रविवार दि.25 ते शनिवार दि.31 जुलै 2021
मेष
या सप्ताहात कर्केत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. धंद्यात जवळच्या व्यक्तीचा सल्ला घ्या. क्षुल्लक वाद वाढवल्यास फायदा होणार नाही. नोकरीत वरि÷ांना काटशह देण्याचा प्रयत्न करू नका. नम्रपणे बोला. संसारात वृद्धांची काळजी वाटेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर संशयास्पद आरोप टाकला जाईल. स्पर्धा जिद्दीsने जिंका.
वृषभ
या सप्ताहात कर्केत बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. चतुराई धंद्यात ठेवा. खर्च वाढेल. घरात किरकोळ वाद होईल. व्यसन करू नका. नोकरीत वरि÷ांच्या कामात मदत करावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात वेळकाढू धोरण ठेवू नका. पुढे अडचणी येतील. वाहन जपून चालवा. शेतकरी वर्गाचा उत्साह वाढेल. स्पर्धेत प्रगती कराल.
मिथुन
या सप्ताहात कर्केत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात फायदा होईल. योग्य सल्ल्याने शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याने लाभ वाढेल. नवीन ओळखीमुळे तुमच्या कामास मदत मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. जनतेला खूष कराल. नोकरीत प्रगती होईल.
कर्क
या सप्ताहात तुमच्या राशीत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. धंद्यातील समस्या कमी करता येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला खर्च वाढेल. तणाव होईल. संयम ठेवा. तुमची कामे करून घेता येतील. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगतिकारक निर्णय घेऊ शकाल. प्रतिमा उजळेल. नवीन ओळखीने उत्साह वाढेल. चांगली बातमी मिळेल.
सिंह
या सप्ताहात कर्केत बुध प्रवेश, शुक्र, शनि षडाष्टक योग होत आहे. धंद्यात चर्चा करताना फसगत होईल, सावध रहा. कायदा पाळा. नोकरीत कामाचा ताण वाढेल. राजकीय- सामाजिक कार्यात तुमच्याबद्दल गैरसमज पसरवला जाईल. टीका होईल. घरातील वृद्ध व्यक्तीला सांभाळून घ्यावे लागेल. स्पर्धा कठीण आहे.
कन्या
या सप्ताहात कर्केत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात हुशारीने व्यवहार करा. जास्त मोह ठेवल्यास फसाल. व्यसन नको. मौल्यवान वस्तू नीट सांभाळा. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला महत्त्वाचे काम देण्यात येईल. प्रतिष्ठ टिकवता येईल. संसारात क्षुल्लक तणाव होईल. स्पर्धेत जिद्द ठेवा. मैत्रीत गैरवाद होईल.
तुला
या सप्ताहात कर्केत बुध प्रवेश, चंद्र, गुरु युती होत आहे. धंद्यात जम बसेल. मागील येणे वसूल करा. सप्ताहाच्या मध्यावर तणाव होईल. कायदा पाळण्यास विसरु नका. नवीन ओळख फायद्याची ठरेल. प्रेमाला चालना मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगतीकारक कामे होतील. अधिकारात वाढ होईल. कठीण कामे होतील.
वृश्चिक
या सप्ताहात कर्केत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या शेवटी कामात चूक होईल. धंद्यात नवे काम मिळवता येईल. वसुली करा. नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय, सामजिक कार्यात योग्य निर्णय घेता येईल. अविवाहितांना स्थळे मिळतील. संतती प्राप्तीचा प्रयत्न करा. स्पर्धेत चमकाल.
धनु
या सप्ताहात कर्केत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. धंद्यात तणाव होईल. तडजोड करावी लागेल. कोणताही कायदा मोडू नका. नोकरीत वरि÷ांना कमी लेखू नका. प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात दिलेला शब्द पाळणे कठीण होईल. तुमचा अवमान करण्याचा प्रयत्न होईल. मैत्री उपयोगी येईल.
मकर
या सप्ताहात कर्केत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यातील चर्चा यशस्वी होईल. वसुली करणे सोपे समजू नका. नोकरीत तुमच्या कामावर वरि÷ खूष होतील. मैत्री तणाव, गैरसमज होईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगतीकारक निर्णय घेता येईल. व्यसन नको. प्रकृतीची काळजी घ्या. घरात खर्च वाढेल.
कुंभ
या सप्ताहात कर्केत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. धंद्यात व्यवहारिक बोलणे फिसकटण्याची शक्मयता आहे. रविवार तणाव होईल. नोकरीत तुमच्या कामाची कदर करण्यास वेळ लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला महत्त्व दिले जाणार नाही. टीका होईल. रागावर ताबा ठेवा. कायदा पाळा. स्पर्धा कठीण आहे.
मीन
या सप्ताहात कर्केत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात गोड बोलून रहा. वसुली करणे कठीण वाटेल. नोकरीत महत्त्वाची कामे रेंगाळत ठेवू नका. संसारात तणाव होईल. खर्च वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे वाढलेले महत्त्व काही लोकांना खपणार नाही. कट कारस्थान करतील. प्रति÷ा टिकेल.





