मेष
या सप्ताहात मिथुनेत सूर्यप्रवेश, सूर्य, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात फायदा होईल. वाद करू नका. प्रवासात सावध रहा. नोकरीत कामाचा ताण वाढेल. वरि÷ांच्या समवेत नम्रपणे वागा, बोला. राजकीय, सामाजिक कार्यात विरोधक तुमचा राग वाढवतील. अडचणी निर्माण करतील. त्यावर तुम्ही प्रेमाने मात करा. संसारात खर्च वाढेल. वडिलोपार्जित जमिनीच्या हक्कावरून वाद निर्माण होण्याची शक्यता. सावध रहा.
वृषभ
या सप्ताहात मिथुनेत सूर्यप्रवेश, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. जुना वाद संपवून नव्याने काम सुरू करू शकाल. धंद्यात फायदा होईल. नवे काम मिळेल. प्रयत्न करा. नोकरीत प्रभाव वाढेल. संसारात खंबीर भूमिका घ्यावा लागेल. जबाबदारी घेऊन सर्वांना खूष करू शकाल. राजकीय, सामाजिक कार्यात वेगाने कामे पूर्ण करा. मैत्रीतून फायदा होईल. स्पर्धा जिंकाल.
मिथुन
या सप्ताहात तुमच्या राशीत सूर्यप्रवेश, सूर्य, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. नोकरांना सांभाळून ठेवा. नोकरीत वरि÷ांना खूष करू शकाल. राजकीय, सामाजिक कार्यातील कामे पूर्ण करा. किचकट प्रश्न रेंगाळत ठेवू नका. लोकप्रियता वाढेल. शब्द जपून वापरा. कायदा हातात घेऊ नका. स्पर्धेत पुढे जाल.
कर्क
या सप्ताहात मिथुनेत सूर्यप्रवेश, चंद, बुध लाभयोग होत आहे. धंद्यात फसगत होईल. सावध रहा. खिसा, पाकीट सांभाळा. नोकरीत चर्चा करताना संयम ठेवा. नोकरी टिकवा. संसारात चिंताजनक वातावरण राहील. वृद्धांची काळजी वाटेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला कमी लेखले जाईल. पद जाण्याची शक्मयता आहे. प्रकृतीची काळजी घ्या.
सिंह
या सप्ताहात मिथुनेत सूर्यप्रवेश, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाढ होईल. वसुली करा. रविवार, सोमवार, प्रवासात सावध रहा. वाद वाढवू नका. नोकरीत प्रभाव दिसेल. वरि÷ांना खूष कराल. राजकीय, सामाजिक कार्यातील योजनांना प्राधान्य द्या. लोकांना खूष कराल. प्रति÷ा वाढेल. कठीण कामे करून घ्या. संसारातील समस्या सोडवाल.
कन्या
या सप्ताहात मिथुनेत सूर्यप्रवेश, शुक्र, नेपच्यून त्रिकोण योग होत आहे. धंद्यात लक्ष द्या. सप्ताहाच्या मध्यावर समस्या येईल. नोकरीत प्रभाव पडेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या विचारांना, कार्याला चालना मिळेल. नवे परिचय होतील. मैत्री वाढेल. स्पर्धेत प्रगती होईल. घरातील माणसांचे सहकार्य अव्हेरु नका.
तुला
या सप्ताहात सूर्य मिथुनेत, शुक्र, हर्षल लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या शेवटी चर्चा करताना कडवट शब्द वापरू नका. धंद्यात काम मिळेल, पण नोकरांना सांभाळून ठेवा. वसूली करून घ्या. नोकरीतील तणाव कमी होईल. राजकीय, सामाजिक कार्यात वेगाने कामे पूर्ण करा. भेट घ्या. दौऱयात यश मिळेल. घरातील महत्त्वाची कामे होतील.
वृश्चिक
या सप्ताहात सूर्य मिथुनेत येत आहे. शुक्र, शनि षडा÷क योग होत आहे. संसारात दगदग होईल. मनावर दडपण येईल. घरातील लोकांना दुखवू नका. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. धंद्यात गोड बोलून रहा. नोकरीत कटकटी होतील. वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात चुकीचा निर्णय घेऊ नका. प्रति÷ा सांभाळा. दगा फटका संभवतो. अनाठायी खर्च टाळा.
धनु
या सप्ताहात मिथुनेत सूर्यप्रवेश, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. दुखापत संभवते. तेव्हा सावधपणे कामे करा. रागावर ताबा ठेवा. संसारातील कटकटी कमी होतील. नोकरीत तुमच्यावर वरि÷ांचा विश्वास वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तत्परता ठेवून महत्त्वाची कामे करून घेता येतील. स्पर्धेत पुढे जाल. प्रेमाला चालना मिळेल.
मकर
या सप्ताहात मिथुनेत सूर्यप्रवेश, चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. साडेसातीचा कालावधी सुरू आहे. धंद्यात तणाव होईल. अडचणी येतील. दिलेला शब्द पाळणे कठीण होईल. संसारात चिंता वाटेल. आपसात गैरसमज होईल. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात घाई करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात इतरांच्या गोड बोलण्यावर भाळून जाऊन, जवळच्या लोकांना दूर लोटू नका.
कुंभ
या सप्ताहात मिथुनेत सूर्यप्रवेश, शुक्र, हर्षल लाभयोग होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. नोकरवर्गाचा प्रश्न संयमाने सोडवा. नोकरीमध्ये वरि÷ांच्या कामात मदत करावी लागेल. कठोर शब्दात मुद्दे मांडू नका. राजकीय, सामाजिक कार्यातील त्रूटी सुधारता येतील. नव्या जोमाने कार्य सुरू होईल. परिचय होतील. प्रेरणादायक वातावरण राहील. घरातील तणाव कमी करा.
मीन
या सप्ताहात मिथुनेत सूर्यप्रवेश, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. धंद्यात संयमाने कृती करा. अतिशयोक्तीने वागू नका. नोकरीमध्ये तुमच्याकडे जोखमीचे काम देण्यात येईल. हलगर्जीपणा कुठेही करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात नियमितपणाने कामे करीत रहा. प्रति÷sचा बाऊ करू नका. लोकांना दुखवू नका. संसारात खर्च वाढेल. मिळतेजुळते धोरणच उपयुक्त ठरेल.





