रविवार दि.2 मे ते शनिवार 8 मे 2021
मेष
या सप्ताहात वृषभेत शुक्रप्रवेश, शुक्र-नेपच्यून लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या शेवटी क्षुल्लक अडचणीमुळे मोठी कामे लांबणीवर पडतील. धंद्यात जम बसेल. योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करून ठेवा. कर्जाचे काम होईल. नोकरीत प्रगतीकारक वातावरण राहील. राजकीय, सामाजिक कार्यात विस्तारपूर्वक कार्यरचना करता येईल. दुरावलेले सहकारी परत येतील. ओळखी वाढतील. शिक्षणात पुढे जाल. स्पर्धा जिंकाल, संसारात आनंदी व्हाल.
वृषभ
या सप्ताहात तुमच्या राशीत शुक्रप्रवेश, चंद्र-गुरु युती होत आहे. धंद्यात वाढ होईल. जुने येणे वसूल करा. अहंकारी थाटात बोलू नका. घरातील वृद्ध व्यक्तींच्यासाठी वेळ द्यावा लागेल. नोकरीत संयमी राहून कामे करा. डोळय़ांना जपा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची अवहेलना करण्याचा प्रयत्न केला जाईल. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. चूक करू नका. शिक्षणात जिद्द ठेवा. स्पर्धेत मेहनत घ्या.
मिथुन
या सप्ताहात वृषभेत शुक्रप्रवेश, चंद्र-गुरु युती होत आहे. धंद्यात वाद वाढवू नका. मोह ठेवू नका. कायद्यात अडकू नका. घरातील व्यक्तींच्या बरोबर क्षुल्लक मतभेद होतील. वस्तू नीट सांभाळा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची प्रति÷ा वाढेल. जवळच्या लोकांना हेवा वाटेल. नवीन ओळख नीट पारखून घेतल्याशिवाय व्यवहार करू नका. स्पर्धेत प्रगती होईल.
कर्क
या सप्ताहात वृषभेत शुक्रप्रवेश, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर तणाव होईल. प्रवासात घाई करू नका. धंद्यात काम मिळेल. वसुली करा. नोकरीत काम वाढले तरी तुमचे कौतुक होईल. कलाक्षेत्रात विशेष यश मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव पडेल. नवीन लोक सहवासात येतील. स्पर्धेत चमकाल. शिक्षणात आळस करू नका. संसारात मोठी खरेदी कराल.
सिंह
या सप्ताहात वृषभेत शुक्रप्रवेश, चंद्र-बुध त्रिकोण योग होत आहे. योग्य, अनुभवी क्यक्तीच्या सल्ल्याने कोणतीही प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. आळस न करता राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामे करा. तणाव होईल. धंद्यात काम मिळेल. तुम्ही सर्व कामासाठी तत्पर रहा. संसारात धावपळ होईल. नोकरीत तुमच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात येईल. स्पर्धा कठीण आहे. शिक्षणात जिद्द ठेवा.
कन्या
या सप्ताहात वृषभेत शुक्रप्रवेश, चंद्र-बुध त्रिकोणयोग होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर राजकीय, सामाजिक कार्यात, नोकरीत तणाव होईल. वाद वाढेल. सावध रहा. कोणतीही चूक करू नका. धंद्यात कामे येतील. नम्रता ठेवा. समोरच्या व्यक्तीचे विचार ऐकून घ्या. कोणतीही स्पर्धा सोपी नाही. वृद्ध व्यक्तीची चिंता राहील. चांगली संगत ठेवा. व्यसन नको. अभ्यास करा.
तुळ
वृषभेत शुक्रप्रवेश, चंद्र-गुरु युती होत आहे. आत्मविश्वास वाढेल. समोरच्या व्यक्तीला तुमचा विचार पटवून देताना जास्त वेळ द्यावा लागेल. खाण्याची चंगळ कमी करा. कायद्यात सावध रहा. धंद्यात नम्र रहा. हिशोब नीट करा. नोकरीत मित्र त्रस्त करतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची प्रति÷ा बिघडवण्याचा व्यर्थ प्रयत्न होईल. तुम्ही कुणावर विश्वास ठेवू नका. स्पर्धा अटीतटीची आहे.
वृश्चिक
या सप्ताहात वृषभेत शुक्रप्रवेश, चंद्र-बुध त्रिकोण योग होत आहे. सहनशिलता ठेवा. नोकरीत वरि÷ांना दुखवू नका. धंद्यात काम मिळाले तरी तुमच्यावर दबाव राहील. राजकीय, सामाजिक कार्यात अचानक तणाव होईल. तुमच्यावर आरोप येईल. अहंकार उपयुक्त ठरणार नाही. स्पर्धा कठीण आहे. शिक्षणात आळस नको. घरात वृद्ध व्यक्तींची चिंता वाटेल.
धनु
या सप्ताहात वृषभेत शुक्रप्रवेश, चंद्र-गुरु युती होत आहे. खंबीर रहा. त्यामुळे व्यवहारातील फसगत टाळता येईल. नवीन ओळखीवर भाळून जाऊ नका. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या योजनांना वेग येईल. मित्र, सहयोगी आखडू भूमिका घेतील. कायदा मोडू नका. स्पर्धेत पुढे जाल. शिक्षणात चमकाल.
मकर
या सप्ताहात वृषभेत शुक्रप्रवेश, चंद्र-बुध त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात वाढ झाल्याने उत्साह वाढेल. नवे काम मिळवण्याचा प्रयत्न करा. विनम्रपणे राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती करता येईल. स्वतःच्या कार्यमांडणीवर लक्ष द्या. कोणताही वाद मिटवून नव्या जोमाने तुम्ही जाऊ शकाल. नोकरीत वरि÷ांना मदत करावी लागेल. संसारातील तणाव कमी होईल. स्पर्धा आकर्षक ठरेल.
कुंभ
या सप्ताहात वृषभेत शुक्रप्रवेश, चंद्र-गुरु युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला कायदा मोडेल, असे काम करू नका. धंद्यात क्षुल्लक अडचणी येतील. महत्त्वाच्या वस्तू नीट ठेवा. संसारात कामे वाढतील. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात जवळचे लोक तुमच्याकडे संशयाने बघतील. प्रयत्नपूर्वक तुमचे काम करा. प्रति÷ा राहील. कठीण कामे करून घ्या.
मीन
या सप्ताहात वृषभेत शुक्रप्रवेश, चंद्र-बुध त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात फायदा होईल. नवे काम मिळेल. वादविवाद टाळा. प्रवासात घाई करू नका. नोकरी टिकवा. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ित लोकांचा परिचय होईल. अनुभवी लोकांना दुखवू नका. वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. स्पर्धेत प्रगती होईल. शिक्षणात मागे राहू नका. व्यसन करू नका.





