रविवार . 22 ते 28 मार्च 2020
मेष
या सप्ताहात मकरेत मंगळ, वृषभेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात तुमचा अंदाजबरोबर येईल. वसुली करता येईल. नोकरीत कामाचा व्याप राहील. अधिकारी वर्गाच्या मर्जीनुसार काम करावे लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या मनाविरुद्ध काही निर्णय होऊ शकतात. तुम्ही चातुर्य वापरा. अहंकार ठेवू नका. घरातील कामे होतील. घर, जमीन संबंधी काम करा. शेतकरी वर्गाला फायदा होईल. माल विकला जाईल.
वृषभ
या सप्ताहात मकरेत मंगळ, वृषभेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात तुम्ही नवे काम मिळवू शकाल. घरातील तंटा कमी होईल. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्या कामाचा आरंभ करता येईल. नोकरीत तुमचे महत्त्व दाखवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात योजनांकडे लक्ष पुरवा. जनतेच्या हितासाठी कार्य करा. कोर्टाच्या कामात यश मिळेल. शेतकरी वर्गाला जास्त मोह न ठेवता माल विकावा लागेल. योग्य व्यक्तीचे ऐका, स्पर्धा जिंकाल.
मिथुन
या सप्ताहात मकरेत मंगळ, वृषभेत शुक्र प्रवेश करीत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुम्ही तुमच्या क्षेत्रातील कार्याचा आरंभ करावा. धंद्यात वाढ होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. योग्य ठिकाणी पैसे गुंतवून ठेवा. नोकरीत प्रगती होईल. कंपनीद्वारा परदेशात जाता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात योजना पूर्ण करा. आत्मविश्वास वाढेल. जवळच्या लोकांना कधी कमी समजू नका. प्रवासात घाई नको. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. घरात वाद वाढवू नका.
कर्क
या सप्ताहात मकरेत मंगळ, वृषभेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात प्रगती करण्यासाठी कसा प्रयत्न करावयाचा याचा नीट विचार करा. योग्य क्यक्तींचा सल्ला घ्या. थोडय़ाच दिवसात मोठी संधी मिळेल. ओळखीतून काम मिळवा. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक कार्यात कठीण काम करता येईल. नम्रपणे बोला. संधीची वाट पहा. कोर्टाच्या कामाला दिशा मिळेल. कला, क्रीडा स्पर्धेत पुढे जाल.
सिंह
या सप्ताहात मकरेत मंगळ, वृषभेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात दुर्लक्ष करू नका. मोठे काम मिळवा, संयम ठेवा. नम्रता ठेवा. काम मिळेल. गोड बोला. वसुली करून घ्या. नोकरीत दादागिरी करून चालणार नाही. राजकीय, सामाजिक कार्यात एखाद्या प्रावर तडजोड करावी लागेल. गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतेही वक्तव्य जपून करा. चूक होईल. प्रति÷ा सांभाळा. कोर्टकेसमध्ये उतावळेपणा नको.
कन्या
या सप्ताहात मकरेत मंगळ, वृषभेत शुक्र प्रवेश करीत आहे. मुलांच्या बरोबर तणाव होऊ शकतो. कोणत्याही व्यवहारात उतावळेपणा नको. गुढीपाडव्याच्या दिवशी शुभ समाचार मिळेल. धंद्यात सौम्य धोरण ठेवा. नोकरीत प्रभाव राहील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची प्रति÷ा वाढेल. गुप्त कारवायांवर नजर ठेवा. कुणाच्या आग्रहाला बळी पडू नका. कोर्टाच्या कामात यश येईल. कला, क्रीडा स्पर्धेत प्रगती होईल.
तुळ
या सप्ताहात मकरेला मंगळ, वृषभेत शुक्र, प्रवेश करीत आहे. धंद्यात काम मिळवतांना रागावर ताबा ठेवा. सर्वच क्षेत्रात तुमच्यावर जबाबदारी असेल. कसोटीचा सप्ताह राहील. मागील येणे वसूल करणे कठीण आहे. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात वादाचा प्रसंग निर्माण होईल. गुप्तहितशत्रू कारवाया करतील. घरातील कामे वाढतील. प्रकृतीची काळजी घ्या. वस्तू नीट सांभाळा. कला, क्रीडा क्षेत्रात प्रयत्न जास्त घ्या. वाहन जपून चालवा.
वृश्चिक
या सप्ताहात मकरेत मंगळ, वृषभेत शुक्र प्रवेश करीत आहे. तुमच्या राजकीय, सामाजिक कार्याला गतीमान करता येईल. गुढीपाडव्याला नव्या विचाराने प्रेरित व्हाल. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. धंद्यात मोठे काम मिळेल. वसुली करण्याचा प्रयत्न करा. घरातील रेंगाळलेली कामे करून घ्या. प्रकृतीत सुधारणा होईल. नोकरीत नवी संधी घेता येईल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवी ओळख वाढेल. कोर्टकेस जिंकाल.
धनु
या सप्ताहात मकरेत मंगळ, वृषभेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात काम मिळेल. भागीदार, गिऱहाईक यांच्या बरोबर नम्रतेने वागा. नोकरीत वरि÷ांचा दबाव राहील. अचानक खर्च निर्माण होईल. घरातील व्यक्तींची नाराजी टाळावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात किरकोळ अडचणी येतील. दौऱयात तणाव संभवतो. लोकांची मने समजून घ्या. त्यानुसार निर्णय घ्या. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती कराल. गुढीपाडव्याच्या दिवशी धावपळ होऊ शकते.
मकर
या सप्ताहात तुमच्याच राशीत मंगळ, वृषभेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात जम बसेल. जुने येणे वसूल करता येईल. गुढीपाडव्याच्या दिवशी नव्या कामाचा आरंभ करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात येजनेला महत्त्व येईल. प्रतिष्ठा वाढेल. आत्मविश्वासाने प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. नोकरी मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात उमेद वाढेल. कोर्टकेस यशस्वी होईल. घरातील समस्या कमी होईल. विरोधक नमतील.
कुंभ
या सप्ताहात मकरेत मंगळ, वृषभेत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात जम बसवता येईल. प्रवासात घाई करू नका. किरकोळ कारणाने संसारात वाद होईल. गुढीपाडव्याच्या दिवशी राजकीय, सामाजिक कार्याला नवे वळण मिळेल. विरोधक मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. कला, क्रीडा क्षेत्रात पुढे जाल. शेतकरी वर्गाला संमिश्र फायदा होईल. राग वाढू देऊ नका. कोर्टकेस यशस्वी होईल. खरेदीच्या व्यवसायात सावध रहा.
मीन
या सप्ताहात मकरेत मंगळ, वृषभेत शुक्र प्रवेश करीत आहे. तुमच्या कार्याला नवा मार्ग खुला होईल. धंद्यात छोटय़ा अडचणी येतील. मदत मिळू शकेल. गुढीपाडव्याला खूष खबर मिळेल. उत्साह वाढेल. धंद्यात वाढ होईल. नोकरीत प्रगती कराल. वसुली करता येईल. राजकीय, सामाजिक कार्याला नवे वळण देता येईल. मैत्री वाढेल. कला, क्रीडा क्षेत्रात चांगले मार्गदर्शन मिळेल. उत्साह वाढेल. कोर्टकेस जिंकाल. घर, वाहन खरेदी कराल.