रविवार दि.13 ते शनिवार दि.19 डिसेंबर 2020
मेष
या सप्ताहात धनु राशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. रविवार, सोमवार किरकोळ वाद होईल. मनाविरुद्ध काम करावे लागेल. रागावर ताबा ठेवा. धंद्यात गोड बोला. हिशोब चुकू नका. नोकरीत तुमच्याकडे मोठे काम दिले जाईल. जवळचे लोक मदत करण्यास टाळाटाळ करतील. राजकीय, सामाजिक कार्यात रेंगाळलेली कामे मार्गी लावण्यात यश मिळेल. संसारात कामे वाढतील. मनावर दडपण येईल.
वृषभ
या सप्ताहात धनु राशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात लक्ष द्या. वसुली करा. अनावधानाने एखादी चूक होईल. सावध रहा. नोकरीत व्याप वाढेल. कायदा सर्वत्र पाळा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे विधान विषयाला धरून नसल्याचा आरोप होऊ शकतो. प्रति÷ा सांभाळा. योग्य सल्ला घेता येईल. कुटुंबातील वृद्ध व्यक्तीला जपा. कला, साहित्यात संधी मिळेल. ओळखी होतील.
मिथुन
या सप्ताहात धनु राशीत सूर्य, बुधाचा प्रवेश होत आहे. तुमच्या धंद्यातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. उतावळेपणा नको. गोड बोलणाऱया व्यक्तीपासून सावध रहा. नोकरीत कायद्याला धरून असलेली कामे करून टाका. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या निर्णयावर ताशेरे ओढले जातील. प्रगतीचा मार्ग उशिराने मिळेल. बुद्धिचातुर्य वापरा. संसारात नाराजी होईल. अनेक कामे वाढतील. खर्च होईल.
कर्क
या सप्ताहात धनु राशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात तुमचा अंदाज अचानक चुकेल. योग्य व्यक्तीचा सल्ला उपयुक्त ठरेल. नवीन परिचयातून फायदा करून घेता येईल. नोकरीत वरि÷ांची नाराजी होईल. वैर वाढवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तात्पुरत्या स्वरुपाच्या अडचणी येतील. रागावर नियंत्रण ठेवा. संसारात जबाबदारी वाढेल. वृद्धांची काळजी वाटेल.
सिंह
या सप्ताहात धनु राशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. परंतु नियंत्रण ठेवा. राग वाढेल. धंद्यात नवीन संधी मिळेल. व्यक्तीची नीट पारख करा. मोहाला बळी पडाल. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणीतूनच मार्ग शोधावे लागेल. अरेरावी कुठेही करू नका. सावध रहा. दौऱयात काळजी घ्या. संसारात खर्च वाढेल. मन अस्थिर होईल. मेहनत घ्यावी लागेल.
कन्या
या सप्ताहात धनु राशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात वाढ करता येईल. नियमांचे पालन करावे लागेल. वसुली करा. ओळखीचा उपयोग होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. आक्रमक भूमिका घेऊ नका. लोकसंग्रह वाढवा. आर्थिक क्यवहारात फायदा होईल. नोकरीत कठीण कामे करावी लागतील. संसारात चांगली बातमी उत्साह वाढवेल. कलेत चमकाल.
तुला
या सप्ताहात धनु राशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात जम बसवा. मागील येणे वसूल करा. नवे संबंध प्रस्थापित करा. नोकरीत वरि÷ांची मर्जी राखता येईल. कायदा कुठेही मोडू नका. राजकीय, सामाजिक कार्यात योजनांना पूर्ण करण्याचे मागे लागा. आर्थिक सहाय्य जमा करून जनहिताचे कार्य करा. कला, साहित्य, शिक्षणात प्रगती करा. संसारातील तणाव कमी होईल.
वृश्चिक
या सप्ताहात धनु राशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. प्रत्येक दिवस तुम्हाला प्रगतीचा नवा मार्ग दाखवणार आहे. मेहनत घ्या. धंद्यात वाढ होईल. योग्य ठिकाणी गुंतवणूक करता येईल. रेंगाळत राहिलेली कामे करून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा वाढवणारी घटना घडेल. संसारातील नाराजी दूर करा. कमतरता भरून काढा. कला, साहित्य, शिक्षणात प्रगती करता येईल.
धनु
तुमच्याच राशीत या सप्ताहात सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. सप्ताहाची सुरुवात कटकटीची वाटली तरी त्यानंतर तुमची कामे होतील. धंद्यात सावधपणे व्यवहार करा. कायदा पाळा. नोकरीत वर्चस्व वाढेल. जवळच्या सहकारी वर्गाला कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक कार्याला वेग प्राप्त करून देता येईल. मेहनत घ्या. मुलांना प्रेमाने वागवा. गैरसमज टाळा. संसारात खर्च वाढेल. वस्तू सांभाळा.
मकर
या सप्ताहात धनुराशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. साडेसाती सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा अतिरेक करू नका. विरोधक तुम्हाला त्रस्त करतील. धंद्यात बेसावध राहू नका. राजकीय, सामाजिक कार्यात दादागिरीचे वर्तन ठेवू नका. नम्रता ठेवा. म्हणजे लोकप्रियता, प्रति÷ा वाढेल. नोकरी टिकवा. कायदा पाळा.संसारात समस्या येईल. कला, साहित्य, शिक्षणात चिकाटी ठेवा.
कुंभ
या सप्ताहात धनु राशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. साडेसाती सुरू आहे. किचकट समस्या सोडवाव्या लागतील. त्वरित कामे करून घ्या. धंद्यात वाढ होईल. कायद्याच्या कामात बेसावध राहू नका. मोठय़ा लोकांची मदत मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. खंबीरपणाचे दर्शन होईल. इतरांना मदत करतांना स्वत:वर थोडे बंधन ठेवा. मित्रपरिवार वाढेल. शिक्षणात मागे राहू नका.
मीन
या सप्ताहात धनु राशीत सूर्य, बुध प्रवेश करीत आहे. अडलेली कामे करून घ्या. धंद्यात जम बसेल. मोठे काम मिळवा. वसुली करा. परिचयातून फायदा होईल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. पद मिळेल. लोकप्रिय व्हाल. योजनापूर्ण करा. चांगल्या कामांची बेगमी करून ठेवा. संसारात सुखद समाचार मिळेल. कला, साहित्य, शिक्षणात प्रगती कराच.





