रविवार दि. 27 सप्टेंबर ते शनिवार दि. 3 ऑक्टोबर 2020
मेष
या सप्ताहात सिंहेत शुक्र प्रवेश, सूर्य-चंद्र षडाष्टक योग होत आहे. सप्ताहाच्या शेवटी तुम्हाला एखाद्या प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न होईल. रागावर ताबा ठेवा. संयम ठेवा. सर्व तात्पुरते असेल. धंद्यात सुधारण्यासाठी प्रयत्न करा. अरेरावी न करता सर्व कामे करा. वसुलीचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक कार्यात मेहनत घ्यावी लागेल. तुमच्यावर निष्कारण टीका करण्याचा डाव विरोधक रचतील. संसारात क्षुल्लक तणाव होईल.
वृषभ
या सप्ताहात सिंहेत शुक्र, शुक्र-मंगळ त्रिकोण योग होत आहे. कठोर बोलणे टाळा. वाद वाढवू नका. धंद्यात वाढ करता येईल. वसुली करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत नम्रता ठेवा. वरि÷ांना खूष करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यातील महत्त्वाची कामे करून घ्या. विरोध मोडून काढता येईल. प्रवासात शनिवारी घाई करू नका. संसारात दुर्लक्ष करून चालणार नाही. कला, साहित्यात प्रसिद्धी मिळेल.
मिथुन
या सप्ताहात सिंहेत शुक्र, चंद्र-गुरु लाभयोग होत आहे. रविवार कोणताही प्रश्न संयमाने सोडवा. मार्ग मिळेल. सहनशीलता ठेवा. धंद्यात प्रगती होईल. मागील येणे मिळवा. नवे काम मिळेल. नोकरीत प्रभाव पडेल. नोकरी मिळवण्याचा आताच प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक कार्यात नेटाने काम करा. स्वत:चे स्थान मजबूत करा. लोकप्रियता मिळेल. कला, साहित्यात नवीन ओळखी फायदेशीर ठरतील.
कर्क
या सप्ताहात सिंहेत शुक्र प्रवेश, चंद्र-बुध त्रिकोण योग होत आहे. धंद्यात मोठे काम मिळवता येईल. प्रयत्न करा. जुने येणे वसुल करा. नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल. क्षुल्लक वाद वाढवू नका. विरोधक मैत्री करण्यास येतील. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाची भूमिका निभावाल. प्रति÷ा मिळेल. नवीन परिचय होईल. संसारात चांगली बातमी मिळेल. कला, साहित्यात गुणांची कदर होईल. समस्या सोडवता येईल.
सिंह
या सप्ताहात सिंहेत शुक्र प्रवेश, चंद्र-गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात काम मिळेल. तुम्ही सावधपणे वागा. जुने येणे वसूल करण्याची घाई नको. मन अस्थिर राहील. वाद वाढवू नका. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. नवीन ओळखी होतील. नवा प्रस्ताव राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्याकडे मांडला जाईल. प्रश्न सोडवता येईल. गंभीर वक्तव्य करू नका. कला, साहित्यात प्रगतीची संधी मिळेल. उतावळेपणा नको.
कन्या
या सप्ताहात सिंहेत शुक्र, चंद्र-बुध त्रिकोण योग होत आहे. धंद्यात गिऱहाईकाच्या बरोबर गोड बोला. कोणताही वाद वाढवण्याने नुकसान होईल. नोकरीत वरि÷ांची मर्जी वाढेल. मित्रांना कामात मदत करावी लागेल. संसारात क्षुल्लक मतभेद होतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. जुना वाद मिटवता येईल. विरुद्धलिंगी व्यक्तीच्या जास्त आहारी जाऊ नका. नवीन ओळख पारखूनच व्यवहार करा.
तुळ
या सप्ताहात सिंहेत शुक्र प्रवेश, शुक्र-मंगळ त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाढ होईल. अहंकाराने कुठेही वागू नका. तुमची कामे करून घेता येतील. प्रवासात कायदा पाळा. घाई करू नका. नोकरीत काम करताना चूक होऊ शकते. सावध रहा. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. गुप्तशत्रू कारवाया करतील. तुमच्यावर आरोप होईल. नम्रपणे उत्तरे द्या. कला, साहित्यात संधी मिळेल.
वृश्चिक
या सप्ताहात सिंहेत शुक्र प्रवेश, चंद्र-गुरु लाभयोग होत आहे. धंद्यातील बोलणी यशस्वी करता येतील. कठोर शब्द वापरू नका. दिलेला शब्द पाळण्यासाठी जास्त मेहनत पडेल. नोकरीत महत्त्वाचे काम करून दाखवाल. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. राजकीय, सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणारी घटना घडेल. विरोधाचा सामना खंबीरपणे कराल. कला, साहित्यात चमकाल. संसारात शुभ समाचार मिळेल.
धनु
या सप्ताहात सिंह राशीत शुक्र प्रवेश, चंद्र-बुध त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाढ होईल. नवीन ओळखीचा उपयोग करून घ्या. मोठे काम मिळेल. मागील येणे वसूल करा. नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक कार्याला चांगला प्रतिसाद मिळेल. वेळेला महत्त्व देऊन रेंगाळत राहिलेली कामे करून घ्या. संसारात मोठा निर्णय घ्याल. कला, साहित्यात प्रगती होईल.
मकर
या सप्ताहात सिंहेत शुक्र प्रवेश, चंद्र-बुध त्रिकोण योग होत आहे. विरोधक मैत्रीचा प्रस्ताव घेऊन आल्याने तुमचे महत्त्व राजकीय, सामाजिक कार्यात वाढेल. तुम्ही चांगले कार्य करत रहा. मोठी संधी तुमच्यासाठी येईलच. कुणालाही न दुखवता मत व्यक्त करा. नोकरीत वरि÷ांची मर्जी राखता येईल. धंद्यात जम बसवा. गिऱहाईकाबरोबर गोड बोला. हिशोब नीट करा. व्यसन नको. कला, साहित्यात प्रसिद्धी मिळेल. खाण्याची काळजी घ्या.
कुंभ
सिंह राशीत शुक्र प्रवेश, सूर्य-चंद्र षडाष्टक योग होत आहे. धंद्यात नवे काम मिळेल. दादागिरीचा उपयोग करू नका. सौम्य शब्दात पण योग्यच उत्तर कुठेही द्या. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कायदा पाळूनच निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाच्या प्रश्नाला बाजूला ठेवू नका. क्षुल्लक क्यक्तीला महत्त्व देण्यापेक्षा मोठे काम करा. कला, साहित्यात लक्ष द्या. ओळखी वाढतील. प्रसिद्धीचा ध्यास नको.
मीन
या सप्ताहात सिंहेत शुक्र प्रवेश, चंद्र-गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात वाद न वाढवता वागा. कामे मिळतील. नोकरीत वरि÷ांची मर्जी राखता येईल. विरुद्धलिंगी व्यक्तीच्या दबावाखाली राहून वागल्यास चूक होईल. व्यसन नको. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाचा प्रश्न सोडवता येईल. कठीण कामे करा. बोलण्यात चूक करू नका. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. नवीन ओळखीवर भाळून जाऊ नका. घरात संयमाने वागा.





