रविवार दि. 6 ते 12 सप्टेंबर 2020
मेष
या सप्ताहात सूर्य-गुरु त्रिकोण योग, बुध-हर्षल षडाष्टक योग होत आहे. व्यवसायामध्ये गिऱहाईकाच्याबरोबर वाद वाढवू नका. फायदा वाढेल. प्रवासात घाई नको. कायदा पाळा. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रत्येक दिवसाला यशाचे गणित मांडता येईल. उत्साह कमी करण्याचा छोटासा प्रयत्न जवळचे लोक करतील. संसारात क्षुल्लक तणाव संभवतो.
वृषभ
या सप्ताहात चंद्र-बुध त्रिकोण योग, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला धंद्यात वाद होईल. प्रवासात घाई करू नका. कायदा पाळा. नोकरीत दबाव राहील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे खंबीर नेतृत्व दिसेल. लोकसंग्रह जमा करा. संसारात सुखद समाचार मिळेल. अनाठायी खर्च निर्माण होईल. मागील येणे वसूल करा. नवे कंत्राट मिळवा.
मिथुन
या सप्ताहात सूर्य-गुरु त्रिकोण योग, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. व्यवसायात वाढ होईल. चर्चा सफल होईल. महत्त्वाची कामे करून घ्या. नोकरीत वर्चस्व वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा वाढेल. बुधवार, गुरुवार विरोधक कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. बुद्धिचातुर्य वापरा. कठीण काम करून घ्या. कला, साहित्यात चमकाल. ओळखी होतील.
कर्क
चंद्र-बुध त्रिकोण योग, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात सुधारणा करता येईल. मागील येणे वसूल होईल. नवीन ओळखीचा उपयोग करून घ्या. नोकरीत कठीण काम तुमच्यामुळे पूर्ण होऊ शकेल. राजकीय, सामाजिक कार्यात योजना पूर्ण करता येतील. पूर्वीचा गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. संसारात सुखद संवाद होईल. कायद्याच्या कामात यश मिळेल.
सिंह
या सप्ताहात सूर्य-गुरु त्रिकोण योग, सूर्य-नेपच्यून प्रतियुती होत आहे. जवळच्या व्यक्तीच्या चुकीने तुम्ही मानसिक तणावाखाली रहाल. संसारात तणाव होईल. धंद्यात हिशोब नीट करा. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीवर जास्त अवलंबून राहू नका. नोकरीत वर्चस्व राहील. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. विरोधक मैत्री करण्यास येतील. मोहावर ताबा ठेवा.
कन्या
या सप्ताहात चंद्र-शुक्र लाभयोग, बुध-हर्षल षडाष्टक योग होत आहे. नकळत एखादे गुपित तुमच्याकडून उघड होण्याची शक्मयता आहे. भावनेच्या भरात चूक होईल. धंद्यात वाढ होईल. अरेरावी करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वेगळय़ा पद्धतीने कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. नोकरीत सावधपणे निर्णय घ्या. वाहन हळू चालवा.
तुळ
या सप्ताहात सूर्य-चंद्र त्रिकोण योग, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. मेहनत घ्या. वसुलीचा प्रयत्न करा. अरेरावी करू नका. रागावर ताबा ठेवा. सप्ताहाच्या मध्यावर प्रवासात घाई करू नका. राजकीय, सामाजिक कार्याला गती द्या. लोकप्रियता मिळेल. बेकारांनी नोकरी शोधावी. कला, साहित्यात कल्पनाशक्ती वाढेल. संसारात शुभ समाचार मिळेल.
वृश्चिक
या सप्ताहात सूर्य-गुरु त्रिकोण योग, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. अडचणीवर मात करून तुम्हाला यश मिळवावे लागेल. रागावर ताबा ठेवा. धंद्यात काम मिळेल. धावपळ जास्त होईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगतीची संधी मिळेल. गुप्त कारवायांना ऊत येईल. प्रवासात सावध रहा. नोकरीत तुमच्या बुद्धिमत्तेचे कौतुक होईल. कला, साहित्यात प्रेरणा मिळेल. प्रसिद्धी मिळेल.
धनु
या सप्ताहात सूर्य-गुरु त्रिकोण योग, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. खर्च वाढेल. धंद्यात काम मिळेल. हिशोब नीट करा. जवळच्या व्यक्तीबरोबर तणाव होईल. नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल. सहकारी स्पर्धा करतील. राजकीय, सामाजिक कार्यात योजना बनवा. मेहनत घ्या. सहकारी वर्गाला दुखवू नका. खाण्याची काळजी घ्या. महत्त्वाची वस्तू सांभाळा.
मकर
या सप्ताहात चंद्र-बुध त्रिकोण योग, चंद्र-शुक्र लभयोग होत आहे. सप्ताहाच्या शेवटी कायद्याच्या विरोधात जाऊ नका.अडचणी वाढतील. प्रवासात घाई करू नका. धंद्यात फायदा होईल. चर्चा यशस्वी होईल. नोकरी टिकवा. वरि÷ांच्या बरोबर नम्र रहा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर टीका होईल. अपमान करण्याचा प्रयत्न होईल. नवीन परिचय होईल. कलाक्षेत्रात कल्पना सुचेल.
कुंभ
या सप्ताहात सूर्य-गुरु त्रिकोण योग, बुध-हर्षल षडाष्टक योग होत आहे. आत्मविश्वासाचे जास्त प्रदर्शन करण्याचा प्रयत्न नको. तुमचा उद्देश चांगला असला तरी सावधपणे बोला. धंद्यात तडजोड करावी लागेल. गोड बोलण्याला फसू नका. नोकरीत महत्त्व वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव दाखवता येईल. जवळचे सहकारी नाराज होऊ शकतात. याकडे लक्ष ठेवा.
मीन
या सप्ताहात चंद्र-बुध त्रिकोण योग, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात नवा पर्याय शोधता येईल. चर्चा यशस्वी होईल. ओळखीचा उपयोग करून घ्या. वसुली करा. दादागिरीची भाषा कुठेही वापरू नका. नोकरीत वरि÷ांची मर्जी राखावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात लोकांच्या कार्याला हातभार लावा. प्रसिद्धीचा विचार न करता काम करा. घरातील वृद्धांना कमी लेखू नका.





