मेष
सूर्य, चंद्र त्रिकोण योग, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसवता येईल. नवे कंत्राट मिळवा. वसुली करता येईल. नोकरीत मोठे काम करून दाखवाल. प्रसिद्धी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा व लोकप्रियता मिळेल. शनिवार रागावर ताबा ठेवा. प्रवासात सावध रहा. घरात आनंदी वातावरण राहील.
वृषभ
सूर्य, चंद त्रिकोण योग, बुध, मंगळ केंद्रयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. चर्चा यशस्वी होईल. मागील येणे वसूल करा. परिचयातून अडचणीत आलेले काम करून घ्या. रविवार गर्दीत जाऊ नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या कामाचे कौतुक होईल. ओळखी वाढतील. लोकसंग्रह वाढवा. घरातील कामे होतील. कला, साहित्यात प्रगती करता येईल.
मिथुन
चंद्र, मंगळ युती, चंद्र, नेपच्यून युती होत आहे. ताण-तणाव कमी करता येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला खाण्याची काळजी घ्या. व्यवहारात फसगत टाळा. धंद्यात सुधारणा होईल. कायदा मोडू नका. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. राजकीय- सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व वाढेल. जवळचे सहकारी गैरसमज करण्याचा प्रयत्न करतील. मेहनत घ्या. प्रसिद्धी मिळेल. घरातील कामे करा.
कर्क
चंद्र, शुक्र त्रिकोण योग, चंद, मंगळ युती होत आहे. धंद्यात समस्या येईल. नोकर वर्गाची कमी जाणवेल. तुमचे कठोर बोलणे तणाव वाढवेल. नम्रता ठेवा. नोकरीत तुमच्या कामात चूक होईल. वरि÷ांच्या मर्जीनुसार निर्णय घ्या. कायदा केव्हाही मोडू नका. राजकीय, सामाजिक कार्यात धावपळ होईल. वृद्धांनी काळजी घ्यावी. अरेरावी करण्याने वैर वाढेल. मैत्रीचा उपयोग होईल.
सिंह
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. तुमच्या उत्साहात, आत्मविश्वासात भर पडेल. धंद्यात जम बसवा. मोठे काम मिळवा. वसुली करा. नोकरीत प्रभाव पडेल. वरि÷ खूष होतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्ही अभ्यासपूर्ण चर्चा करू शकाल. मेहनत घ्या. राग वाढेल. संयम ठेवा. प्रवासात घाई करू नका. संसारात चांगला निर्णय घेता येईल. कला, साहित्यात प्रगती होईल.
कन्या
चंद्र, शुक्र त्रिकोण योग, बुध, मंगळ केंद्रयोग होत आहे. व्यवसायात वाढ करता येईल. संवादात तुमची सरशी होईल. नम्रता ठेवा. गोड बोला. तुमचे महत्त्व वाढेल. नोकरीत कायद्याच्या नियमानुसार निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात जिद्दीने कार्य करा. लोकप्रियता मिळेल. संसारात मुले आनंद देतील. वाहन जपून चालवा. कला,साहित्यात तुम्हाला नक्या पद्धतीने प्रगती करता येईल.
तुळ
चंद्र, गुरु लाभयोग, चंद्र, बुध त्रिकोणयोग आहे. धंद्यात प्रगतीचा मार्ग मिळेल. कायदा पाळा. रागावर ताबा ठेवा. नोकरीत वरि÷ांना खूष कराल. नोकरीचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक कार्याला दिशा मिळेल. वरि÷ मदत करतील. जवळच्या लोकांना कमी लेखू नका. माणसे ओळखून ठेवा. घरात काम वाढले तरी यश मिळेल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या.
वृश्चिक
चंद्र, शुक्र त्रिकोण योग, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. कोणताही संवाद करतांना सावध रहा. वादविवाद होईल. नम्रपणे बोला. गोड बोलून रहा. तुमची कामे होतील. धंद्यात नोकर सांभाळा. नोकरीत काम वाढेल. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न होईल. व्यवहारात फसगत होऊ शकते. कलाक्षेत्रात नवा पर्याय शोधता येईल.
धनु
चंद्र, बुध त्रिकोण योग, चंद्र, गुरु युती होत आहे. धंद्यात जम बसेल. खंबीर रहा. गोड बोलण्याला भाळून जाऊ नका. मोह आवरा. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. प्रवासात घाई करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात नव्याने बस्तान बसवता येईल. राग आवरा. नवीन ओळखी होतील. माणसे पारखून ठेवा. घरातील व्यक्तीची चिंता कराल. कार्याला प्रसिद्धी मिळेल.
मकर
चंद्र, शुक्र त्रिकोण योग, सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी धावपळ करू नका. दादागिरी कुठेही करू नका. कायद्याचे पालन करा. धंद्यात गोड बोला, फायदा होईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कामात चूक टाळा. राजकीय, सामाजिक कार्यात अवमान करण्याचा प्रयत्न होईल. तुमचे मुद्दे शांतपणे मांडा, पटवून द्या. कलाक्षेत्रात काहीतरी नवे कराल.
कुंभ
चंद्र, बुध त्रिकोण योग, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात फायदा वाढेल. खर्चही करावा लागेल. वसूली करा. नोकरीत वर्चस्व वाढेल. तुमच्या हुशारीचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक कार्याला ती मिळेल. योजनांना महत्त्व द्या. पूर्ण करा. खाण्याची काळजी घ्या. संसारात काम वाढेल. धावपळ होईल. साहित्याला नवा विषय मिळेल.
मीन
चंद्र, शुक्र त्रिकोण योग, चंद्र, गुरु युती होत आहे. धंद्यात किरकोळ समस्या येईल. ओळखीतून काम मिळवता येईल. वसुली करा. प्रवासात सावध रहा. कोणताही वाद वाढवू नका. नोकरीत जबाबदारी वाढेल. बदलीची शक्मयता दिसेल. राजकीय, सामाजिक कार्यात लोकांच्या मदतीसाठी प्रयत्न करता येतील. लोकप्रियता मिळेल. कला, साहित्यात यश मिळेल. संसारात सुखद समाचार मिळेल.





