मे महिन्यातील लौकिक मुहूर्त आणि इतर माहिती
क्र. विशेष तारीख
1 शुभ दिवस 1 स 9 प, 2, 3, 4, 7, 9, 10, 11 स 11 प, 12, 15, 16, 21, 22, 23 दु 12 प, 24, 25, 28, 29, 30
2 अशुभ दिवस 5, 6, 8, 13, 14, 17, 18, 19, 20, 27, 31
3 सण/उत्सव/विशेष तिथी 1-मोहिनी एकादशी-कामगार दिवस, 4- नरसिंह जयंती-व्यास जयंती, 5- साई बाबा उत्सव, शिर्डी- बुद्ध पौर्णिमा, 8- संकष्ट चतुर्थी, 15- अपरा एकादशी, 19- शनिश्वर जयंती, 23- अंगारक योगावर विनायक चतुर्थी, 25- गुऊपुष्यामृत, 31- निर्जला एकादशी
4 अमावास्या/ पौर्णिमा अमावास्या: 18- रात्री 9.42 ते 19 – रात्री 9.22 पर्यत ।। पौर्णिमा: 4 रात्री 11.43 ते 5 रात्री 11.03 पर्यंत
5 साखरपुड्याचे मुहूर्त 2, 3, 4, 7, 10 दु 4 नं, 11 स 11 प, 12, 15, 16, 21, 29, 30
6 बारसे (नाव ठेवण्याचे) मुहूर्त 2, 3, 7, 16, 21, 24, 25, 29 दु 12 नं
7 जावळाचे मुहूर्त 3, 4, 12, 21 स 9 नं, 22 स 11 प, 24, 25
8 भूमिपूजनाचे/ पायाभरणीचे मुहूर्त 1 स 9.22 प, 3 स 11.16 प, 10 दु 4 प, 11 स 11.27 प, 12 दु 1.03 प, 15, 22, 27, 29
9 गृहप्रवेशाचे मुहूर्त (व्यावहारीक मुहूर्त) 3, 7, 11 स 11 प, 12, 15, 21, 22 स 11 प, 24, 25
10 वास्तूशांतीचे मुहूर्त 3 स 11.26 प, 11 स 11.26 प, 12 सायं. 4 प, 15 स 11.44 ते दु 4 प, 22 स 10.36 प, 25, 29
11 व्यापार सुऊ करण्याचे मुहूर्त 2, 4, 16, 21
12 वाहन खरेदी मुहूर्त 3, 12, 22, 24, 25
13 शेतजमीन/जागा/ प्रॉपर्टी/फ्लॅट खरेदीसाठीचे मुहूर्त 1, 9, 10, 14, 24, 25
14 शेतीच्या कामांसाठी उपयुक्त दिवस 2, 3, 10, 11, 12, 15, 21, 22, 24, 25, 29
15 डोहाळे मुहूर्त 3, 7, 9 सायं 6 प, 21, 24, 25 सायं. 6 प, 30
16 पंचक 13 मे रात्री 00.20 ते 17 मे सायं 7.39 पर्यंत
मेष
तब्येतीच्या बाबतीत विशेष काळजी करण्याची गरज नाही. पण थोडेफार पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. पैसा येईल, पण तितकाच खर्च झाल्याने मूड थोडा बिघडू शकतो. पराक्रमात वाढ होईल. बंधूंकडे किंवा बहिणींकडे जास्त लक्ष द्याल. एखादा ब्र्रेक घेऊन बाहेर फिरून यावेसे वाटेल. घरातील कामांकडे जास्त लक्ष द्याल. तीर्थयात्रा घडू शकते.
उपाय – सार्वजनिक ठिकाणी पाण्याची सोय करा.
वृषभ
तब्येतीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असेल. संसर्गजन्य आजार त्रास देऊ शकतात. या काळात कोणावरही भरोसा न करता पैशांच्या बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे. अनावश्यक प्रवास केल्याने तब्येतीवर परिणाम होईल. कागदपत्रांचे व्यवहार सांभाळून करा. जमिनीचे व्यवहार यशस्वी होतील. नोकरदार वर्गाला थोडा त्रास संभवतो.
उपाय – कपिला गायीची सेवा करा
मिथुन
आरोग्याचा पाया डळमळीत राहण्याची शक्मयता आहे. इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो. पैशांच्या बाबतीत निश्चिंत रहा. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. घरातील लोक मदत करतील. प्रवास घडण्याची शक्मयता आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये शेअर बाजारात पैसा गुंतवू नका. नोकरदार वर्गाला फक्त आश्वासने मिळतील.
उपाय- तृतीयपंथी व्यक्तीला आर्थिक मदत करा
कर्क
आरोग्याला सांभाळावे लागेल. स्वत:च्या मनाने कोणतेही औषध घेतले तर विपरीत परिणाम होऊ शकतो. पैशांची आवक उत्तम असेल. कुटुंबातील वातावरण समाधानकारक असेल. नातेवाईकांकडून चांगली बातमी कळू शकते. पाण्याच्या ठिकाणी प्रवास घडू शकतो. जमिनीचे व्यवहार सध्या टाळावेत. नोकरदार वर्गाला उत्तम ग्रहमान आहे.
उपाय – गरजूला तांदूळ आणि साखर दान द्यावी
सिंह
आरोग्याच्या बाबतीत नशीबवान असाल. घरातील इतर लोकांची तब्येत बिघडली तरी तुम्हाला तितकासा त्रास होणार नाही. प्रवासाला जाण्यापूर्वी सगळ्या बाजूने विचार करावा. कागदोपत्री व्यवहार करत असताना चार चौघांना विचारून करा. छोट्या गुंतवणुकीतून चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्मयता आहे. वैवाहिक जीवन उत्तम असेल.
उपाय – लाल गाईची सेवा करावी.
कन्या
या काळात थोडा मूड खराब होऊ शकतो. आर्थिक व्यवहार होता होता राहिल्याने मन थोडे उदास होऊ शकते. त्यात कुटुंबातील कलह किंवा छोटे-मोठे भांडण याने त्रस्त होऊ शकता. जागा खरेदी-विक्री करणाऱ्यांना अनुकूल काळ आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. प्रेमसंबंध सुधारतील. नोकरी करणाऱ्यांना आर्थिक फायदा होईल.
उपाय- गूळ दान द्यावा.
तूळ
कोणतेही काम करत असताना तब्येतीवर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. एखादा निर्णय घेताना कुटुंबातील सगळ्यांचे एकमत होईलच, असे सांगता येत नाही. आणि यामुळे थोडे कलहाचे वातावरण असू शकते. प्रवासाला जायचा प्लॅन कराल. प्रॉपर्टीसंबंधी विवाद संपण्याच्या मार्गावर आहेत. गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरदार वर्गाला अनुकूल काळ आहे.
उपाय -फणसाची मुळी जवळ ठेवा.
वृश्चिक
धनप्राप्ती आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल काळ आहे. नवीन प्रोजेक्ट मिळतील. त्यातील काही प्रोजेक्टचा पुढे जाऊन खूप फायदा होऊ शकतो. प्रवास घडेल. मनोरंजनाकडे मनाचा कल राहील. प्रॉपर्टीच्या दृष्टीने चांगला काळ आहे. नोकरदार वर्गाला पगारवाढ मिळू शकते. वैवाहिक जीवन तणावपूर्ण असेल. मान, सन्मान वाढेल.
उपाय -गरजू सफाई कर्मचाऱ्यांना अन्नदान करावे.
धनु
आरोग्याची साथ मिळेल. धनसंचयाकडे लक्ष द्याल. कौटुंबिक सुख प्राप्त होईल. नवीन वस्तू खरेदी करू शकता. प्रवासाचे उत्तम योग आहेत. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीमध्ये अडथळे येणार नाहीत. प्रेमसंबंधांमध्ये आनंद मिळेल. करमणुकीसाठी खर्च कराल. नोकरदार वर्गाला मात्र वरिष्ठांकडून त्रास होऊ शकतो. धार्मिक स्थळी भेट देण्याचा प्लॅन कराल.
उपाय -हळद केशराचा टिळा कपाळी लावावा.
मकर
आरोग्य चांगले असल्याने मूड चांगला असेल. उत्साहात आणि आत्मविश्वासात वाढ होईल. धनप्राप्तीचे नवीन स्रोत सापडू शकतात. कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत सहलीला जाण्याचा प्लॅन करू शकाल. एकंदर हा काळ सुखमय असेल. धोकादायक गुंतवणुकीपासून चार हात दूर रहा. प्रेमसंबंध बिघडू शकतात.
उपाय -उडदाचे दान द्यावे.
कुंभ
सर सलामत तो पगडी पचास, याचा अनुभव येईल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. पैशांची आवक उत्तम असेल. प्रवास घडणार. प्रॉपर्टीसंबंधी व्यवहारात चांगला अनुभव येणार नाही. आईविषयक चिंता वाटू शकते. नोकरदार वर्गाला सावध राहण्याची गरज आहे. वैवाहिक जीवन उत्तम असेल. मित्रांकडून चांगल्या प्रकारे मदत मिळेल.
उपाय-रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांना दुधाचे दान द्या.
मीन
तब्येत सुधारत आहे. पण खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देण्याची गरज आहे. धनप्राप्ती उत्तम असेल. कुटुंबातील सदस्यांचे मन वळवण्यात यशस्वी व्हाल, त्यांची मदतही मिळेल. प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा. कागदोपत्री व्यवहार करत असताना सावध रहा. नोकरदार वर्गाला मॅनेजमेंटकडून मदत मिळाल्याने फायदा होण्याची शक्मयता आहे.
उपाय -भटक्या कुत्र्यांसाठी खाण्याची आणि पाण्याची सोय करा.