कॉन्टॅक्टरचा निष्काळजीपणा मुलांसमोर जीवघेणा ठरण्याची शक्मयता
प्रतिनिधी /वाळपई
सध्या मोठय़ा प्रमाणात पाऊस लागत आहे. अनेक ठिकाणी खड्डय़ामध्ये पडून जीवितहानी होण्याच्या प्रकारामध्येही वाढ होऊ लागलेली आहे. असे असताना सत्तरी तालुक्मयातील रावण सत्तरी येथील सरकारी प्राथमिक विद्यालया शेजारी अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी कॉन्टॅक्टरने खोदलेल्या खड्डय़ामुळे मुलांना मोठय़ा प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे. यामुळे याची विशेष दखल घेऊन स्थानिक आमदार व सरकारी यंत्रणेने सदर खड्डय़ांच्या सभोवताली संरक्षण कुंपण उभारावे अशा प्रकारचे जोरदार मागणी पालकांनी व मुलांनी केलेली आहे. याबाबतची माहिती अशी की पंचायत क्षेत्रातील रावण याठिकाणी सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या शेजारी अंगणवाडी इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. कॉन्टॅक्टरने या कामाला गेल्या एक महिन्यापूर्वी सुरुवात केली. यासाठी खोदकाम केलेली आहे .सदर खोदकाम जवळपास दीड मीटर खोल आहे. सध्या पाऊस लागत असल्यामुळे त्यामध्ये पाणी भरलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे या बांधकामाच्या भोवती कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा लावलेली नाही. यामुळे सदर भागातील मुलांना धोका निर्माण झालेले आहे .याबाबत पालकांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केलेली आहे.
सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या अगदी शेजारी सदर खोदकाम सुरू आहे. यामध्ये पाणी भरल्यामुळे पाण्याचा अंदाज येत नाही. नजरचुकीने मुले सदर ठिकाणी गेल्यास मोठय़ा प्रमाणात जीवित हानी सारखी दुर्घटना घडण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही ?.यामुळे पालकांनी याबाबत तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केलेला आहे.
कॉन्ट्रक्टरचा मनमानीपणा याला प्रामुख्याने कारणीभूत असून या संदर्भात अनेक वेळा सदर कॉन्ट्रक्टरला सभोवताली भागामध्ये संरक्षण कुंपण उभारण्यात यावे अशा प्रकारची विनंती केली. मात्र त्यांनी अजून पर्यंत या संदर्भात अजिबात लक्ष दिलेले नाही. सध्यातरी पालकांची चिंता मोठय़ा प्रमाणात वाढलेली आहे. त्याचप्रमाणे प्राथमिक शाळेत अध्यापनाचे काम करणाऱया शिक्षकांनाही याबाबत चिंता निर्माण झाली असून येणाऱया काळात याठिकाणी मोठी दुर्घटना होणार नाही याची विशेष दखल घेऊन सदर ठिकाणी संरक्षण कठडे उभारण्यात यावेत अशा प्रकारची मागणी शिक्षकांनी केली आहे.
या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष रेणुका गावस यांनी कॉन्ट्रक्टरच्या एकूण कामा संदर्भात तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे. सदर कामामुळे मुलांना मोठय़ा प्रमाणात धोका निर्माण झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
विद्यालयाचे पालक हनुमंत गावस यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना या संदर्भात सरकारने विशेष लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे स्थानिक आमदार दिव्या राणे यांनी या संदर्भात विशेष लक्ष देऊन सभोवताली संरक्षण कुंपण उभारण्याच्या दृष्टिकोनातून गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. पालक निलेश गावस यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया करताना सध्या मोठय़ा प्रमाणात पाऊस लागत असल्यामुळे व इमारतीच्या शेजारी अशा प्रकारचा धोका निर्माण झाल्याने मुलांना शाळेत पाठवावे की नाही याबाबत पालकांसमोर प्रश्न निर्माण झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
पालक दामोदर शेटकर यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सरकारने याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे व अशा प्रकारचा निष्काळजीपणा कॉन्ट्रक्टरकडून होणार नाही या संदर्भात सतर्क रहावे अशी मागणी केली आहे.
प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका गौतमी शेटगावकर यांनी सदर कामासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. कारण नजर चुकून यदाकदाचित मुले सदर भागांमध्ये गेल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्मयता असल्यामुळे याबाबत गंभीरतेने लक्ष द्यावे अशा प्रकारची मागणी केली आहे.









