शिवप्रतिष्ठान बसवण कुडची विभागातर्फे आयोजन
प्रतिनिधी / बेळगाव
येथील शिवप्रतिष्ठान बसवण कुडची विभागातर्फे किल्ले राजगड ते तोरणामार्गे रायगड ते प्रतापगड मोहीम नुकतीच अक्षय चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली व राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
प्रारंभी गुंजवणे येथे गणेश मंदिरात प्रेरणा मंत्र म्हणून या गड मोहिमेस सुरुवात करण्यात आली. वाघाच्या माळामार्गे किल्ले राजगडावर प्रवेश करण्यात आला. यानंतर बालेकिल्ला दर्शन घेऊन गडावर मुक्काम करण्यात आला. तर दुसऱया दिवशी आळू दरवाजामार्गे बुदालामाची मार्गे गडावर प्रवेश करण्यात आला. यानंतर रायगडाच्या पायथ्याशी मुक्काम करण्यात आला होता. तिसऱया दिवशी चित्र दरवाजापासून रायगड चढण्यास सुरुवात करून महादरवाजामार्गे पुढे शिवछत्रपतींच्या समाधीस वंदन करून किल्ले प्रतापगडास मोहीम पोहोचली. त्यानंतर भवानी मंदिराचे दर्शन घेऊन पार गावामधील रामवरदायिनी मंदिरामध्ये ध्येयमंत्र म्हणून मोहिमेची सांगता करण्यात आली.
सदर मोहिमेमध्ये विनायक शेट्टी, साईराज शेट्टी, महेश गिरी, पप्पू खोकलेकर, हरिष बेडका, राहुल गौंडाडकर, परशराम बेडका, भरमा हसबे, यल्लाप्पा अनगोळकर, सुमनकुमार दिवटे, साई बेडका, प्रशांत खंडोचे, पांडुरंग चौगुले, रोहन तारीहाळकर, सागर मन्नोळकर, केतन बेडका, ठाकुर कोलू, राजू पाटील, प्रवीण बेडका, यश शिंदे, महादेव अनगोळकर, रामा हम्मण्णावर यांच्यासह शिवभक्तांनी भाग घेतला होता.









