प्रतिनिधी / कोल्हापूर
रायगड विकास प्राधिकरणकडून हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडचे जतन संवर्धन सुरु आहे. यातंर्गत गडावर सुरु असलेल्या उत्खननामध्ये अनेक मौल्यवान अशा शिवकालीन वस्तू सापडत आहेत. दोन दिवसांपुर्वी उत्खननादरम्यान येथे शिवकालीन सोन्याची बांगडी सापडल्याची माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. तसेच अशा वस्तूंमुळे गडावरील अनेक ठिकाणांचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होण्यास मदत होईल अशी अपेक्षाही खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली.
प्राधिकरणामार्फमत गडावर सुरु असलेल्या उत्खननामध्ये भांडी, नाणी, घरांची वेगवेगळ्या प्रकारची कौलं अशा वस्तू मिळालेल्या आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या उत्खननामध्ये सोन्याची मौल्यवान बांगडी मिळालेली आहे. अशाप्रकारे पुढेही अनेक ऐतिहासिक वस्तूंसह वेगवेगळे अलंकारही उत्खननात मिळू शकतात. यामुळे गडावरील तत्कालीन राहणीमान, संस्कृती, वास्तूरचना नव्याने समजण्यास मदत होणार आहे. तसेच या वस्तू ज्या ठिकाणी मिळतात, त्यावरून त्या ठिकाणचे वास्तविक ऐतिहासिक महत्त्व व माहिती समजण्यास मोलाची मदत होणार आहे. शुक्रवारी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडास भेट देऊन उत्खननात मिळालेल्या या ऐतिहासिक वस्तूंची पाहणी केली. यावेळी पुरातत्त्व विभागाने केलेल्या या कामागिरीबाबत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
किल्ले रायगडवर उत्खनना दरम्यान सापडत असलेल्या विविध ऐतिहासिक वास्तुंच्या माध्यमातून अनेक ठिकाणचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होण्यास मदत होणार आहे. उत्खननामधून पुढील काळात अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.
– खासदार संभाजीराजे छत्रपती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








